(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ते त्रिकोणी कुटुंब (एक सत्यकथा)

    नियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता.

      January 13, 2022


  • रुद्रा – कादंबरी – भाग १३

    आनंद टी सेंटर’ सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक ‘कडक मिठ्ठी’ चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या खोड्या अश्या लहान सहान ‘हाटेली’त जपल्या जातात. जसवंत येऊन बसल्या बरोबर त्याने ‘कडक मिठ्ठी’ची ऑर्डर दिली. आज तो बेचैन झाला होता. आता संतुकराव मेले होते. कीतीही नाही म्हणले तरी मनोहरचा या खुनात हात नक्की होता! त्याला चिंता होती ती फुकट मिळणार गांजा बंद होणार याची. मनोहर खुनाच्या रात्री संतुकराव येण्या पूर्वी त्या आऊट हाऊस मध्ये काही काळ होता! जसवंतने याचेच भांडवल करण्याचे नक्की केले. इतके दिवस मनोहर आपल्या जवळच्या माहिती साठी ‘माल’ देत होता, आता हि तो देतच रहाणार होता! आत्तापर्यंत माहित सांगण्यासाठी द्यायचा आता, असलेली ‘माहिती’ न सांगण्याबद्दल ‘माल’ देणार होता! त्याने मनोहरला फोन लावला .

      March 19, 2019


  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १८)

    व्यवसायानिमित्त रोज माझी महाराष्ट्रात जिथे काम असेल तिथे भ्रमंती असे. एक दिवस कामानिमित्त मी कोल्हापूरला होतो. तिथे गुरूराज प्रिंटर्स कोल्हापूरचे श्री. सतीश शिवदे यांचेकडे माझे काम सुरू होते. नातेवाईकच होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघेही रंकाळ्यावर चाट (भेळ) खाण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे त्यांना ओळखले कां.? मी ओळखत नाही म्हणालो, तेंव्हा शिवदे यांनी त्या व्यक्तीला ” अहो नानासो . म्हणून हाक मारली व म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ख्यातनाम विख्यात गीतकार जगदीश खेबुडकर आहेत.

      June 11, 2021


  • माणसं जोडणारा गणेशोत्सव

    बर्वे साहेबांना गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले तरीही कामाच्या व्यापामुळे घरातल्या गणेशोत्सवासाठी गणपतीची मुर्ती अगोदरच जाऊन बुक करता आली नव्हती. या शहरात बदली होऊन राहायला येऊन त्यांना चारच महिने झाले होते. तसे कामावर जाता येताना त्यांच्या नजरेस दोन तीन मुर्तीकारांच्या कार्यशाळा पडल्या होत्या.

      November 17, 2022


  • आता ८०० च्या घरात

    २००८ या वर्षाची सुरवातच कार्यक्रमाने झाली. १ जानेवारी २००८ रोजी कस्तुरी कॉलेज, शिक्रापूर येथे कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता विघ्नेश जोशी याने केले. पुढील कार्यक्रम इंडियन ऑईल अँड नॅचरल गॅस कॉन्फरन्समध्ये झाला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री उपस्थित होते. एप्रिलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या रथयात्रेत ठाण्यातील कलाकारांचा कलाकार रथ समाविष्ट करण्यात आला. या रथावर बसून ठाणेकरांचा उत्साह पाहताना आगळीच मजा आली. यानिमित्त 'चित्ररथ नांदी' ही सीडी प्रकाशित करण्यात आली. यातही माझे गाणे होते. या वर्षाच्या सुरवातीलाच झालेल्या शिक्रापूर येथील कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता लाभली. म्हणूनच श्रीस्वामी समर्थ मठ, शिक्रापूरसाठी ७ एप्रिल २००८ रोजी मी आणखी एक कार्यक्रम सादर केला. हाच माझा ८०० वा जाहीर कार्यक्रम होता. म्हणजेच फक्त एका वर्षात मी ७५० वरून ८०० कार्यक्रमांपर्यंत पोहोचलो होतो. गणिताच्या दृष्टीने अजून चार वर्षातच मी १००० कार्यक्रमांपर्यंत जाऊ शकत होतो. पण कार्यक्रमांची ही गती कायम ठेवणे बिलकूल सोपे नव्हते. कधी कधी एका कार्यक्रमासाठी देखील बराच वेळ वाट पहावी लागते. अनेक ठरलेले कार्यक्रम आयत्या वेळी रद्द होतात. अर्थात या सर्व अडचणींना तोंड देतच येथपर्यंत पोहोचलो होतो. यानंतर सत्कर्म प्रतिष्ठानसाठी 'फर्माईश' हा कार्यक्रम केला, तर 'गझल त्रिवेणी' हा गझलवरील खास कार्यक्रम डॉ. अश्विन जावडेकर आणि विनय राजवाडे यांच्याबरोबर डेंटल असोसिएशनसाठी केला.

    संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या शिष्या वैशालीताई सोनाळकर आता माझ्याकडे गाणे शिकत होत्या. त्यांचा हिंदी गाण्यांचा अल्बम आम्ही रेकॉर्ड केला. त्यात माझेही एक गाणे होते. या अल्बमचे संगीत संयोजन सागर टेमघरे याने केले. स्प्रिंग्ज कंट्री क्लबसाठी चिंतामणी सोहनीबरोबर एक गझलचा कार्यक्रम केला. माझे थोरले बंधू मकरंद केतकर यांच्यासाठी पुणे येथे 'गीत गझल उत्सव' हा कार्यक्रम केला.

    सह्याद्री चॅनेलवरील 'वा रे वा'च्या दिवाळी स्पेशल कार्यक्रमामध्ये माझी दोन गाणी झाली. या कार्यक्रमाचे निर्माते शरण बिराजदार होते. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग १४ ऑक्टोबर या माझ्या वाढदिवशी झाले. शरणजींना माझा वाढदिवस माहीत असल्याने मुंबई दूरदर्शनच्या रेकॉर्डिंग स्टुडिओतच मला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. मी आवाक्च झालो. माझे डोळे आनंदाने भरून आले. अशा मित्रांचे प्रेम ही माझी फार मोठी शिदोरी आहे.

    आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टरांची एक कॉन्फरन्स येऊर येथे आयोजित केली होती. त्यासाठी माझा गझलचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार राजन किणे यांच्यासाठीही गझलचा कार्यक्रम मुंब्रा येथे केला.

    संगीतकार चिनार-महेश या काळात 'मानसन्मान' या मराठी चित्रपटाचे संगीत करत होते. या चित्रपटासाठी मी दोन गाणी गायली. सावनी रवींद्र आणि सचीन मुळे तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांची कन्या अनन्या वाडकर असे इतर कलाकारही या चित्रपटात गायले. या चित्रपटाचे रेकॉर्डिंग पंधरा दिवस सुरू होते. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांच्यासाठी मी पार्श्वगायन केले.

    माझा पुढील गझलचा कार्यक्रम हॉटेल फरियाज, लोणावळा येथे झाला. आयोजक डी. जे. वर्दे यांच्या एनडीई- २००८च्या कॉन्फरन्ससाठी हा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुण्याला गेलो. तेथील टिळक स्मारक मंदिरच्या सभागृहात गझलचा कार्यक्रम करून २९ डिसेंबर २००८ रोजी ठाण्याला परतलो. यावर्षी मी ८०० जाहीर कार्यक्रम पूर्ण केले. पण कार्यक्रमांपेक्षा रेकॉर्डिंग्ज या वर्षात जास्त झाली.

    -अनिरुद्ध जोशी

      August 10, 2022


  • स्टेशन चिरेबंदी (कथा)

    अस्ताव्यस्त पसरलेल्या या स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म आहेत हे स्टेशनमास्तरला सुद्धा सांगता येणार नाही. किती पूल आहेत तेही मोजावे लागतील. कुठल्या पुलावर चढल्यावर कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरता येईल ? कुठे जाता येईल ? सांगता येणार नाही. कोण कुठे अडवील समजणार नाही. गर्दीत काहीही स्वत:च डोक न चालवता चालत राहिलात तरच स्टेशनच्या बाहेर पडू शकाल.

      May 7, 2022


  • अ बॅकग्राऊंडर ऑन महाराष्ट्र – लोकसभा २००९

    राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात. नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा ‘बॅकग्राऊंडर’चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते.

      August 8, 2009


  • घुस्मटलेले श्वास झाले रे मोकळे- “गोदावरी” !

    “खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला.

      November 19, 2022


  • भावगंधर्व

    “भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती.

      August 6, 2021


  • माझी कोकणची सहल – पावशीच्या जंगलात काढलेली एक रात्र

    डॉ. बापू भोगटे हा जनावरांचा डॉक्टर. मुंबईतली चांगली ‘गोदरेज’ मधली नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात स्थायिक झाला..थोडे पैसे गुंतवून काजू, बांबूची लागवड सुरु केली..वेळ मिळेल तसा खांद्यावर बंदूक लटकावून जंगलात घुसायच आणि मनमुराद भटकायचं हा याचा छंद..बंदूक स्व-संरक्षणासाठी, शिकारीसाठी नव्हे..असाच शहरतील काही मित्रांसमवेत एकदा जंगलात गेला असता त्याला जंगलात जंगलात मुक्काम करण्याची कल्पना सुचली व लगेच दुसऱ्या दिवशी बापूने ती अमलातही आणली. सोबत तेच शहरातले मित्र होते..ते तर जंगलातील मुक्काम ह्या कल्पनेनेच वेडे झाले होते व ती रात्र त्याची जंगलात काढली..त्याचे फोटो बापूने फेसबुकवर टाकलेले मी पहिले आणि एकदा तरी बापुसोबत जंगलत मुक्काम करण्याचा निश्चय केला आणि लगेच काही दिवसात तो अंमलातही आणला. हरकुळ खुर्दच्या नंतरचा मुक्काम आम्ही बापूकडे पावशीच्या जंगलात करण्याच ठरवल होत..

      January 3, 2017