(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • हादग्याची वडी

    हादग्याची वडी

    साहित्य:- अगस्ताचा कोवळा पाला, चिंच, गूळ, तिखट, मीठ, डाळीचं पीठ, तळण्यासाठी तेल, तीळ आणि गरम मसाला.

    कृती:- अगस्ताचा कोवळा पाला धुऊन तो बारीक चिरून घ्यावा. गरम पाण्यात चिंच तीन ते चार तासांसाठी भिजत घालायची. तिचा कोळ काढून घ्यावा. या चिंचेच्या कोळामध्ये गूळ भिजत ठेवावं. कोळामध्ये गूळ चांगलं विरघळवत ठेवावं. कोळ न शिजवता कच्चाच ठेवावा. एकीकडे डाळीचं पीठ भाजून घ्यावं. चिरलेल्या पानांमध्ये अंदाजाने डाळीचं पीठ, तिखट, मीठ, कोळ, गरम मसाला घालून कणिकेप्रमाणे पीठ मळावं. त्यांचा लांबट लोड करून तो उकडवत ठेवावा. दहा मिनिटं उकडल्यावर तो गार करण्यास ठेवावा. पूर्ण गार झाल्यावर त्यांच्या गोल गोल चकत्या करायच्या. आवडत असल्यास या चकत्या तळाव्यात नाही तर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात चकत्या घालाव्या. झारा न लावता त्या टॉस कराव्यात. वरून भाजलेले तीळ भुरभुरावे. अशा प्रकारे अगस्ताच्या फुलांच्या पाकळय़ांच्याही वडय़ा करता येतात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

  • p-2228-soya-bean-patties

    सोया पॅटिस

    किसलेले गाजर व बटाटे नॉनस्टिक पॅनमध्ये परता. सोया मिक्सकरमधून काढून सर्व मसाले व मीठ घालून परता. बटाटे, गाजर व सोया एकत्र करून गोळा बनवा. मैद्यात थोडे तेल, मीठ व पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या. सोया मिश्रणाचे चपटे पॅटिस बनवून मैद्याच्या मिश्रणात बुडवून फ्रायपॅनमध्ये तेलात तळून घ्या. गरमगरम सॉसबरोबर सर्व्ह करा.

  • baby-corn-sticker-300

    कुरकुरीत बेबी कॉर्न स्टिक्सर

    अर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, तळण्यासाठी तेल.

  • हादग्याची वडी

    मटार पॅटीस

    साहित्य:- ४ ते ५ उकडलेले बटाटे, २ वाट्या उकडलेले मटारचे दाणे, १ कांदा बारीक चिरून, धने - जिरे पूड १ चमचा प्रत्येकी तेल, ४-५ ओल्या मिरच्या, आले, जिरे, पेस्ट, ४-५ ब्रेडचे स्लाइस, मीठ.

    कृती:- प्रथम बटाटे मऊ उकडून घ्यावेत. नीट बारीक कुस्करून त्यात मीठ व 2-3 स्लाइस बारीक कुस्करून घालावेत. मऊ वाटल्यास अजून स्लाइस घालून गोळा करून ठेवावा. तेलावर मटारचे उकडलेले दाणे, बारीक कांदा, आलं-मिरची पेस्ट, मीठ- धने-जिरे पूड घालावी. साखर व लिंबू पिळावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी व 3-5 मि. परतून छान सारण करून घ्यावे.

    हाताला किंचित तेलाचा हात लावून बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घ्या त्याची पातळ पुरी करून त्यात 1 ते दीड चमचा सारण घालून पारी बंद करा व गोल व चपटा पेढ्यासारखा आकार द्या व तव्यावर तेल सोडून हे पॅटीस खरपूस भाजून घ्या (बटाटा चिकटू नये म्हणून बारीक रवा वा ब्रेडक्रम्समध्ये हे पॅटीस घोळवून मग ते तव्यावर परतून घ्या वा तेलात तळून घ्या.)

    कोथिंबीर, मिरची व पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर व टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-897-chawli-athalya-masala-mix

    आठळ्या (फणसाच्या बिया) चवळी मसाला मिक्स

    २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर, १/२ टे. स्पून. काश्मिरी मिरची पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, पाणी (कोथिंबीर पाहिजे असल्यास) फोडणीसाठी मोहर, हिंग, कढीपत्ता, चवीपुरती साखर. कृती आठळ्यांचे तुकडे करून साल काढून उकडून घ्याव्या.

  • हादग्याची वडी

    खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजे काय

    खाण्याचा सोडा अथवा बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट अथवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असे याचे इंग्रजी रासायनिक नाव आहे. हे एक प्रकारचे मीठ आहे. हा खाण्याचा सोडा अल्कली गुणधर्माचा आढळून येतो. हे पांढऱ्या भुकटीच्या म्हणजेच पावडरच्या स्वरुपात अथवा पांढऱ्या स्फटिक स्वरुपातसुद्या सापडते. ह्या सोड्याला ८० सेल्सियस इतक्या तापमानात उष्णता दिल्यास तो विघटन पावतो आणि त्यातून कार्बन डाय ऑक्साईड वायू अतिशय बुडबुड्याच्या स्वरुपात त्यापासून वेगळा होतो. तसेच खाण्याचा सोडा हा आम्लाच्या संपर्कात आल्यास रासायनिक क्रिया घडते आणि कार्बन डाय ऑक्साइडचे बुडबुडे तयार होण्यास मदत होते.

    खाण्याचा सोडा इडली, ढोकळा किंवा केक बनवताना त्याच्या पिठामध्ये वापरला जातो. ढोकळा बनवताना खाण्याचा सोडा वापरला जातो, त्यामुळे ढोकळ्याला जाळी पडते कारण त्या छिद्रातून कार्बन डाय ऑक्साईड वायू निघून गेलेला असतो. म्हणूनच ढोकळा फुगतो आणि हलका होतो. खाण्याचा सोडा वरील पदार्थ बनवताना वापरण्याऐवजी शक्यतो काही नैसर्गिक पर्यायांचा वापर जरूर करू शकतो. खाण्याचा सोडा वापरून पीठ आंबवण्यापेक्षा ते नैसर्गिकरित्या आंबवण्याचा प्रयत्न केल्यास तयार झालेला पदार्थ नैसर्गिक गुणधर्मासहित त्याचा आपल्या शरीराला उपयोग होईल. खाण्याचा सोडा वापरल्याने पदार्थ हलके, खुसखुशीत व्हायला मदत होते. पण खाण्याचा सोडा मर्यादित स्वरूपात वापरणं केव्हाही हितावह आहे.

    असा हा जेवणाची लज्जत वाढवणारा खाण्याचा सोडा हा अजूनही विविध कारणांसाठी उपयुक्त आहे. आज आपण खाण्याच्या पदार्थांव्यतिरिक्त खाण्याच्या सोड्याचे विविध फायदे जाणून घेऊयात:

    १) केसात कोंडा झालं असल्यास काही दिवस केसाला शाम्पू न लावता खाण्याचा सोडा केसांच्या मुळाशी लावून केस धुतल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

    २) खाण्याचा सोडा केस धुताना वापरल्याने केसांना तसेच त्वचेला चमक मिळते. आंघोळीच्या पाण्यात अर्धा कप खाण्याचा सोडा टाकून ह्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. तसेच कंडीशनरमध्येही खाण्याचा सोडा मिसळून केस धुतल्याने केंसाची चमक वाढण्यास मदत होते.

    ३) आपल्या दातांचे पिवळेपण घालवण्यासाठीही खाण्याचा सोडा अतिशय उपयुक्त आहे. ह्यासाठी थोड्या पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून बोटाने हळहळू दातांवर मसाज करून नंतर तोंड स्वच्छ धुतल्याने दातांवरील पिवळेपण कमी होण्यास मदत होईल.

    ४) जर कोणाला ब्लॅकहेडची समस्या असल्यास खाण्याचा सोड्यात थोडं पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवायची. ब्लॅकहेड असलेल्या जागी ही पेस्ट लावून १५ मिनिटानंतर गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हे नियमित केल्याने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

    ५) बगलेतील काळेपणा दूर करण्यासाठी खाण्याचा सोडा पाण्यात भिजवून त्याठिकाणी लावणे. साधारण ५ मिनिटांनी तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवडाभर हा उपाय नियमित केल्यास त्याचा परिणाम निश्चितपणे जाणवतो.

    ६) तोंडाला दुर्गंध येत असल्यास खाण्याचा सोडा वापरून माउथवॉश घरी तयार करून वापरणे उपयुक्त ठरते. त्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाकून चमच्याने ढवळून घेणे. हे पाणी माऊथवॉश सारखे वापरून या पाण्याने चूळ भरल्यास, तोंडाला येणारा वास दूर होण्यास मदत होते.

    ७) उन्हामध्ये कधी कधी आपल्या त्वचेवर डाग पडतात. अशावेळी अर्ध्या लिंबावर खाण्याचा सोडा लावून, हे लिंबू साधारण ३० सेकंद डाग पडलेल्या शरीरातील भागावर चोळल्याने डाग जाऊन त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

    ८) पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून, ह्या पाण्यामध्ये थोडा वेळ हात भिजत ठेवल्यास नखांचा पिवळेपणा जाण्यास मदत होते.

    ९) चांदीचे दागिने किंवा भांडी लवकर काळी पडतात. अशावेळी पाण्यात खाण्याचा सोडा मिसळून, ह्या पाण्यामध्ये काळी पडलेले चांदीचे दागिने किंवा भांडी तासभर भिजत ठेवल्यास काळे पडलेले दागिने किंवा भांडी नवीन असल्याप्रमाणे चकाकतात.

  • हादग्याची वडी

    पिकलेल्या केळ्यांची कोशिंबिर

    साहित्य:- २ पिकलेली केळी, अर्धी वाटी गोड दही, चवीपुरते मीठ, साखर.

    कृती :- प्रथम सुरीने केळ्याच्या फोडी करून घ्याव्यात. त्यात दही, मीठ आणि साखर एकत्र करून घ्यावे.

  • p-1303-Kulfi

    आजचा विषय कुल्फी भाग दोन

    सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, कुठल्याही व्यक्तीसाठी प्रियच आहे. थंडगार, गोड, मजेदार, चविष्ट, वेगवेगळ्या अशा कुल्फीचा उल्लेख केल्यावर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. त्यात जर उन्हाळ्याचे दिवस असतील, तर काही विचारूच नका. हल्ली कुल्फी खाण्यासाठी आता कोणी खास उन्हाळ्याचीच वाट पाहात नाही. बाराही महिने अगदी थंडी-पावसातसुद्धा आइस्क्रीमची चव चाखली जाते.

    ड्राय फ्रूट्स कुल्फी
    साहित्य : एक लीटर दूध, १०-१२ काजू पाकळ्या, १०-१२ पिस्ते, १०-१२ बदामाचे काप,१०-१२ बेदाणे, २-३ सुक्या अंजिर, २-३ खजूर,७-८ केशराच्या काड्या,एक चमचा विलायची पावडर, एक कप कंडेन्स मिल्क ,एक वाटी खवा,अर्धी वाटी फ्रेश क्रीम, दोन टेबलस्पून साखर,चिमूटभर मीठ,एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर.
    कृती : सुके अंजीर व खजूर पाण्यात भिजत घालून ठेवा. एक तासानंतर खजूर व अंजिराचे छोटे छोटे तुकडे करून घ्या व पेपर नॅपकिनवर पसरून टाकून कोरडे करून घ्या. कॉर्नफ्लोर अर्धी वाटी थंड पाण्यात मिसळून एका बाजूला ठेवा. दूध १५-२० मिनिटे उकळून घ्या. उकळत असतांना एकसारखे ढवळत रहा. मग त्यात कंडेन्स मिल्क व खवा घालून चांगले ढवळून मिक्स करून घ्या. नंतर त्यात कॉर्नफ्लोर घातलेले थंड पाणी घालून एक सारखे ढवळत राहून पुन्हा उकळी येईस्तोवर गरम करून घ्या. उकळी येईल असे वाटताच त्यात फ्रेश क्रीम घालून ३-४ मिनिटे उकळून घ्या. आता त्यात विलायची पावडर,केशर,खजूर व अंजिराचे तुकडे,बेदाणे घाला व मिक्स करून घेऊन दोन मिनिटांनी गॅस बंद करा. गॅसवरून उतरून घेऊन जरासे गार झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ घालून रुम टेंपरेचरला थंड करून घ्या. मग त्यात बदाम,काजू व पिस्ते यांचे काप घाला व मिसळून घ्या. हे मिश्रण १०-१२ कुल्फी मोल्ड्समध्ये ओता. वर पुन्हा थोडे ड्राय फ्रूट्सचे तुकडे घालून झाकण लावून कुल्फी मोल्ड्स स्टँडवर ठेवून सेट होण्यासाठी ८-१० तास डिपफ्रिजमध्ये ठेवा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    तिरंगी कुल्फी
    साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा लहान चमचा केशर, दहा-बारा भिजवलेले पिस्ते वाटून, पंधरा-वीस कापलेले पिस्ते.
    कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर कॉर्नफ्लोअर, साखर व वेलची पूड टाकून उकळा. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. याचे तीन भाग करा. एकाच पाण्यात विरघळलेलं केशर, एकात पिस्त्यांची पेस्ट व चिरलेले पिस्ते टाका व एक भाग सफेदच राहू द्या. कुल्फीच्या साच्यात खाली पिवळ्या रंगाच्या दुधाचा एक भाग टाका. तो थोडा घट्ट झाल्यावर त्यावर सफेद दुधाचा भाग व तो भाग घट्ट झाल्यावर पिस्ता टाकलेल्या दुधाचा हिरवा भाग टाकून फ्रीजरमध्ये सेट करून द्या.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    चॉकलेट चिप्स कुल्फी
    साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, अर्धा प्याला चॉकलेटचे कापलेले तुकडे, अर्धा प्याला चॉकलेट सॉससाठी, एक मोठा चमचा प्रत्येकी लोणी, कॉर्नफ्लोअर व कोको पावडर, दोन मोठे चमचे साखर, अर्धा प्याला दूध.
    कृती : सॉस बनवण्यासाठी लोणी गरम करा. त्यात कॉर्नफ्लोअर व कोको पावडर मिसळा. थोडं परतून दूध टाका आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. साखर टाकून थंड करा. दूध निम्मं होईपर्यंत उकळा. त्यात साखर व कॉर्नफ्लोअर मिसळून घट्ट होऊ द्या. थंड झाल्यावर चॉकलेटचे तुकडे टाका आणि साच्यात टाकून सेट करा. चॉकलेट सॉस टाकून खायला द्या. हवं तर चॉकलेटचा कीस टाकून सजवू शकता.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    काजू बदाम कुल्फी
    साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा हिरव्या वेलचीची पूड, प्रत्येकी वीस चिरलेले काजू व बदाम.
    कृती : दूध घट्ट होईपर्यंत उकळा. निम्मं झालं की त्यात साखर, वेलची व कॉर्नफ्लोअर दोन चमचे पाण्यात विरघळून दुधात टाका. ढवळत उकळी येईपर्यंत शिजवा. मग मंद आचेवर 3-4 मिनिटं ढवळत शिजवा. थोडं थंड होऊ द्या. आता कुल्फीच्या साच्यात बदाम व काजूसह भरा. फ्रीजरमध्ये आठ-दहा तास ठेवा आणि सेट होऊ द्या. प्लेटमध्ये काढून थोडे आणखी बदाम व काजूने सजवून सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    जेली कुल्फी
    साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धे पाकीट लाल रंगाची जेली.
    कृती : जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच
    ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर जेलीचे तुकडे मिसळा. साचे फ्रीजरमध्ये थंड करून त्यात विरघळलेली जेली टाकून सेट करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    ताज्या फळांची कुल्फी
    साहित्य : एक लिटर दूध, एक प्याला साखर, एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, चिमूटभर दालचिनी पूड, एक संत्रं, एक सफरचंद, वीस चिरलेली हिरवी द्राक्षं.
    कृती : दूध उकळून निम्मं झाल्यावर पाण्यात घोळवून कॉर्नफ्लोअर, साखर व दालचिनी टाका. उकळी आल्यावर ढवळत चार-पाच मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर फळं मिसळा आणि साच्यात सेट करा. संत्रं व सफरचंदासह सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • ola-Khobra-Chutney-300

    ओल्या खोबर्यांची चटणी प्रकार

    ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

  • p-762-Tandoori-chicken-300

    तंदुरी चिकन

    चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी.