महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य: दीड कप सोललेला मटार, २ टे.स्पून लोणी, १ टी स्पून मैदा, फोडणीसाठी १ टी स्पून चांगले तूप, वेळ: २५ मिनिटे अडीच ते तीन कप पाणी, अर्धा टी स्पून काळेमिरे पावडर, मीठ चवीप्रमाणे, पाव कप क्रीम सजावटीसाठी.
कृती: सोललेला मटार पाण्यात शिजवून घ्यावा. मटार काढून उरलेले पाणी पुन्हा उकळत ठेवावे व त्यात लोणी व थोड्या दुधात मैद्याची पेस्ट करून घालावी. मैद्याची गुठळी होऊ नये म्हणून चमच्याने ढवळत राहावे.
शिजलेला मटार व दूध मिक्सरमध्ये फिरवून चांगले एकजीव करून हे मटारचे मिश्रण तुपाच्या फोडणीवर घालावे. चांगले परतून हे मिश्रण वरील उकळत्या पाण्यात घालावे. जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे. मंद गॅसवर सर्व मिश्रण चांगले एकजीव होऊन शिजण्यासाठी ढवळत राहावे. जरा दाट झाले की त्यात मीठ व मिरपूड घालावी. फार दाट करू नये.
सर्व्ह करताना वरून घोटलेली मलई सजावटीसाठी घालावी. चवीला हे सूप चांगले लागते.
September 10, 2026
पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. परंतु, याचा अर्थ तो तिथेच पडून द्यावा असा नाही. ‘स्मार्ट वूमन’ फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजेत, यासाठी या काही टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील…
September 13, 2010
कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे
March 9, 2017
महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे.
November 10, 2016
गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अश्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा,त्यातून चव आणि पौष्टिक आहार अश्या दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.
या दिवशी बैलाच्या श्रमातून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन या दिवशी करू नये असे संकेत आहेत.वर्षभर बैलांकडून माणूस श्रम करून घेत असतो,या दिवसाच्या निमित्ताने आपल्या परसात पिकवलेल्या भाज्यांचा समावेश करून हि भाजी तयार करणे हा यामागचा खरा उद्देश. अर्थात शहरात हे शक़्य नाही म्हणून भाज्या विकत आणून त्यापासून ऋषीची भाजी तयार करतात.
साहित्य.
भाज्या: लाल भोपळा,पावसाळी काकडी,दोडके,भेंडी, कंदमुळे किंवा सुरण,रताळी,लाल माठाचे देठ,अळू, मक्याची कणसे,ओल्या वाटण्याचे दाणे,भुईमुगाचे दाणे,चवळीच्या कोवळ्या शेंगा,पडवळ,हिरव्या मिरच्या.
सोबत खोवलेला नारळ, मिरपूड, मीठ, कोळलेली चिंच यांचाही समावेश करावा.
कृती:
भोपळा,काकडी,दोडके,दुधी, अश्या लवकर शिजू शकणाऱ्या भाज्यांचे मोठे काप व शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्यांचे लहान कांप करा. पानांचे बारीक तुकडे तर माठ तसेच अळूच्या देठांचे लांब तुकडे पाडा. भेंडी वगळता इतर भाज्या मोठ्या पातेल्यामध्ये घालून त्या बुडतील एवढे उकळते पाणी ठेवा व कमी आचेवर शिजायला ठेवा. सुरण,रताळे किंवा कंदाच्या फोडी मऊ झाल्यावर त्यात मीठ,मिरपूड,नारळ,चिंचेचा कोळ टाका व नंतर भेंडीही चिरून घाला. थोडावेळ उकळल्यानंतर भाजी तयार होईल. हि वऱ्याच्या तांदळा बरोबर व दही यासोबत खाता येते.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२२३०१७३३
September 6, 2016
प्रथम उकळून घेतलेले कॉर्न जाडसर बारीक करून घ्यावे. त्यात कुस्करलेले बटाटे, पालक, भात, पनीर, कोथिंबीर, मिरची, तिखट, धने-जिरे पूड, मीरे पावडर टाकावी. ब्रेड स्लाईस मिक्सरमधून फिरवून बाजूला काढून ठेवावे.
March 16, 2017
सर्वप्रथम ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाइट वर गरम करून घेणे. नंतर कणकेमध्ये बेकिंग पावडर, सोडा, मीठ, पिठीसाखर मिसळून, चाळणीने चाळून एकत्र करा.
December 27, 2016
२ वाट्या मैद्यात पाव वाटी तुपाचं मोहन, पाव चमचा मीठ घालून मैदा दुधात घट्ट भिजवावा. तासभर झाकून ठेवावा. सारण करण्यासाठी खोबऱ्याचा कीस हलका भाजून घ्यावा. काजूचे तुकडे, बदाम काप, चारोळी थोडी भाजून घ्यावी.
June 10, 2017
आपण दुधीचा हलवा बर्याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते..
January 23, 2016
साहित्य :- १ टिन स्वीट कॉर्न, २ मोठे चमचे कॉर्नफ्लावर, २ मोठे चमचे लोणी, १/२ छोटा चमचा अजीनोमोटो पावडर, १/२ कप पत्ता कोबी, १ गाजर, १ कांदा, २ चीज क्यूब.
पाककृती :- कोबी, गाजर व कांदा बारीक चिरुन घ्या. १/२ कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका. एका भांड्यात टिनमधील स्वीट कॉर्न, कॉर्नफ्लावर व ६ कप पाणी टाकून गॅसवर ठेवा. उकळी आल्यावर लोणी, अजीनोमोटो पावडर टाकून १० मिनीटे शिजवा. कांदा, गाजर, व कोबी टाकून ५ मिनीटे शिजवा गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.
August 22, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti