(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • p-893-chicken-parsley-pesto-fruit-chat

    चिकन कोथिंबीर पेस्तो विथ फ्रुट चाट

    १ चिकन ब्रेस्ट (त्याचे ६ तुकडे करावेत), पेस्तो सॉस, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे ऑलिव्ह ऑइल/गोडं तेल, २ चमचे भाजलेले शेंगदाणे, ५० ग्रॅम पनीर, २ हिरव्या मिरच्या, १० लसणीच्या पाकळ्या, ३ पातीचे कांदे (पातीसह), अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.

      March 6, 2017


  • p-1056-Papaya

    पपईचे काही पदार्थ

    सुरुवातीला पक्व फळे पाण्याने स्वच्छ धुवून चाकूने कापून बी वेगळे करावे. फळाची साल बाजूला काढून गर व्यवस्थित मिक्सरमध्ये एकजीव करावा व त्यामध्ये साखर व सायट्रीक अॅसिड घालून मंद अग्नीवर १०३ डी. सें. तापमानापर्यंत गरम करावे.

      March 14, 2017


  • घारकुटाचे वडे

    काहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच. श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत गेलेली दिसते.

      February 11, 2016


  • बाजरीचा भात

    ‌हा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो.
    ‌साहित्य : एक पेला बाजरी, एक पेला तांदूळ, अर्धा पेला मुगाची डाळ. कच्चा मसाला, आलं-मिरची पेस्ट, तमालपत्रं, २ लवंग, १ दालचिनी, काळा मसाला, हळद, साखर, मीठ.

    ‌कृती : आदल्या दिवशी बाजरीला थोडा पाण्याचा हात लावून ती खलबत्त्यात (मिक्सरमध्ये नाही) जाडसर कुटून घ्यावी. त्यामुळे त्याची सालं निघतील ती पाखडून घ्यावी. दुसऱ्या दिवशी भात करताना कढईत तेल टाकून फोडणी करावी. त्यात वरील सर्व कच्चा मसाला टाकून परतावे. नंतर पाखडलेली बाजरी त्यात टाकून पाणी टाकावे व बाजरी तशीच आधी शिजू द्यावी. (कारण बाजरी शिजायला वेळ लागतो.) ती थोडी शिजत आली की त्यात तांदूळ व मुगाची डाळ स्वच्छ धुवून घालावी. त्यात चवीनुसार मीठ, साखर तसेच थोडा काळा मसाला घालून, गरज असल्यास थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.

    वाढताना बाजरीच्या भातावर साजूक तूप, नारळाचा चव किंवा खोबऱ्याचा कीस व कोथिंबीर घालावी. गरम कढीसोबत गरमागरम बाजरीचा भात उत्तम लागतो

      November 28, 2024


  • p-1545-thalipeeth

    आजचा विषय थालीपीठ भाग एक

    भाजणीचे थालीपीठ सगळ्यांनाच आवडते. पटकन होते व करायला सोपे म्हणून महिला वर्गाचीही याला पसंती असते. गरमागरम थालीपीठ व त्यावर लोण्याचा गोळा ठेवला, की फक्कड बेत जमतो. थालीपीठ भाजणी किंवा एकत्रित भाकरीच्या पीठात किसलेला दुधी एकत्र करून थालीपीठं केल्यास तो एक पोषक व हलका-फुलका नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो. उपवासाच्या दिवसातही शिंगाडा, राजगिरा किंवा वरीच्या पिठापासून खास उपवासाची थालिपीठं बनवता येऊ शकतात. भाजणीचं थालीपीठ, वडय़ांव्यतिरिक्त मोकळ भाजणी असाही एक खाद्यप्रकार केला जातो. साधारणत: वाटली डाळीसारखा हा प्रकार भरपूर नारळ घालून खायचा.
    काही कृती थालीपीठाच्या
    संजीव वेलणकर पुणे.

    थालीपिठाच्या भाजणीचे प्रमाण
    चार वाट्या बाजरी, दोन वाट्या ज्वारी, एक वाटी उडदाची डाळ, एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी धने, दोन मोठे चमचे जिरे.
    ही सर्व धान्ये व धने-जिरे सर्व भाजून घेऊन एकत्र दळून भाजणीचे पीठ तयार करून घट्ट बंद डब्यात भरून ठेवावे. (वरील प्रमाणात थोडे कमी-अधिक करण्यास हरकत नाही.) हे भाजणीचे पीठ अनेक दिवस टिकते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    भाजणीचे थालीपीठ
    जेवढी थालीपिठे करावयाची असतील त्या प्रमाणात भाजणी घ्यावी.
    त्यात मीठ, हिंग, हळद, तिखट, थोडे तेल, बारीक चिरलेला कांदा, थोडे तीळ व पाणी घालून छान मळून घ्यावे. साध्या तव्यावर अथवा नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून त्यावर थालीपीठ थापावे. (किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून मग तव्यावर घालावे.) थापलेल्या थालीपिठावर बोटाने चार-पाच भोके पाडून त्यात तेल सोडावे. मंदाग्नीवर दोन्ही बाजूंनी थालीपीठ छान भाजून घ्यावे व गरमागरम खायला द्यावे. या भाजणीच्या थालीपिठात मळण्यापूर्वी काही जण थोडा काळा मसाला घालतात. आवडल्यास कोथिंबीरही बारीक चिरून घालावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मिश्र पिठांचे थालीपीठ
    साहित्य :- एक वाटी बाजरीचे वा ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, हिंग, मीठ, हळद, तिखट चवीनुसार, एक मोठा कांदा बारीक चिरून, थोडे तीळ, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, तेल.
    कृती :- सर्व पिठे व मसाल्याचे जिन्नस, कांदा, कोथिंबीर, तीळ थोडे तेल व पाणी घालून मळून घ्यावे व थालीपिठे बनवावीत.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    भाज्यांचे थालीपीठ
    भाजणीत अथवा मिश्र पिठांमध्ये बारीक चिरलेली मेथी अथवा कांद्याची पात, किसलेले गाजर वा मुळा वा दुधी भोपळा असे काहीही आपल्या आवडीप्रमाणे मिसळून व मीठ, तिखट, हिंग, हळद, धने-जिरेपूड, तेल सर्व घालून मळून थालीपिठे बनवावीत.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    वांग्याचे थालीपीठ
    साहित्य :- थालीपीठ भाजणी दोन वाट्या, एक भरताचे मोठे वांगे भाजून, एक चमचा धने-जिरेपूड, एक चमचा आले-लसूण-हिरवी मिरची वाटून, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, मीठ, तेल.
    कृती :- भरताचे मोठे वांगे भाजून साल काढून कुस्करून घ्यावे. त्यात इतर सर्व जिन्नस व भाजणी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्यावे व लहान-लहान थालीपिठे लावावीत.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    तांदळाचे थालीपीठ
    साहित्य :- तांदळाचे पीठ, जिरेपूड, मीठ, हिरवी मिरची बारीक चिरून व कोथिंबीर बारीक चिरून, तेल.
    कृती :- तांदळाच्या पिठात वरील सर्व जिन्नस घालून व थोडे तेल घालून पाण्याने मळून घ्यावे.
    नेहमीप्रमाणे थालीपिठे लावावीत. ही थालीपिठे अत्यंत कुरकुरीत बनतात. गरम असतानाच खायला द्यावीत. तांदळाच्या पिठाऐवजी तांदळाचा रवा घेऊनही थालीपीठ बनवतात. इतर साहित्यासोबत त्यात थोडे खोवलेले खोबरे घालून ही थालीपिठे बनवतात.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    स्वीटकॉर्न पालक थालीपीठ
    साहित्य :- दोन वाट्या स्वीटकॉर्नचे शिजवलेले दाणे, आठ-दहा पालकाची पाने, सात-आठ लसूण पाकळ्या, आल्याचा लहान तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या (वाटून पेस्ट करून घेणे), तांदळाचे पीठ, मीठ, तेल.
    कृती :- स्वीटकॉर्नचे शिजवलेले दाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत. पालकाची पाने आधण पाण्यात एक मिनिट ठेवून बाहेर काढावीत. सुकवून बारीक चिरून स्वीटकॉर्नमध्ये मिसळावीत.
    आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट एक चमचा व चवीनुसार मीठ घालावे. या मिश्रणात मावेल त्याप्रमाणे तांदळाचे पीठ घालून व थोडे तेल घालून छान मळून घ्यावे व नेहमीप्रमाणे थालीपिठे लावावीत.
    हे वेगळ्या चवीचे थालीपीठ मस्त लागते.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 19, 2017


  • गव्हाच्या कोंडय़ाची भाजी

    गव्हाच्या कुरडया करताना ओले गहू भरडले जातात. त्याचा चीक वापरात येतो, मात्र वर जो कोंडा शिल्लक राहतो

      December 24, 2016


  • pudina-chutney-300

    पुदिन्याची चटणी

    पुदिन्याची पाने, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यात हे जिन्नस घालून त्यावर लिंबाचा रस घालावा, ह्यात आवडत असल्यास एक आल्याचा तुकडाही घालता येईल. मीठ घालून बारीक पेस्ट करावी.

      December 23, 2016


  • p-1688-mulyachya-palyachi-bhaji

    मुळ्याच्या पाल्याची पीठ पेरून भाजी

    प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे, पाणी उकळले कि त्यात बारीक चिरलेला मुळ्याचा पाला घालावा व साधारण ५ टे ७ मिनीटे मध्यम आचेवर ठेवावे. त्यानंतर तो पाला एका चाळणीत काढून घ्यावा व त्यातील सर्व पाणी निथळू द्यावे. एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालावी, कांदा,हिरव्या मिरच्या व आलं-लसणाची पेस्ट घालावी ,कांदा गुलाबीसर रंगावर झाला कि त्यात हळद घालून परतून घ्यावे व ब्लांच केलेला मुळ्याचा पाला घालावा व परतून घ्यावे.

      March 14, 2017


  • भाज्यांच्या खमंग वड्या

    भाज्यांच्या खमंग वड्या – Recipe

      September 11, 2026


  • p-999-pithla

    आजचा विषय पिठलं भाग एक

    चाटून पुसून खाण्यासाठी सगळ्यांचं जेवण पूर्ण होण्याची वाट बघत बसणारेही घरोघरी सापडतील. आणि पिठल्यात असं काय आहे हे विचारणाऱ्या माणसाला खवय्यांच्या रसिकतेच्या व्याख्येतून कायमचा बाद करून टाकतील. आणि वर ‘पिठल्यात काय नाही असं विचारा.’ असंही म्हणतील.

      March 7, 2017