(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टोमॅटोचे थंडगार सूप

    साहित्य: ४-५ पिकलेले टोमॅटो, १ छोटा चमचा लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, मिरे पावडर, थोडी चिरलेली कोथिंबीर.

    कृती: वेळ: १० मिनिटे टोमॅटोच्या बारीक फोडी कराव्यात. त्यात मीठ, मिरे पावडर, लिंबाचा रस घालून मिक्सरमध्ये फिरवावे. वाटल्यास अर्धा कप पाणी घालावे. नंतर गाळून फ्रिजमध्ये ठेवावे. ग्लासमधून देताना थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी. उन्हाळ्यात हे सूप फारच छान लागते.

      September 10, 2026


  • idli

    आजचा विषय इडली भाग एक

    आपल्याकडील पदार्थ खूपच व्यनंज मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात.

      January 18, 2017


  • p-994-cookies

    आजचा विषय कुकीज

    सकाळची न्याहारी असो वा संध्याकाळची गरमा गरम चहामध्ये बिस्किटं बुडवून खाण्याची मजा काही औरच म्हणता येईल. बिस्किटं किंवा कुकीज हा पाश्चिमात्य पदार्थ. पण तो आपल्याकडे असा काही रुळला आहे की, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

      March 7, 2017


  • ढाबा स्टाईल पनिर मसाला

    सर्व प्रथम 200 ग्रँ. पनिर घ्या. त्याचे तुकडे करून त्याला मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद लावून बाजूला ठेवून द्या.

    1/2 तासाने एका पँन मध्ये 3 चमचे तेल आणि एक चमचा तुप घाला. ढाबा स्टाईल मध्ये तेला तुपाचा वापर सढळ हस्ते असतो आपल्याला आवडत नसेल तर प्रमाण कमी करा. त्यात मँरिनेट केलेलं पनिर टाँस करून घ्या. थोडं साँफ्ट होईपर्यंत. मग पनिर वेगळं काढून ठेवून त्याच पँन मध्ये अनुक्रमे जिरं,मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. प्रमाण आपल्या तिखट आवडेल त्याप्रमाणे मग 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घाला. रंग हलका ब्राऊन होईपर्यंत परता. मग त्यात 3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धना जिरं पूड, आणि 2 चमचे बेसन घालून चांगलं परतून घ्या. खरपूस.... मसाला चिकटतोय असं वाटलं तर पाण्याचा हबका मारा. मग त्यात 3 मध्यम टोमँटो प्युरी टाका आणि पुन्हा तेल सुटे पर्यंत परतून घ्या. मीठ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. शेवटी बाजूला ठेवलेलं पनिर आणि ग्रेव्ही नुसार पाणी घालून झाकण लावून 2 मिनिटं ठेवा....... झालं आपलं ढाबा स्टाईल पनिर मसाला.....

    टिप : ढाबा स्टाईल रेसिपित काही जणं फक्त तुपाचा वापर करतात, काही तेलाचा तर काही दोन्हीचा आणि जरा जास्तच..... तसच जेवढे आपण मसाले परतू तेवढी टेस्ट वाढते....

      November 28, 2024


  • p-923-shevgyachi-Paane-300

    आजचा विषय शेवग्याची पाने

    भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे.

      March 7, 2017


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/09/sabudana-khichadi.jpg

    साबुदाणा खिचडी करण्यासाठी काही टिप्स

    साबुदाणा --टपोरा ,गोल दाणे असलेला साबुदाणा चांगला --वेडावाकडा /हाताळल्यावर फुटणारा साबुदाणा घेऊ नये --आणि घ्यावा लागलाच तर चांगला चाळून घ्यावा आणि थोडा भाजून घ्यावा.

    साबुदाणा भिजवताना---साबुदाणा चांगला दोन/तीन वेळा पाण्याने धुवून घ्या आणि नंतर साबुदाणा पूर्ण भिजेल एव्हढे आणि वर अर्धा सेंटीमीटर पाणी राहील हे बघा. साबुदाणा एखाद्या उंच आणि झाकण वाल्या डब्यात भिजवावा. आणि एका तासाने तो डबा उलटा करून ठेवण म्हणजे वरून कोरडा पडणारा साबुदाणा देखील चांगला भिजतो --कमीतकमी ४ ते ६ तास भिजवणे

    शेंगदाणे कुट करताना --शेंगदाणे मायक्रोवेव मध्ये एका वेळी पाव ते अर्धा किलो पसरट काचेच्या भांड्यात (मायक्रोवेव योग्य ) – २+२+१+१ मिनिटे हाय वर भाजावेत -- + चा अर्थ मायक्रोवेव बंद करून भांडे बाहेर काढून दाणे ढवळावे आणि दाणे किती भाजले गेलेत हे पाहणे आणि परत भांडे आत टाकून मायक्रोवेव चालू करणे-( तुमच्या मायक्रोवेव च्या पावर प्रमाणे वेळ कमी जास्त लागेल ) भाजलेले शेंगदाणे साला सकट मिक्सर मध्ये भरड दळणे

    बटाट्याच्या फोडी घालायच्या असल्यास अगोदर शिजवून घेता येईल किवा साबुदाण्या अगोदर जिरे तूप हिरव्या मिरच्यांचे तुकडे असलेल्या फोडणी मध्ये घालून शिजवता येईल --फक्त प्रत्येकाचा शिजण्याचा वेळ वेगवेगळा असेल

    इतर पूर्व तयारी -- तूप (साजूक किवा वनस्पती ) किवा शेंगदाणा तेल , जिरे ,हिरव्या /लाल मिरच्या चे तुकडे --एक ते दीड सेंटीमीटर ,आल्याचे बारीक तुकडे /किसून ,कढीपत्ता (चालत असेल तर ) , लाल तिखट ,मीठ ,साखर , जीरापुड
    भिजवलेला साबुदाणा एखाद्या ताटात /पराती मध्ये काढून मोकळा करून घ्या . त्या मध्ये मीठ ,साखर ,लाल तिखट , दाणा कुट ,, जीरापुड ,आल्याचे तुकडे /कीस घालून चांगले मिक्स करा --चव बघा --खिचडी ची चव लागली पाहिजे -जे कमी वाटेल ते घाला आणि मिक्स करून ठेवा

    मोठ्या पातेल्यात /कढई मध्ये जास्त तूप /तेल घालून तापत ठेवा , त्या मध्ये जिरे घाला , ते तडतडले की हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून परता , त्या वर बटाटा फोडणी मध्ये घाला --अगोदर शिजलेले नसेल तर झाकण ठेऊन थोडे पाणी शिंपडून शिजवून घ्या ( थोडे करकरीत राहूदे जास्त लगदा होई पर्यंत शिजवू नका ) नंतर साखर , मीठ दाणा कुट घालून ढवळा

    दोन पर्याय करता येतील --एक या शिजलेल्या बटाट्यात वरील साबुदाणा मिश्रण घाला आणि चांगले ढवळा किवा --दोन- हे परतलेले व्यंजन ताटा /परातीतील साबुदाणा मिश्रणात ओता आणि नीट मिक्स करा --साबुदाणा खिचडीचे रेडीमिक्स तयार --या पुढे अनेक पर्याय - (एक) -वर कढई /पातेल्यात साबुदाणा घातलेला आहे ती झाकण ठेऊन एक वाफ आणून खिचडी करा.

    विशेष टिप्स -साबुदाणा भिजवताना थोडे ताक घाला --साबुदाणा मोकळा राहून खिचडी मोकळी होते

    शेंगदाण्याचे कूट जास्त असेल तर साबुदाणा मोकळा तर राहतोच पण खिचडीची चव देखील वाढते , शेंगदाण्याचे कूट नसेल तर खिचडी चिकट गोळा होते.

    खिचडी परत गरम करताना जर खिचडीवर दुधचा /ताकचा हबका मारून गरम केली तर मोकळी होते -(पाण्या पेक्षा )

    फ्रीज मध्ये साबुदाणा वाळत जातो त्यामुळे परत गरम करताना खिचडीवर पाणी /दुध /ताक चा हबका मारणे आवश्यक असते.

    वनस्पती तुपातील खिचडी साजुक तुपा पेक्षा जास्त खमंग लागते --कदाचित सढळ हस्ते तूप वापरल्या मुळे असेल.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

      September 4, 2016


  • p-2123-gulpapdi

    सुकडी (गुजराती गुळपापडी)

    तुपावर कणीक खमंग भाजावी. गॅस बंद करून गूळ घालावा. एकजीव झाल्यावर खसखस बडीशेप पेरून थापावं, कापावं. तिखट पदार्थ (देशी – विदेशी) खमीरी रोटी कणकेच्या घरगुती केकमध्ये दिल्याप्रमाणे, कणीक आंबवून घ्यावी.

      March 6, 2017


  • p-1571-sprouts

    आजचा विषय कडधान्य भाग २

    मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात.

    या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सलाड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना उकडलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सलाडसारखीच खा.

    या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी भेळे सारखे चविष्ट बनवू शकता.

    कडधान्यांना मोड आणण्यासाठी ती रात्री भरपूर पाणी घालून भिजत ठेवावीत. सकाळी निथळून घेऊन भाजी धुण्याच्या रोळीत ठेवून बहुतेक कडधान्यांना 24 ते 36 तासांत चांगले मोड येतात. हिवाळ्यात थोडे उशिरा तर उन्हाळ्यात मोड लवकर येतात. काही कडधान्ये तर फक्त 7-8 तास पाण्यात भिजत ठेवून नंतर मोडाशिवाय वापरली जातात. छोले, राजमा, वाटाणा बहुधा मोडाशिवाय वापरले जातात.

    आपण नियमितपणे कडधान्यांच्या उसळी करतो. कधी आमटीही करतो. मटकी, मूग ही कडधान्ये वापरून केलेली कोल्हापुरी मिसळ वा पुणेरी दहीमिसळ खूप लोकप्रिय आहे. पांढऱ्या वाटाण्याचा रगडाही सर्वांना आवडतो. कडधान्यांची भेळ, कडधान्ये घालून सॅलड्‌सही आता बनवली जातात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    काही कृती कडधान्यांची
    कडधान्याचे पॅटिस
    साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल.
    सारणाची कृती :- कडधान्ये वाफवून घ्या. फोडणी करून त्यात कांदा परता. त्यामध्ये मीठ, साखर, कडधान्ये घालून परतून घ्या. वाफ आली, की कडधान्ये गॅसवरून खाली उतरवून थोडी ठेचून घ्या. लिंबू पिळा.
    पारीची कृती :- उकडलेल्या बटाट्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर व थोडे मीठ घालून मळा आणि गोळा तयार करा. या मिश्रणातून छोटा भाग घेऊन पारी तयार करा. त्यामध्ये उसळ भरा. पारीचे तोंड बंद करून तळहातावर दाबून तिला चपटा गोल आकार द्या. वर तांदळाचे पीठ भुरभुरून तळा व गरमागरम सर्व्ह करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मिक्स कडधान्याचे धिरडे
    साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे) ३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार १ चमचा जिरे १/४ वाटी तेल १/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून चवीपुरते मीठ
    कृती: सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. कडधान्ये नीट भिजली की त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत. स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील. मोड आले की मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पिठाएवढे घट्ट असावे. चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालावे. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धिरडय़ाच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी. टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडी लावणे घेऊन गरमच खावे.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मिक्स बिन्स बर्गर
    साहित्य :-
    बर्गर :- २ वाटय़ा शिजवलेला राजमा, १ वाटी शिजवलेले ब्लाक बिन्स, १ मोठा उकडलेला बटाटा
    २ पाव स्लाईस, बर्गर ब्रेड , लेटूसची पाने, हिरवी मिरची, धणेपूड, एक छोटा तुकडा आलं किसून, जिरेपूड, चाट मसाला, मीठ चवीप्रमाणे
    चिंचेची चटणी : चिंचेचा कोळ ६ चमचे, गूळ ३ चमचे, ३-४ खजूर बिया काढून, लाल मिरची १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे.
    चिंचेची चटणी कृती :- चिंचेचा कोळ, गूळ, लाल मिरची, ३-४ खजूर बिया काढून, मीठ एकत्र करा आणि थोडे पाणी घालून मिक्सरवर वाटून घ्या.
    कृती:- एका बाउलमध्ये शिजवलेला राजमा, शिजवलेले ब्लाक बिन्स, उकडलेला बटाटा घेऊन एकत्र करावे. त्यात लागेल तसे पावचे स्लाईस कुस्करून घ्यावे.
    त्यात आवडीप्रमाणे हिरवी मिरची, एक छोटा तुकडा आलं किसून, धणेपूड, जिरेपूड, चाट मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घालून नीट मळून घ्या. या गोळ्याचे चपटे गोल आकाराचे बर्गर करून घ्या.
    तवा गरम करावा. तव्यावर तेल घालून बर्गर शालो फ्राय करा. आता बर्गर ब्रेडवर एका बाजूला चिंचेची चटणी लावा. त्यावर लेटूसचे एक पान ठेवा, त्यावर बर्गर ठेवा. त्यावर टॉमेटोची एक चकती, एक कांद्याची चकती ठेवा. वर अजून थोडी चिंचेची चटणी लावा आणि उरलेला बर्गर स्लाईस त्यावर ठेवून बर्गर बंद करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मटकीची आमटी
    साहित्य :- एक वाटी मोडाची मटकी, एक कांदा, चार हिरव्या मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, एक चमचा धने, जिरेपूड, एक चमचा काळा मसाला, दोन आमसूले, गूळ, तेल, मीठ.
    कृती :- कांदा बारीक चिरावा. एक चमचा तेलावर मटकी, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा, थोडी कोथिंबीर घालून परतावे. थंड झाल्यावर मिक्सळरमधून जाडसर वाटावे. कढईमध्ये दोन चमचे तेलाची मोहरी, जिरे, हळद, कढीलिंब घालून फोडणी करावी. वाटलेली मटकी घालून थोडे परतावे. चार वाट्या पाणी, मीठ, आमसुले, गूळ, धणेजिरे पूड, काळा मसाला घालावा. चांगले उकळावे. आमटीत मिळून येण्यासाठी एक चमचा हरभरा डाळीचे पीठ थोड्या पाण्यात मिसळून आमटीत घालावे. खमंग, चटकदार आमटी भात, भाकरीबरोबर वाढावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    फ्रूट, स्प्राऊटेड, पनीर सॅलड
    साहित्यः पाव बाउल मोड आलेले मूग-मटकी-चणे-राजमा, एक चमचा उकडलेले दाणे, मीठ, मिरपूड, साखर, एक पेर, एक सफरचंद, एक संत्र, एक काकडी.
    कृतीः मोड आलेली कडधान्ये वाफवून घ्या. फळांचे तुकडे करून त्यावर एक चमचा लिंबूरस घालून हलक्याम हाताने हलवून ठेवा. काकडीच्या पातळ चकत्या त्यावर घाला. दोन-तीन चमचे घट्ट दही घेऊन मीठ, साखर, मिरपूड चवीप्रमाणे घाला. दह्यात वरील फळे, कडधान्ये घाला. हवे असल्यास आले किसून घाला. त्यात पनीर बारीक चिरून घाला. त्यावर उकडलेले दाणे व पुदिन्याची तीन-चार पाने बारीक चिरून घाला. लिंबू पिळून खायला द्या.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मोड आलेल्या मुगाची उसळ
    साहित्य :- मुग १ वाटी, ३ वाट्या पाणी, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमाटो, अर्धा चमचा तिखट,. धणे जिरे पूड प्रत्येकी १ चमचा
    गोडा मसाला २ चमचे, अर्धा चमचा हळद,आलं लसूण किसून प्रत्येकी अर्धा चमचा, फोडणीसाठी तेल, कढीपत्ता ७ ते ८ पानं, मीठ चवीनुसार
    कृती :- अख्खे मुग ३ पाण्यात भिजत घालावेत. रात्रभर मुग भिजले की सकाळी त्यातील पाणी निथळून हे मुग एका पातळ कपड्यात हलक्या हाताने बांधून ठेवावेत. खूप घट्ट बंधू नयेत. हे बांधलेले मुग एका पातेल्यात ठेवून वरून झाकावेत व उबदार जागी ठेवावेत. उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्याही कडधान्याला मोड लवकर येतात. हिवाळ्यामध्ये मोड यायला साधारणपणे दीड दिवस लागतो. मुगाला मोड आले की अगदी जेवढे मुग तेवढेच पाणी घेऊन कुकर मध्ये शिजवून घ्यावेत. मुग शिजले की एका कढईमध्ये ३ ते ४ चमचे तेल घेऊन ते तापले की त्यात मोहरी, हिंग व कढीपत्ता घालावा. कढीपत्ता तडतडला की त्यात चिरलेला कांदा व आलं लसूण घालावे. कांदा मऊ होईपर्यंत परतावे. मग त्यात हळद, तिखट, धणे जिरे पूड, गोडा मसाला हे सर्व घालून मिनिटभर परतावे. मग चिरलेला टोमाटो घालावा. तो मऊ झाला की त्यात मोड आलेले शिजलेले मुग घालावेत. ही उसळ पातळ फावी असेल तर थोडे पाणी व चवीनुसार मीठ घालून छान उकळी आणावी. कोथिंबीर घालून छान सजवावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    व्हिटॅमिन भेळ
    साहित्य - १०० ग्रॅम मोड आलेले मूग, १०० ग्रॅम मोड आलेले हरभरे, १०० ग्रॅम मोड आलेली मटकी, २ गाजर, ८-१० फ्रेंचबिन्स, २ बटाटे, ४ मोठे टोमॅटो, २ काकड्या, २ कांदे, बारीक शेव आणि कोथिंबीर.
    हिरवी चटणी - ८-१० हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, १ वाटी डाळ्या, १ वाटी पुदिन्याची पानं, मीठ आणि साखर हे मिक्सरमध्ये बारीक वाटावं.
    कृती - सर्व कडधान्यं थोडं मीठ घालून वेगवेगळं वाफवून घ्यावं. गाजर, फ्रेंचबिन्स, बटाटे वाफवून घ्यावे. टोमॅटो-कांदे-काकडी-कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत. डिशमध्ये आधी उसळी, भाज्या, हिरवी चटणी क्रमानं घालावी. बटाट्याच्या फोडी घालून कांदा-काकडी-टोमॅटोचे काप पेरावे. बारीक शेव आणि थोडा चाट मसाला पेरून ही भेळ लगेच खाण्यास द्यावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    हुलगा उसळ
    साहित्य : मोड आलेला हुलगा २ वाटया, कांदा कापलेला १ छोटा, सुके खोबरे वाटून २ मोठे चमचे, लाल तिखट, मीठ, गुळ चवीप्रमाणे, नेहमी भाज्यांसाठी वापरतो तो मसाला दीड चमचा, तेल २ छोटे चमचे, फोडणीचे साहित्य.
    कृती : मोड आलेला हुलगा थोडेसे पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. कढईत फोडणी तयार करून त्यात कांदा, वाटलेले खोबरे हे सर्व परतून घ्या. नंतर उकडलेला हुलगा घालून परत. मसाला तिखट, मीठ, गुळ चवीप्रमाणे घालून चांगली उकळी आल्यानंतर बंद करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    डाळींबी भात
    साहित्य:- १/२ कप मोड आलेले व सोललेले वाल, कप तांदुळ(स्वच्छ धुतलेले), ४ हिरव्या मिरच्या+४ लसुण पाकळ्या ठेचुन, १ १/२ टीस्पून गोडा मसाला, १ १/२ टीस्पून धने पुड
    १ टीस्पून जिरे पुड, २ टेबलस्पून गुळ, ३/४ कप नारळाचे दुध, १ १/४ कप पाणी, चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी
    फोडणीसाठी साहित्य :- २ टेबलस्पून तेल, कढीपत्ता, १/४ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हळद,.
    कृती:- कुकर मध्ये तेल गरम करून फोडणी करा. फोडणीत मोड आलेले वाल, मिर्ची व लसणीचा ठेचा घाला. एक वाफ आणा. नंतर त्यात तांदुळ घाला आणि परता. मग त्याचात धने-जीरे पुड, गोडा मसाला, मीठ, नारळाचे दुध आणि पाणी हे सर्व साहित्य घाला. एक उकळी आली की कुकरचे झाकण लावुन २ शिट्ट्या द्या आणि नंतर मंद आचेवर भात शिजू द्यावा. ५-७ मिनिटांनी आच बंद करावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 2, 2017


  • p-3026-shegaon-kachori

    शेगाव कचोरी

    साहित्य:
    सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप
    १ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ.
    आवरणासाठी: २ वाट्या गव्हाचे पिठ,३-४ चमचे तेल,पिठ भिजवण्यासाठी पाणी,चवीपुरते मीठ,तळण्यासाठी तेल.

    कृती:
    १) मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. भिजवलेली मूगडाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन १ वाटी पाण्यात उकळवावी. उकळवताना गॅस मध्यम असावा आणि पातेल्यावर झाकण ठेवावे. मूगडाळ अगदी नरम शिजवू नये. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे. नंतर मूगडाळ थोडी चेचून घ्यावी.
    २) गव्हाचे पिठाची कणिक भिजवावी. अगदी घट्ट किंवा अगदी सैल भिजवू नये. कणिक झाकून ठेवावी.
    ३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, आले पेस्ट, मिरच्या/लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यानंतर मूगडाळ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, मीठ, साखर घालून ढवळावे. सारण थंड होवू द्यावे. हाताने एकत्र करावे म्हणजे ते मिळून येईल.
    ४) कणकेचे दोन-दोन इंचाचे गोळे करावे. गोल पुरीसारखे लाटावे. पुरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्यात एक चमचा सारण घालावे आणि सर्व कडा एकत्र आणून व्यवस्थित बंद करावे. हे करत असतानाच तळणासाठी कढईत तेल गरम करत ठेवावे. मिडीयम हाय हिटवर कचोर्या गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून काढाव्यात. या कचोर्या गरम असतानाच खाव्यात. थंड झाल्यावर चव फार चांगली लागत नाही.
    या कचोर्या कोथिंबीर-पुदीना मिरचीच्या चटणीबरोबर किंवा चिंच खजूराच्या चटणीबरोबर अगदी झकास लागतात.

    टीप:
    १) गरम मसाल्याबरोबर २ चमचे गोडा मसाला (काळा मसाला) वापरल्यास चव छान येते.
    २) आवडत असल्यास सारण परतताना काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकतो.

      August 7, 2018


  • वालाचे बिरडे

    साहित्य: २ वाटी मोड आलेले सोललेले वाल, २ चमचे जिरे, लसूण ८-१० पाकळ्या, अर्धा इंच आले,कोथिंबीर अर्धा वाटी, हळद अर्धा चमचा, तिखट २ चमचे, हिंग, कढीपत्ता, मोहरी, कांदा १, कोकम ४ तुकडे, अर्धी वाटी तेल, आले खोबरे रस १ वाटी, मीठ, १ चमचा, साखर १ चमचा

    कृती: २ वाटी वाल ताटात घेऊन त्यावर हळद, तिखट, जिरे, लसूण, आले कोथींबीरची पेस्ट लावून ५ मिनीटे ठेवून द्यावी. प्रेशर कुकरमध्ये १/२ वाटीतेल टाकून त्यामध्ये हिंग, मोहरी, कडीपत्ता टाकावा नंतर बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. त्यावर वालाचे मिश्रण फोडणीस टाकून परतून घ्यावे. वाल बुडतील इतके त्यात पाणी टाकून कूकरचे झाकण लावावे. १ शिटी झाल्यावर गॅस बारीक करुन दीड मिनीटांनी तो बंद करावा. वाफ बसल्यावर त्यांत कोथिंबीर, वाटलेले खोबरे रस, मिठ, साखर, कोकम टाकून २ वाटी पाणी टाकून उकळवावे. (कृती साठी अंदाजे वेळ १५ ते २० मिनीटे)

    - श्रीमती कांता जयंत गुप्ते

    ५१ सीकेपी पाककृती व सण-वार या पुस्तकातुन

      September 10, 2026