(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मॅक अॅण्ड चिझ पास्ता

    सर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे. त्यानंतर दुसर्‍या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे. त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. मॅक अॅण्ड चिझ पास्ता तयार.

      April 17, 2016


  • p-2376-fruit-salad

    फ्रुट सलाड

    १ मध्यम केळं, १ लहान सफरचंद, १ मध्यम संत्र, १/२ कप द्राक्षं, १/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे, ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू, १/२ कप कंडेंन्स मिल्क, १/२ कप दूध.

      April 29, 2017


  • गव्हाचा चीक

    साहित्य - अर्धी वाटी गव्हाचं सत्व, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 चमचे जिरे, कोथिंबीर, मीठ, ताक आणि साखर.

    कृती - मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. गव्हाच्या सत्वात दीड वाटी पाणी, एक वाटी ताक आणि मीठ-साखर घालून ते व्यवस्थित कालवून घ्यावं. एका जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण शिजायला ठेवावं. आधी 3-4 मिनिटं मोठय़ा गॅसवर आणि नंतर बारीक गॅसवर हे मिश्रण शिजू द्यावं.
    मिश्रण शिजताना ते सतत ढवळत राहावं. त्याच्या गाठी होऊ देऊ नये. मिश्रण रटरटत घट्ट झालं की त्यात जिरे, मिरच्या, कोथिंबीर घालून एक-दोन मिनिटं ते शिजू द्यावं. गॅस बंद करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 2, 2017


  • p-3000-kothimbir zunka

    कोथिंबीर झुणका

    साहित्य:
    ३/४ कप बेसन + ३/४ कप पाणी (मिक्स करावे, गुठळ्या मोडून घ्याव्यात.)
    २-३ टेस्पून तेल
    फोडणीसाठी: १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
    ७-८ लसूण पाकळ्या, जाडसर चिरून
    १ मोठा कांदा, बारीक चिरून
    ३-४ हिरव्या मिरच्या (मध्यम तिखट)
    १/२ कप चिरलेली कोथिंबीर
    चवीपुरते मीठ

    कृती:
    १) बेसनचे मिश्रण तयार ठेवा. त्यात मीठ घालून चव पहा.
    २) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालून लालसर परतावी. नंतर मोहोरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून परतावे. कांदा लालसर होईस्तोवर परतावे.
    ३) कांदा छान परतला गेला की त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. १५-२० सेकंद परतावे. आच मंद करून भिजवलेले बेसन घालावे. सारखे ढवळावे. गुठळ्या होवू देऊ नयेत.
    कढईवर झाकण ठेवून बेसन मंद आचेवर शिजू द्यावे. मध्येमध्ये ढवळावे म्हणजे करपणार नाही. साधारण ५-८ मिनिटात झुणका तयार होईल. शिजलेला झुणक्याचा रंग लगेच कळून येईल.
    गरम झुणका भाकरी किंवा पोळीबरोबर वाढावा.

    टीप:
    १) झुणक्यासाठी थोडे जास्त तेल लागते. तेल कमी घातल्यास झुणका मोकळा होणार नाही.

      July 19, 2018


  • p-1076-kelyacha-shahi-halwa

    पिवळ्या रंगाचे पदार्थ

    पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या कल्पना सत्यात उतरवायला मदत करतो.

      March 22, 2017


  • बीटाची कोशिंबीर

    सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

      April 20, 2016


  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/09/modak-intro-300.jpg

    गणपतीचा प्रिय खाऊ – मोदक….

    मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा - साजूक तुपाच्या धारेबरोबर - शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर पहिल्या जेवणात नैवेद्ध म्हणून असतातच. प्रत्येक घरात गृहिणीनी बनवलेले मोदक, याची एक वेगळीच चव असते. काही जणी तर साचा न वापरता मोदकाच्या पाकळ्या खूप सुंदर करतात.

    मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ. इतर वेळी चतुर्थी सोडल्यास मोदक सहसा कोणी करत नाही, पण गणपतीचे १० दिवस मात्र सर्व जण आवर्जून तो करतात.

    मोदक हे भारताच्या पश्चिम, पूर्व व दक्षिण किनारपट्टीवर स्थानिक पक्वान्न म्हणून प्रसिद्ध आहेतच. संस्कृत व मराठी प्रमाणेच ओरिया, गुजराती व कोंकणी भाषेतही त्यांना 'मोदक'च म्हणतात. तमिळ 'मोदक' वा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'क़डबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' म्हणतात. उकडीचे मोदकाप्रमाणेच पण टोक व मुखऱ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कौळकटै हे केरळ व दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूत हे कोळकटै गणपतीचाच नेवैद्य मानले जातात.

    तसेच ओरिसा, आसाम, बंगाल येथे तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात. आज बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक उपलब्ध आहेत.

    सादर करत आहे मोदकाचे विविध प्रकार..

    -- संजीव वेलणकर , पुणे
    ९४२२३०१७३३

      September 4, 2016


  • p-2074-cheese-corn-ball

    चीज कॉर्न बॉल

    सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करावं. मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यावेत. तयार केलेले गोळे गरम तेलात सोनेरी होईर्पयत तळून घ्यावेत. हे गोळे टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत गरम गरम खाता येतात.

      June 11, 2017


  • carrots-bunch-300

    गाजर – निसर्गाची अमूल्य देणगी

    गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते. संस्कृतमध्ये शिखाकंद इंग्रजीमध्ये कॅरट लॅटिनमध्ये डॉक्स कॅरोटा या नावाने परिचित असलेले गाजर अंबेलिमेरी या कुळातील आहे. गाजराचे अनेक प्रकार आहेत. त्यात देशी गाजराचा रंग गडद गुलाबी असतो; तर विलायती गाजराचा रंग हा फिकट गुलाबी असतो.

      January 11, 2017


  • मोड आलेल्या मेथीची खिचडी

    साहित्य : दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी मोड आलेली मेथी, हिंग, मोहरी, हळद, तिखट, तेल, वाटणासाठी एक लहान कांदा उभा चिरलेला, 6-7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आले, पाव वाटी किसलेले सुके खोबरे.

    कृती : तांदूळ धुऊन ठेवा. आले, लसूण, खोबरे तेलावर खरपूस भाजून नंतर त्याचे वाटण तयार करा. तेलात हिंग, मोहरी घालून फोडणी करा. त्यात मोड आलेली मेथी घालून परता. नंतर त्यात धुतलेले तांदूळ, तिखट, हळद, मीठ घालून पुन्हा परता. मग त्यात वरण घालून परता. तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून शिजवा. सर्व्ह करताना ओले खोबरे व कोथिंबीर घालून सजवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 22, 2017