(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निसर्गाची आनंदासाठी मदत

    कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी

    उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी

    तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य

    कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि

    मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला

    घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा

    विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी

    निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान

    करी त्यास मदत, आनंदी होण्या जीवन

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 14, 2019


  • तिच्या वरील माझे प्रेम

      January 18, 2014


  • श्रावण सरी….!!

    || हरी ॐ ||

    आल्या आल्या श्रावण सरी,
    अवचित करिती चिंब परी !

    उन पावसाच्या खेळ हा,
    सप्तरंगी पडदया आड हा !

    रत्यांवर हिरव्या पानांचा सडा,
    दिसतो जसा हिरवा सरडा !

    सख्या निघाल्या खेळाया ह्या,
    जमवून बाहुलीचे लग्न त्या !

    रानीवनी मुक्त हिंडती !
    लग्नासाठी जागा निवडती !

    जंगलातील रस्ता निसरडा !
    तरी नसे मना मुरडा !

    बाहुला आला, सर्व लवाजमा सजला,
    अंतरपाठ सप्तरंगी मिळाला !

    लग्न लागताच श्रावण सर आली,
    ऐतीच वाजंत्री वाजू लागली !

    वार्यानेही साथ दिली,
    वेणूनेही लाज राखली !

    रंगीबेरंगी फुलांच्या माळा,
    नवरा-नवरीच्या पडल्या गळा !

    घरी जाया बाहुली निघाली बाहुल्या,
    डोळ्यांच्या कडा पाणावल्या !

    अवचित येता श्रावण सरी,
    न दिसे डोळा पाणी परी !

    जगदीश पटवर्धन

      August 16, 2017


  • गतकर्माची विस्मृती

    एके दिनीं निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा

    प्रवास माझा अनंतात कसा असेल त्या वेळेचा

    आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन

    'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन

    बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी

    सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी

    पूनर्जन्म घेण्याकरितां गर्भाची निवड करीन

    गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय जीवन जगेन

    शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची

    नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 11, 2016


  • मनसंवेदना

    जीवनामध्ये जेंव्हा जेंव्हा
    कधीही विश्रांतीसाठी...
    थोडसं हळूच पहुडावं...!
    एकांतात डोळे मिटावेट....
    अन फक्त तूच दिसावीस....!
    असं सततच घडत असतं...
    प्रितीत अनावर ओढ़ असते...!
    हेच मात्र खरं ....!!
    तू जरी असलीस दूरदूर...!
    तरीही तुझा स्पर्शभास जाणवतो ...
    मनांतरांची मुक्तमुग्ध भेट होते ....!
    खरच किति विलक्षण असते निर्मल सत्यप्रितीची ओढ...
    अनाहत , अलवार , ध्यास, भास, मानसस्पर्श , भावनां ....!!
    दयाघनांन या संवेदना दिल्या आहेत हे खरं ....!!
    पण जर या प्रीतमनभावनांबरोबरच...!
    सत्यस्पर्शभासाचे वरदान दिले असते तर ...?
    हा प्रीत दुरावा कधीच जाणवला नसता ....!
    जरी कुठेही असलो आपण तरी एकत्रच असतो .....!
    पण या साऱ्याच मनासक्तीच्या कल्पना आहेत..!
    या साऱ्या क्षणांवर फक्त एक अनामिकाची अदृष्य सत्ता आहे..!!
    आणि केवळ त्या दयाघनाची आहे..!!!
    पण आपण इदं न मम असे म्हणत ,
    सत्कर्माचे संचित रचता रचता
    केवळ त्याच अनामीकला भजत रहावे एवढेच आपल्या हातात आहे...!!!
    हे मात्र खरं...!!!!

    ©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
    रचना क्र. ६० (मुक्तरचना)
    दिनांक ३-४-२०२१
    ?9766544908

      May 24, 2021


  • निरोप द्या आतां (राघवाची गाथा)

    राम : ( दशरथाला) –
    शोक आवरा अपुला, आणिक निरोप द्या आतां
    करील तुमची वचनपूर्ति हा सुत मोदें, ताता ।। १

    ब्रीद हेंच आपुल्या कुळाचें –
    ‘वचन दिलेलें पाळायाचें’
    माझ्या प्रेमापोटीं कां कर्तव्याला चुकतां ? २

    वचनपूर्तता तुमची व्हाया
    सिद्ध असे मी वनात ज़ाया
    भाग्य म्हणूनच मला लाभला तुम्हांसमान पिता ।। ३

    पुत्रनीति जी आहे सक्षम
    पितृसुखा ती देइ अग्रक्रम
    गुरुजन, ज्ञानी, मुनी दुजोरा देती याच मता ।। ४

    लोभ नसे राज्याचा मजला
    पहा मुगुट हा लगेच त्यजला
    राहो आनंदात त्यामुळे कैकेयी माता ।। ५

    नको रडूं कौसल्या-माते
    तात विनंती, पुसा नयन ते
    राज्य अयोध्यानगरीचें भोगो माझा भ्राता ।। ६

    द्या भरताला हें सिंहासन
    वराप्रमाणें, द्या मजला वन
    यत्न फोल हा थांबविण्यांचा मज जातां-जातां ।। ७

    दिनरातीं मज नका आठवूं
    कुणां भेटण्यां नका पाठवूं
    चौदा वर्षें झाल्यानंतर येइन मीच स्वत: ।। ८

    आशिष गुरुजन-आप्तेष्टांचे
    चरण वंदुनी निजमातांचे
    निघतो मी तात्काळ काननीं, क्षणहि न घालवितां ।। ९

    ही मज वाटत नाहीं शिक्षा
    सुतधर्माची आज परीक्षा
    लागल्यास अर्पीन प्राण, राज्याची काय कथा !! १०

    - सुभाष स. नाईक

      April 22, 2021


  • जयवंत दळवींच्या संध्याछाया नाटकाचा पहिला प्रयोग

    जयवंत दळवी यांचे संध्याछाया हे मराठी रंगभूमी वरील खुप गाजलेले नाटक. ९ डिसेंबर १९७३ रोजी संध्याछाया नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

      February 20, 2019


  • नाते

    विसरून आठवांच्या पाऊली
    तू असा येतोस कां?
    तुझे नी माझे नाते
    आतातरी सांगशील कां?।।

    दिवस हे चालले असे
    ऋतु हे प्रसवती जसे
    श्वास हे जगता जगता
    आंसवे ही झरतात कां?.

    जल जीवनी वाहिले असे
    मनभाव सारे विरले जसे
    निर्माल्य सहज होता होता
    भावतरंग मनी जागतात?

    दैवयोगे, मनप्रीत उमलता
    मूकमनभाव गुंतता गुंतता
    प्रीतसुगंध दरवळता दरवळता
    भावकळ्या तू तोडल्यास कां?

    विसरून आठवांच्या पाऊली
    तू असा येतोस कां?
    तुझे नी माझे नाते
    आतातरी सांगशील कां?।।

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ११९.

    १८ - ४ - २०२२

      May 3, 2022


  • मैत्रगंध

    उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती.

      December 3, 2025


  • भावनेच्या आहारीं ।

    नको बनूस अविचारी

    जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।

    प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले

    विवेक करण्या मनी यश तुला साधले

    नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची

    विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची

    नको बनूस अहंकारी ।।२।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी

    राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी

    नको जाऊस दारोदारी ।।३।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी

    ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी

    कां मनाचा गोंधळ करी ।।४।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      September 5, 2018