वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला ।

शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला ।।१।।

जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती ।

झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती ।।२।।

किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे ।

रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते. ।।३।।

विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर ।

राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर ।।४।।

पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे ।

पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते ।।५।।

संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी ।

परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी ।।६।।

घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर ।

आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार ।।७।।

सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे ।

कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे ।।८।।

फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती ।

मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती ।।९।।

चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना ।

शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना ।।१०।।

गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे ।

आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे ।।११।।

वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली ।

अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली ।।१२।।

चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची ।

लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची ।।१३।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author