शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो
गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो
अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही
अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो
शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत
क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो
आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा
उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो
ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा भरोसा
अंधारास फितूर होणाऱ्या सावल्या विकाया शिकलो
साक्षात्कार जरी मोक्षाचा आहे मृत्यूस चुंबल्यानंतर
सुखी माणसाचा नागव्याने सदरा विकाया शिकलो
रजनीकान्त
March 19, 2018
देहमनाचा आनंद औरची, नसे तयाला दुजी कल्पना ।
जीवनामधले मिळता सारे, उरे न तेथे कसली तुलना ।।
आनंदाचा घट भरूनी हा, तन मन देयी पिण्यासाठी ।
आनंदाला नसे सीमा मग, अनेक घट अन् अनेक पाठी ।।
एक घटातूनी आनंद मिळता, दुजे घट हे जाती विसरूनी ।
अनेक घटांतील आनंद हा, लूटाल कसा तृप्त होवूनी ।।
दुजामध्ये समरस होवूनी, लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा ।
‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो, आनंद घटाचा भव्य पसारा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
आठविते ते सारे आता
स्मृतींचीही कमाल आहे
गात्रे जरी झाली मलुल
मन, मात्र उत्साही आहे
अनुभवलेले जीवन सारे
जपुन पाऊले टाकित आहे
काय मिळाले अन हरविले
आता विसरून गेलो आहे
घडायाचे ते ते घडूनी गेले
अजूनी काय घडणार आहे
अंतरात वादळ गतस्मृतींचे
आज मात्र घोंगावते आहे
ललाटीच्या त्या रेषा साऱ्या
संचिताचे भगवंती दान आहे
आता व्हावे केवळ अंतर्मुख
विरक्तित खरा आनंद आहे
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.१४२.
२६ - ५ - २०२२.
June 11, 2022
पहाट उमलली नवी
किरण झाकले धुक्यात..
चमकतो दवाचा मोती
हिरव्या पानांच्या शिंपल्यात...
तेजस्वी लालबुंद रवी
विराजला निळ्या नभात..
दुतर्फा वेलींची कमान
झुकली फुलांच्या बहरात..
केशर काया गुलमोहर
आला सडा शिंपीत..
भिरभिरते फुलपाखरू
रंग मखमली पंखात..
मधुर गुंजण भ्रमराचे
फुला फुलांच्या कानात..
पक्ष्यांचे थवे चालले
नक्षी भरण्यास अंबरात...
किमयागार चित्र रेखितो
चोहीकडे विश्व रुपात..
सुख दिसावे दृष्टीस
कोणता रंग कुंचल्यात?
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 15, 2026
धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत
विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत.....१
चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही
चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही....२
थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा
निद्रा असो वा चिर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा....३
थकून जाई शरिर जेंव्हां, प्रयत्न करि ते विश्रांतीचा
चैत्यन्य आत्मा देह सोडूनी, घेई आसरा पुन्हा दुजाचा....४
आत्मा देखील थकून जाता, परमात्म्याशी विलीन इच्छीतो
चैतन्यातूनी विश्रांतीचा ‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 18, 2019
मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला
कुज बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला
त्या सुरात कोणती जादू
ती किमया कशी मी वदू
सप्त सुरांचा निनाद उठुनी
खेचून घेती चित्ताला – - -
विसरली राधा सर्वाला
धेनु वत्से बावरली
बाल गोपाल आनंदली
रोम रोम ते पुलकित होऊनी
माना डोलती सुरतालाला – - -
विसरली राधा सर्वाला
प्रभूचा होता ध्यास मनी
ती बघे हरिला रात्रन दिनी
जे शब्द निघाले मुरलीतूनी
हाका मारती ते तिजला – - -
विसरली राधा सर्वाला
हरिच्या ओठ्ची भाषा
सुरात ऐकता येई नशा
तो नाद एकला कानी पडता
भाव समाधी लागली तिजला - – -
विसरली राधा सर्वाला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 6, 2019
असाचं हसत जा,
जणू काही हरवलंच नाही,
डोळ्यांतल्या सावल्या
हसण्याच्या आड लपवत जा.
जखमा दिसू नयेत म्हणून
हसू शस्त्रासारखं वापरत जा,
प्रत्येक “मी ठीक आहे”मध्ये
थोडंसं स्वतःला विसरत जा.
लोकांना हसरा चेहरा हवा असतो,
आतला आवाज कुणाला ऐकायचा नसतो,
म्हणून असाचं हसत जा,
तुटलेलं मन सावरत जा.
कधी तरी मात्र
या हसण्यालाही दम येईल,
त्या दिवशी शांतपणे
स्वतःलाच थोडंसं भेटून जा.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
July 3, 2026
वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला
राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला
लहानपणी एक डाव मांडीला नवरा नवरी लग्न सोहळा
भातुकलीच्या खेळा मध्ये राधिकाने राम शोधीला
वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला
राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला
गाठ मनाशी मारुनी माझ्या घनशाम तू कुठे निवळला
वाट बघते वृंदावनी डोळे मथुरे्च्या बाजारी रमला
वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला
राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला
देठ पिवळा झाला एव्हाना राधा शोधीत आली कान्हा
वैकुंठाशी जाइ पूनिता अखेरचा सूर पडती काना
वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला
राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला
देवाचा तो देवही रडला बासरी तोडून तीरी बैसला
येईल राधा पुन्हा पाण्याला अश्रूंची घागर भरीत राहिला
वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला
राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला
मधु दारसेवाड......
May 31, 2022
चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या ।।१।।
निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं ।।२।।
चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची ।।३।।
आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
मध शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे ।।४।।
सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी ।।५।।
हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी
क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 26, 2018
June 12, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti