(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भोग

    तुला जाणवल कसं
    माज जगणं, सोसणं
    वाट पाहून राह्यले
    कधी सरल ह्ये जिणं
    घाम गाळू तरी किती
    किती जुंपू गं कामाला
    दिस सरूनही जातो
    थार नाही गं जीवाला
    तुज्या अंगणी सडा गं
    जाई जुई चमेलीचा
    कशी गुंफू केसात गं
    गुंता घामाच्या बटांचा
    सण येती आणि जाती
    बाया जिवाने नटती
    बघू बघू तुटती गं
    काया उनात रापती
    कधी लेऊ नवा साज
    मोडू साडीची घडी गं
    उतरण लेऊन गं
    विटे काळीज काळीज
    कदी सरलं ह्ये भोग
    कदी जगू नवं जग
    सार कळूनही मना
    वेडी आशा घेई रंग !
    -- वर्षा कदम.

      November 12, 2021


  • भावनेस हसती विचार

    भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
    तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,

    भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
    बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२

    आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
    आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३

    इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
    तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४

    काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
    विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 14, 2017


  • ।। जीवन आहे एक कल्पवृक्ष ।।

    जीवन आहे एक कल्पतरु
    मिळेल ते, जे विचार करुं
    ही आहे सुवर्ण माती
    उगवेल ते, जसे पेरती ।।१।।

    राग लोभ अहंकार
    मोठेपण भासविणार
    दाखवूनी क्षणिक सुख
    देई पर्वतमय दुःख ।।२।।

    दया क्षमा शांति
    उच्च भावना असती
    बिंबता हे सद् गुण
    लाभेल खरे समाधान ।।३।।

    घाणीच्या राशी पडती
    निराशा व दुःखची वसती
    स्वच्छता व निर्मळ घर
    तेच सर्व सुखांचे माहेर ।।४।।

    आपला आपण चालक
    कर्म फळाचा मालक
    सुख दुःखे येती
    तेचि आपली निर्मिती ।।५।।

    प्रयत्न सारे तुमचे हातीं
    श्रद्धा ठेवावी ईश्वरावरती
    योग्य करितां प्रयत्न
    यशाचे मिळेल रत्न ।।६।।

    जेथे प्रसन्न वातावरण
    तेथे ईश्वरी आधिष्ठान
    समजावे देवूनी लक्ष्य
    जीवन आहे एक कल्पवृक्ष ।।७।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      August 20, 2018


  • गीता – जीवनाची एक उकल

    रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी
    जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ//

    अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती
    सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी
    कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते
    सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते त्याची
    तूं आहेस अर्जुना सोंगटी प्रभू ईच्छे फिरे पटावरी //२//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कर तूं, नसे तुझे ते कर्म हा आहे केवळ प्रभूधर्म
    सोडून द्यावीस फलआशा न येई केव्हां तुज निराशा
    तत्वे सांगुनी आर्जुनासी संशय त्याचा दूर करी //३//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    विचार कर तूं आहेस कोण जाणार कोठे, येई कोठून
    चक्रे फिरती अनेक तूं आहेस त्यातील एक
    स्वतंत्र असूनी कांही अंशी अवलंबून तूं दुजावरी //४//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    गीता सांगे अपूर्व ज्ञान जीवनाची करी उकलन
    प्रश्न त्यांचे सारे सुटती आत्मचिंतन जेव्हां करिती
    केवळ समजतां गीतेला खरें समाधान लाभे उरीं //५//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@mail.com

      January 27, 2019


  • संकोचलेले मन

    मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।

    रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।

    एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।

    सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।

    सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।

    दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।

    तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।

    परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।

    केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।

    संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।

    डॉ, भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 31, 2020


  • एकापेक्षा एक

    झी' ने एक अनाऊन्समेंट केली,
    ऐकून मनाची चलबिचल झाली,
    भाग घ्यायची मी तयारीच केली,
    कारण स्पर्धा होती .... एकापेक्षा एक "आजी" आली |

    हे आणि मुल म्हणे,
    अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ,
    'महागुरुंच्या' डोळ्यात मावेल कां हा 'ढग' ?
    पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट,
    म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप |

    काय नशिब पहा, चक्क मी झाले 'सिलेक्ट'
    आणि कोरीओग्राफरकडे शिकले, डान्स परफेक्ट |
    पडले, गडबडले तरी नाही बाळगली तमा,
    स्पर्धेसाठी शरीराचा, उतरवला होता न विमा |

    बुधवार गुरुवार माझा 'सेफ' झोन प्रत्येक,
    महागुरुंकडून मिळवले, रुपये 'शंभर' कित्येक |
    एकेक करुन गाठली 'महाअंतीम' फेरी
    घरच्यांनी घेतली होती SMS ची जबाबदारी |
    बघता बघता निकालाचा 'क्षण' येऊन ठेपला
    म्हटल दोन लाखांचा चेक नक्कीच 'आपला' |

    हातातला कागद आता महागुरुंनी वाचला,
    आणि विजेती आजी आहे.... आजी आहे.....
    ऐकून, सार स्टेज गरागरा फिरल,
    पडता पडता मला, कुणी तरी धरलं |

    डोळ्यावर सपकन पाणी मारलं,
    झाली वाटतं जागी, कानानी हेरलं
    बाजूलाच उभे होत 'महागुरु' घरचे,
    स्वप्नच कां शेवटी, "बिच्चारा आजीचे" |

    -- सौ. अलका वढावकर

      July 26, 2016


  • प्रेम नाणे

    तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं
    अपेक्षा करता तुम्हीं प्रेमाची, सदैव इतरांकडूनी...१,

    सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या तुमच्या जीवनीं
    क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी...२,

    प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला
    प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला...३,

    याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे
    दोन मनें ती सांधली जावूनी, आनंद सर्वत्र दिसत असे...४,

    राग लोभ हे शत्रू आपले, घालवूनी घ्यावे तुम्ही त्यांना
    प्रेम नाण्याची मदत घेता, सहज जमेल हे सर्वांना...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 15, 2018


  • बाळ चिमुकले

    बाळ चिमुकले,
    गोड हासले,
    रांगत आले ,
    पायाला धरुनी,
    उभे राहिले,
    बाळकृष्ण ते,
    मला भासले, --
    वदनांतून कोवळे,
    ध्वनि उमटले,
    बोबड्या स्वरांनी,
    मज जिंकीयले,
    उचलून घेता ,
    कसे आनंदले,
    हात हलवून ,
    मज कुरवाळले,
    कोण लहान,
    मग वाटले,
    कुशीत त्याच्या,
    मीच शिरले ,
    हलके हलके,
    त्याने थोपटले,
    गा,---गा कर ,
    मज म्हणाले,
    निश्चिंत जीव,---!!!
    निश्चिंत मन ,-----!!!
    मज विश्वरूपदर्शन,
    अलगद घडले,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 27, 2019


  • एकाग्रतेने जगा

    जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली ।

    चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली ।।

    जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे ।

    अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे ।।

    विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता ।

    बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता ।।

    असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी ।

    नशीबाला परी दोष न देता, चालत राहा एकाग्रतेनी ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 10, 2018


  • शारदेस विनंती

    हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
    लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।

    दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
    कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।

    दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
    उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।

    तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
    पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।

    जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
    अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 12, 2017