November 23, 2021
July 5, 2013
सासुरवाशिण
July 7, 2010
हवे तेच बोलता मी
जमाया लागले लोक
सत्य सांगू लागताचि
उठू लागे एक एक।
...मी मानसी
May 16, 2020
जगती, नित्य सदविवेके
चालत रहा, चालत रहा
मुलमंत्र, हाच जीवनाचा
सत्कर्म, सदा करीत रहा।।
विधिलिखित सारे जीवन
प्राक्तनाच हा भोग आम्हा
सुखदु:खांच्या सावलीतूनी
स्वानंद,समाधान घेत रहा।।
जन्मी, भाळी जे जे लाभले
त्यात समाधान मानीत रहा
निराशावादी कधी राहु नये
मनी, आशावाद जपत रहा।।
सत्संगे, पापांचे होते क्षालन
उतम सहवासात, सदा रहा
जीवन, खेळ कठपुतळीचा
प्रभुरामाचे रामनाम घेत रहा।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०९.
१० - ४ - २०२२
April 26, 2022
May 27, 2022
वेलींना आधार होता,
वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला,
कोसळणार मग कधीतरी
नष्ट करिल तरूवेलींना,
धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी,
सारे कांहीं विसरूनी जाता
वेलींनो आणि झुडपानों,
सोडूनी घ्या आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,
स्वावलंबनाचे टाका पाऊल
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 19, 2016
या तीन दिवसात सगळेच शिकलो काटकसर करायला.
शंभर ची नोट खर्च करायची असते... पण जीवावर येते मोडायला.
आता असं वाटतंय शंभर रुपयातही तीन चार दिवस जगणं इतकं काही कठीण नाही.
साधेपणाने जगण्याची वेगळीच नवलाई.
वरखर्च, टॅक्सी सगळ्यावरच बसलाय आळा,
बचतीची या दिवसात सगळीकडेच भरली आहे शाळा.
नोटांसोबत बदलले लोकांचे आचार विचार,
काळया पैशाचा शेवटही काळाच... आणि लाचार.
सुखाने जगा समाधानाने झोपा, करु नका बेईमानी,
याच संदेशाने संपवते छोटीशी ही कहाणी.
November 13, 2016
शंभर वर्षे जगा तूम्हीं, काका आमच्यासाठीं
बाबांच्या रुपांत रहा, तुम्ही सर्वांच्या पाठीं
भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे
तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे
उशीर झाला होता, जेंव्हा जीवन उमगले
कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले
आंबा गेला मोहरुनी, लाविली होती त्यांनी झाडे
दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे
मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां
रंगवूनी बाबांची भूमिका पूर्ण करां ते आतां
चालू ठेवा मार्गदर्शने, तुम्हीं आपल्या घराण्याची
जोपासण्या शिकवा तुम्ही, जीवनाविषयीं तत्वें त्यांची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 31, 2019
February 27, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti