तन मनातील तफावत

देह मनाच्या वया मधील, तफावत ती दिसून येते
चंचल असूनी मन सदैव, शरिर परि बदलत राहते...१,

चैतन्ययुक्त ते मन सदा, स्थिर न राहते केव्हांही
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,

परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो
शरिराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,

दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही
परि शरिराचा दुबळेपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४

विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५

-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

देह मनाच्या वया मधील, तफावत ती दिसून येते
चंचल असूनी मन सदैव, शरिर परि बदलत राहते…१,

चैतन्ययुक्त ते मन सदा, स्थिर न राहते केव्हांही
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२,

परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो
शरिराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो…३,

दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही
परि शरिराचा दुबळेपणा, मनास त्याक्षणी साथ न देई….४

विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे…५

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author