(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हवेत हा गारवा

    वाढता हवेत हा गारवा
    बाजारी चिंच,बोरे,आवळा
    ऊस नी हिरवा हरबरा
    खाण्या हा जीव होई बावळा

    सांजवात होताच शेकोटी
    पेटवू उब मिळविण्यास
    फड रंगे गप्पांचा भोवती
    चहा रिचवावा हाच ध्यास

    पहाटे चला जाऊ शेतात
    भरित मेजवानी जोमात
    जोडीला हुरडा असावाच
    हवेत हा गारवा झोकात

    -- सौ. माणिक (रुबी)

      December 5, 2019


  • दुष्काळ

    आला म्हणती तो काळ
    असा पडतो दुष्काळ ||धृ ||

    नसते पिण्यास पाणी
    नसते खाण्यास धान्य
    नसते रानात पळपळ
    नसते वनात सळसळ ||१||

    मरती भूकेली गुरंढोरं
    पडती आजारी पोरंसोरं
    होई जीवांची तळमळ
    रडते कडेवर ते बाळ ||२||

    मोकळी झालेली गव्हाण
    दु:ख धरतीचं आंदण
    होई ओसाड तो माळ
    राती भेटेना सकाळ ||३||

    कुठे घडतेय माळीण
    कुठे गुडूप किल्लारी
    कुठे तहानेने व्याकूळ
    होई उध्वस्थ गोकूळ ||४||

    असं माणसाचं जिण
    जरा रहावेस जपून
    माणसातील माणसा
    कर पशूपक्षी सांभाळ ||५||

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि. बीड
    मो. ९४२१४४२९९५

      October 23, 2019


  • भावनेच्या आहारीं 

    नको बनूस अविचारी

    जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।।

    प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले

    विवेक करण्या मनी यश तुला साधले

    नको घेऊं ऊंच भरारी ।।१।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची

    विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची

    नको बनूस अहंकारी ।।२।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी

    राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास गमवूनी

    नको जाऊस दारोदारी ।।३।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    प्रयत्न करिता यश मिळे विश्वास ठेवा मनी

    ज्ञानानी प्रश्न सुटती सगळे महत्व घे तूं जाणूनी

    कां मनाचा गोंधळ करी ।।४।।

    जाऊनी भावनेच्या आहारी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 21, 2020


  • डाग!

    कितीही देशी शीतल चांदणेX

    आनंदाचा ठरुनी मेरुमणी

    काट्यापरि हा मध्येंच बोचतो

    डाग तुझा लक्ष्य खेचूनी

    ठाऊक नाहीं कधीं कुणाला

    कसा लागला डाग उरीं

    पडला असेल चुकून देखील

    कुणी रंग उधळतां वेड्यापरि

    शुभ्रपणाचा मानबिंदू हा

    डागरहित जीवन त्याचे

    केवळ एका डागापायीं

    सत्य झांकाळते कायमचे

    मिटून जातां डागही मिटतो

    उरते मागें सत्य तेवढे

    परि पुसण्यासाठी डाग एक तो

    मिटणे उपाय जहाल केवढे

    जोवरि जीवन चंद्रा तुझे

    डाग दिसेल माथ्यावरचा

    दुग्धामृताच्या घटांमधला

    असेल थेंब तो विरजणाचा

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 27, 2016


  • शोध

    लपून सावली आड पृथ्वीच्या पाहतो चंद्र आमावस्येच्या दिवशी जसा चांदणीकडे पाहतो तसा मी लपून रात्रीच्या काळोखा आड प्रकाशातील तुझ्याकडे आहेस तू उत्तर ध्रुव आणि मी दक्षिण ! आपल्या दोघांच्या मध्ये उभी आहे समाजाने आखलेली भिंत विषुववृत्त नावाची

      April 9, 2012


  • पुजारी – पुरोहित

    पुजारी मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो ।

    भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग करूनी घेतो ।।१

    पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे ।

    भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे ।।२

    व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति दाखविती ।

    धर्माचे नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती ।।३

    पुरोहित असा असावा, धर्माची करि उकलन ।

    भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग देयी दाखवून ।।४

    प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें, चिंतन करण्या सांगावे ।

    चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्र करण्या शिकवावे ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 9, 2020


  • आशिर्वाद

    प्रतिबिंब तुझे रे घरात माझ्या
    आशिर्वादच हा अरे कल्पवृक्षा
    तुझी कृपादृष्टी सदैव राहो
    मनीमानसी एवढीच इच्छा

      August 18, 2026


  • या गर्दीतून जाता जाता

    मित्रांनो, “या गर्दीतून जाता जाता ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे.

      June 29, 2018


  • मंगलमूर्ती

    गजानना आनंदें धरतीवर येता।
    आगमनाचा मोठा आनंद देता!

    विद्येची देवता आराध्य तुम्ही देवा!
    मखरात बसविता घ्यावा विसावा!

    मोदक लाडूंची दिली तुम्हा रास !
    भक्तांना सुखदायक तुमचा सहवास!

    चौसष्ट कलांचा अधिपती राजा गणराज!
    शब्दसुमनांचा कसा चढवावा साज!

    निर्गुण रूप सदा भावते लोचनास!
    आत्मस्वरूप दिसावे जसे भक्तास!

    तुच सख्य आपले जाणून घ्यावे!
    भक्तावरी मायेचे कृपाछत्र धरावे!

    संकट होते दूर पाप नाशती
    महिमा अगाध तुझा मंगलमूर्ती !

    काय वर्णावी अजाणतेपणी किर्ती
    प्रतिभा प्रदान करावी तुम्ही दोन हाती !

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      June 8, 2026


  • जागृत आंतरात्मा

    कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
    न ऐकीली कधीही हाक तयाची कानी,
    चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
    नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी,
    निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले
    प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले,
    नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
    निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले
    तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला
    कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला,
    तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
    पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 16, 2018