रसिक हो

कौतूक करिती प्रियजन आपले ते
मन तेंव्हा किती हो भरूनी पावते ।।
नवनिर्मितीस नेहमी प्रेरणा मिळता
मनात नवी उमेद सतत जागते ।।
सभोवती आपल्या असणे पारखी
या सारखी समाधानाची गोष्ट नसते।।
रसिकांच्या कौतुकाची पावती ही तर
कलावंत मनास नेहमी हवी असते ।।
नशीबवान असतात कलाकार असे
ज्यांचे रसिकांशी नाते जुळत असते ।।
शब्द -सूर जुळता संगीत रचना होते
रसिक मनासाठी ही अनुभूती असते
-- अरुण वि. देशपांडे


कौतूक करिती प्रियजन आपले ते
मन तेंव्हा किती हो भरूनी पावते ।।
नवनिर्मितीस नेहमी प्रेरणा मिळता
मनात नवी उमेद सतत जागते ।।
सभोवती आपल्या असणे पारखी
या सारखी समाधानाची गोष्ट नसते।।
रसिकांच्या कौतुकाची पावती ही तर
कलावंत मनास नेहमी हवी असते ।।
नशीबवान असतात कलाकार असे
ज्यांचे रसिकांशी नाते जुळत असते ।।
शब्द -सूर जुळता संगीत रचना होते
रसिक मनासाठी ही अनुभूती असते
— अरुण वि. देशपांडे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →