(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुके भाव

    आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं

    प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,

    भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची

    थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,

    भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले

    विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,

    आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला

    निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,

    भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने

    उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 3, 2020


  • वैभव शब्दांचे

    मी मनामना जोडित राहिलो..
    मी माणसा माणसात राहिलो...

    नाही कधीच क्षणभर थांबलो
    नाही कुणास बोचलो टोचलो...

    जग सारे मायबाप बंधुभगिनी
    समजुनी जगती जगत राहिलो...

    काय मिळविले, काय हरविले
    या विचारात न मी कधी गुंतलो...

    देणे घेणे हिशेब सारे संचिताचे
    असे समजुनी समाधानी राहिलो...

    वैभव! शाब्दिक प्रेमभावनांचे
    मीच सदोदित मिरवित राहिलो...

    तळहातांच्या ठळक रेषामधुनी
    मीच मन:शांती शोधित राहिलो...

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २३८

    १७ /९/२०२२

      September 22, 2022


  • हिरवी माया

    हिरवी माया हिरवी छाया हिरवी हिरवी काया

      July 12, 2026


  • श्रीराम जन्म कथा

    श्रीराम जन्म कथा

    श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार
    जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी //१//
    रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन
    अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे //२//
    थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून
    करीत असे अर्पण तुमचेसाठीं //३//
    लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान
    उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना //४//
    युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी
    छळूं लागला तयांसी दुष्टपणानें //५//
    रावणाच्या त्रासा पोटीं देवांच्या मुक्तीसाठीं
    अवतार घेई जगत् जेठी श्रीराम जन्म घेऊनी //६//
    आयोध्येचा दशरथ राजा आनंदी होती प्रजा
    सुखी बघण्यात मजा त्यास वाटे //७//
    एक दुःख होते त्यास पुत्राविना जात दिवस
    पुत्र प्राप्त करण्यास प्रयत्न केले बहूत //८//
    राजा जाई वशिष्ठ गुरु कडे घालूनी त्यास साकडे
    पुत्राविना वंश न वाढे मार्ग सुचवावा //९//
    वशिष्ठ गुरु सुचविती यज्ञ करण्या सांगती
    पुत्रकामेष्टी यज्ञ महती आगीच असे //१०//
    गुरुंचा आशिर्वाद घेऊनी राजा निघाला तेथून
    संकल्प केला दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञाचा //११//
    श्रृंगऋषी महान होते तप सामर्थवान
    विनवितसे जाऊन त्यांचे आश्रमी //१२//
    पाद्यपुजा त्यांची करुनी भक्तिभावे विनवूनी
    यज्ञासाठीं पाचारण करुनी तयासी बोलावले //१३//
    मंडव घातला भला यज्ञाचा भव्य सोहळा
    ऋषीगण ब्राह्मण सगळा यज्ञासी जमती //१४//
    यज्ञांत आवाहन केले सर्व देव निमंत्रिले
    हविर्भाव सर्वासी दिले श्रृंगऋषीनें //१५//
    स्पष्ट मंत्रोपचार म्हणून सर्व ऋषी एकसूर धरुन
    अग्नीसी टाकती हवन राजा दशरथ // १६//
    प्रसन्न झाली यज्ञदेवता पायस कलश हातीं देता
    समान भाग राण्यांस वाटता पुत्र प्राप्त होई //१७//
    दशरथाच्या राण्या तीन कौसल्या सुमित्रा नि कैकयी लहान
    आनंदी झाल्या पायस बघून यज्ञाचा प्रसाद //१८//
    कैकयी बसली रुसून पट्टराणी मी लहान असूनी
    प्रथम भाग कौसलेस देवून अपमान माझा होई //१९//
    प्रसाद घेवूनी बैसली मनीं विचार करुं लागली
    तत् क्षणी एक घार आली प्रसाद जाई घेऊन //२०//
    सर्वजण होती चकीत कांही समजण्याचे आंत
    एक भाग घार नेत आकाशी उडाली //२१//
    कैकयी झाली दुःखी शब्द निघेना मुखी
    प्रसंग ओडावला एकाएकीं तिचेवर //२२//
    आपल्या प्रसादातील भाग देवून कैकयीस सांग
    सोडून द्यावा तुझा राग विनवितसे दोन्ही राण्या //२३//
    चैत्रशुद्ध नवमीला राम जन्म झाला
    कौसल्या मातेला आनंद होई त्रिभुवनी //२४//
    सुमित्रेचा लक्ष्मण कैकयीस भरत शत्रुघ्न
    चार पुत्र मिळून पितृत्व दिले दशरथासी //२५//
    आदर्श जीवन जगला पितृआज्ञे वनवास सोसला
    मारिले दुष्ट रावणाला यशस्वी केले रामराज्य //२६//
    रामाचा महीमा थोर परमेश्वराचा तो अवतार
    भक्तांचा करी उद्धार त्याचे आशिर्वादे //२७//
    एक पत्नी, वचनी, बाणी सत्य आणि प्रेमळ वाणी
    अद्वितीय गुणांच्या खाणी रामासी ठरवी पुरुषोत्तम //२८//
    रामाचे जीवन भव्य आदर्शमय ते काव्य
    दाखवोनी जगाला दिव्य ठाव घेई सर्वा मना //२९//
    रामनामी मोठेपण जाईल तो उद्धरुन
    संकटे जात निघून आठवण येता त्याची //३०//
    रामरक्षा स्तोत्र पठण करी तुमचे देह रक्षण
    नित्य नियमें वाचन मनोभावें //३१//
    " शुभं भवतु "

    डॉ. भगवान नागापूरकर
    ५-०१११८३

      April 1, 2012


  • निशब्द उत्तर

    एक दिवस असा येतो,
    की मन रडतं... पण डोळे रडत नाहीत.
    ओठांवर हजारो शब्द असतात,
    पण ते उच्चारण्याची इच्छाच उरत नाही.

    कारण अनुभव शिकवून जातो...
    प्रत्येक गैरसमज दूर करता येत नाही,
    प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
    आणि प्रत्येकाला आपल्या मनाची किंमत कधीच कळत नाही.

    खूप समजावून पाहिलं,
    खूप वेळा स्वतःलाच चुकीचं ठरवलं,
    फक्त नातं टिकावं म्हणून
    स्वतःचं मन हजारदा मोडलं.

    पण एक क्षण असा येतो,
    जेव्हा मन थकून म्हणतं
    "आता पुरे...
    ज्यांना माझं मौनही समजत नाही,
    त्यांना माझे शब्द तरी काय समजणार?"

    मग राग संपतो,
    अपेक्षा विरघळून जातात,
    आणि उरते फक्त एक शांत स्मितरेषा,
    जी खूप काही सहन करूनही
    कुणालाच दोष देत नाही.

    आजही मनात प्रेम आहे,
    आदर आहे, आठवणी आहेत.
    पण मागे वळून हाक मारण्याची
    सवय मात्र कायमची सुटली आहे.

    कारण आता समजलंय...

    जिथे आपल्या भावनांची किंमत राहत नाही,
    तिथे शब्दांचाही अर्थ उरत नाही.
    म्हणून काही नाती सोडून द्यावी लागतात...
    आणि काही माणसं
    फक्त आठवणीतच ठेवावी लागतात.

    •ॲड. कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो.: ९०११८४१२१२

      June 23, 2026


  • नातवंड म्हणजे….

    नातवंड म्हणजे काय चीज असतं ,
    आजी आजोबा मध्ये दडलेलं सँडविच असतं.

    नातवंड म्हणजे काय चीज असते ,
    आई रागावली की आजी कडील धाव असते.

    नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,
    पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.

    नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
    पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.

    नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
    सगळ्या चवींना बांधतो एक संध.

    नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
    अखंड आनंद घ्या हवा तेवढा.

    नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
    तिस-या पिढीचा असतो उगम.

    नातवंड म्हणजे आनंद तरंग
    आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग.

      October 17, 2017


  • आस जिवंत राहू दे

    हे देवा,
    परीक्षा अशी नसावी
    की घामाच्या थेंबातच स्वप्न विरघळावे,
    प्रश्नपत्रिकेच्या कडेला
    आशेची अक्षरे फिकी पडावी.

    तू दे संकटे,
    पण ती दीपासारखी असू दे,
    अंधार दाखवणारी,
    दिशा हरवणारी नव्हे.

    मेहनतीचे हात थकले
    तरी मन मोडू नये,
    फळ येईपर्यंत
    विश्वास गळून जाऊ नये.

    बीज पेरले आहे, देवा,
    मातीवर आमचा हक्क नाही,
    पण आकाश इतके दूर नको
    की पावसावरच शंका येईल.

    देवा...अपयश दे,
    पण ते माणूस मोठं करणारं असू दे,
    स्वतःकडे पाहण्याची हिंमत
    हिरावून घेणारं नसू दे.

    परीक्षेच्या या रस्त्यावर
    एक तरी वळण असू दे
    जिथे थांबून
    आपण स्वतःला मिठी मारू शकू,
    आणि म्हणू शकू “थांब…
    तू पुरेसा आहेस.”

    परीक्षा येऊ दे,
    तिला अर्थ असू दे,
    वेदनेतून वाट काढताना
    मात्र उद्याच्या आशेची
    आस जिवंत राहू दे.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 13, 2026


  • मनमंदिर….

    सावळा विठ्ठल माझ्या घरी आला.
    रखुमाबाई सवे गाभाऱ्यात विसावला...
    माझ्या माय बाईची पुण्याई फळा आली.
    जणु पंढरपूर अवघी माझ्या घरीच दुमदुमली...
    गोजिरे साजिरे ते रुप सुंदर मनोहर.
    पाहताच विसरून गेले हे भवसागर...
    तू आहेस अनाथांचा नाथ पंढरीनाथ.
    शरण आले तुला जोडोनिया दोन्ही हात..
    तुम्ही येता दोघेही घर झाले माझे पवित्र मंदिर.
    घरच नाही तर माझे मनही झाले पवित्र मंदिर..

    सौ कुमुद ढवळेकर

    (यंदा वारीला जातांना एका परिचितांना भेटायला गेलेल्या जवळ आम्हाला एक विठ्ठल रखुमाबाईची मूर्ती दिली आहे. आज एकादशीला ती देवघरात ठेवून पुजा केली आहे त्यामुळे मी जणू पंढरपुरात आहे असे वाटले होते.)

      February 13, 2023


  • जन्म स्वभाव

    गोड शब्द बोबडे,
    लकब मनास आवडे ।
    शब्दांची भासली जाण,
    नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।।

    भावनांचा उगम दिसला,
    मनी व्यक्त होई हालचालीतूनी ।
    रागलोभ अहंकारादी गुण,
    दिसून येती जन्मापासून ।।

    देश-वेष वा जात कुठली,
    सर्व गुणांची बिजे दिसली ।
    हळूहळू बदले बाह्यांग जरी,
    उपजत गुण राही अंतरी ।।

    प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाते विसरत ।
    उफाळून येती सुप्त भावना,
    मानवी त्या जन्मखुणा ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 2, 2015


  • नजरेचा बलात्कार

    कुठुन कुठुन नजरा जातात
    शिरत राहतात
    अंग बघायला

    बायांनीही फँशन म्हणून ठेवलेले असतात
    पाठीवर
    हातावर
    कधी छातीवरही
    काही झरोके

    ब्लाॅउज अन साडीच्या
    मधला भागही शोधत राहते

    अन
    मोठाच बलात्कार करत असते नजर
    एकही अंग उघडं नसलेल्या
    अंगभर कपडे घातलेल्या बाईवर

    ब्रा वा इतर अंतर्वस्त्राचे किनार वा काठ

    ठळक दिसत राहतात त्याला वरुन कपड्यावरुन....

    तेव्हा !

    -- श्रीकांत पेटकर

      March 17, 2019