(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रात्र सामोरी येतां

    रात्र सामोरी येतां,
    मन कसे कोमेजते,
    मावळतां दिन सारा,
    काळोख घेऊनी येते,
    दिवसाचे तास संपती,
    असे बघतां-बघतां,
    स्मृतींच्या इंगळ्या डसती,
    *संधिप्रकाश* ओसरतां,
    काळजाचे धागे तुटतां,
    जिवां हुरहूर लागे,---
    फक्त "काहूर" तेवढे,
    मनांत होते जागे,--!!
    अंधाराची सोबत न्यारी,
    कुणां अश्रू ना दिसे,
    आपुल्याच,--रात्री वाटती,--
    कसे ऋण" फेडायाचे,?
    सुख--दु:खांचे,हिशोब सारे,
    नकळत आपुले मन मांडते,
    सरशी' कुणाची होते हे,
    सांगावयास न लागे,--!!
    *झुंजूमुंजू*होतांना पण,
    पक्षी किलबिलाट करती,
    अनोखी त्यांची जिद्द पाहुनी,
    जगण्याच्या 'उर्मी' उसळती,
    आकाशी दिनकर उगवतां,
    उर्जास्त्रोत' कसा मिळे,
    तेजस्वी'"" प्रकाशापुढे मन,
    झुकून अगदी,वंदन' करे,--
    प्रकाश आणि अंधार हे,
    सृष्टीचेच भाग असती,
    अंधारातुनी *प्रकाशा*कडे,
    ते कसा मार्ग दाखवती,--!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

      March 24, 2020


  • गृहनिर्माण संस्था आणि सचिव (सेक्रेटरी)

    गृहनिर्माण संस्थेत संचालक हे संस्थेचे ब्रेन असले तरी सेक्रेटरी हे त्याचे कान, डोळे आणि हात असतात, या वाक्याने आपण सेक्रेटरीचे महत्त्व स्पष्टपणे समजू शकतो. सहकार संस्थेच्या कायद्यानुसार सेक्रेटरी नेमणूक करणे सक्तीचे असते. गृहनिर्माण संस्थेत प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक केली जाते. सदर लेखात खास आपणासाठी सचिवाची कार्ये काय असतात याची माहिती देत आहे.

      August 27, 2021


  • दवबिंदुंचा थेंब पाहे

    दवबिंदुंचा थेंब पाहे,प्रतिबिंब फुलाचे पाण्यात,
    पाणी का आरसा आहे,
    प्रश्न पडे त्यास मनात,--!!!

    रंग पाहून पाण्याचे,
    थेंबही भासे कसा रंगीत,
    विविधढंगी रूप असे,
    पाहून त्याचा जीव चकित,--!!!

    फूल कसे निडर असे,
    रंग त्याचे ना बदलत,
    पाणीच आपुले रंग बदले,
    प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,--!!!

    आखीव-रेखीव पाकळ्यांचे,
    बाल- स्वरूप दिसे पाण्यात,
    थेंबात परागकण मोठाले,
    सारे थेंबाच्या आत डोकावत,--!!!

    सगळेच फूल त्यात सामावे, थेंबाला जग लहान भासत,
    पाणी खाली उगीच खळाळे दोघांनाही करे परावर्तित,--!!!

    थेंबाथेंबाचे जगच निराळे,
    भोवतालला कवेत घेत,
    जो डोकावे त्यास दिसे,
    आपले रुपडे पहा पाण्यात,--!!
    आपण खरे आहोत कसे,
    छबी तरंगे पाण्यात, हलत,--!!

    फुला- थेंबा- पाण्याचे,
    विश्व का निराळे असत,--?
    आपणास कोण व्हायचे,
    चला ठरवू आपण कल्पत,--!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

      April 5, 2020


  • कृष्णसखी

    थांब थांब मोहना, आर्त वेणू वाजवू नकोस
    तुझ्याचसाठी वेडी ही , अजून तिला भारू नकोस
    थांब जरा मोहना, असा मल्हार छेडू नकोस
    होऊन जाईल चिंब धरणी, का उसंतही देऊ नकोस?
    थांब जरा मोहना असा तू नाचू नकोस
    मनीच्या या झंकारल्या तारा, अजून त्या तोडू नकोस
    थांब आता मोहना असा तू बहरू नकोस
    भरल्या या तरुवर आता तू झुलू नकोस
    थांब थांब बास आता.... पुरे झाले बरसणे
    कुडीतले हे प्राण वाहिले तुझ्याचसाठी ओथंबले
    -- वर्षा कदम.

      November 26, 2021


  • संधी

    गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे

    संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे

    ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी

    गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी

    चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी

    बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी

    धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो

    जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो

    यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा

    साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      May 18, 2020


  • नाभिकेंद्रांत आत्मा

    आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?

    तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,

    सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,

    कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,

    विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी

    मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,

    मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा

    समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,

    मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,

    आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालविते.....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 17, 2018


  • देवाचिया दारीं

    देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,

    झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।

    जाई जेव्हां मंदिरी,

    घेतां प्रभू दर्शन,

    आनंदानें नाचते,

    हर्षित चंचल मन,

    नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।

    नदीनाले धबधबा,

    उंच उंच वृक्ष वेली,

    कोकीळ गाती, मोर नाचे,

    इंद्रधनुष्याच्या खाली,

    रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।

    दु:खी – कष्टी दुबळा,

    दीनवाणा दिसे,

    प्रभूच्याच आज्ञेने,

    भोग भोगीत असे,

    जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 18, 2017


  • माझं गुपित

    काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत
    जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥

    आहे त्याचा तर आनंद आहे
    नसत्याची नाही उणीव काही
    आनंदपरिमल दुःखाची मळमळ
    कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत
    जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥

    चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून
    गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून
    शहाणपण माझं आटोकाट जपत
    जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥

    जीवाचा आटापिटा करुन
    कभिन्नकाळ्या कातळातून
    माणूसकीच्या दुष्काळातून
    मायेचा पान्हा जिवंत झरत
    जपलय् मी माझे इवलंसं गुपित ॥ ३ ॥

    जीवघेण्या स्पर्धेच्या गर्दीतून
    बुभुक्षितांच्या हव्यासातून
    पायावर देणं, पाय नाकारुन
    'पहले आप'चा पाढा पढत
    जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ४ ॥

    निसटलं त्याचा शोक न लेवून
    आहे हाती जे ते सावरुन
    ठुसठुसणाऱ्या भूतकाळाकडे
    निर्धारपूर्वक पाठ फिरवत
    जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ५ ॥

    उपेक्षेच्या रणरणत्या उन्हात
    माणूसकीच्या चेंगरत्या लिलावात
    रुजू पहाणाऱ्या प्रत्येक आशेला
    मुक्त जगण्याचा मक्ता देत
    जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ६ ॥

    ऐहिक बेड्या बेगड्या तोडून
    विसावित मी शांतिच्या कुशीत
    मीपणाच्या मोहाला सारुन
    सांभाळत माझं 'माझेपण' खुशीत
    जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ ७ ॥

    - यतीन सामंत

      August 18, 2022


  • श्री कृष्णाची भक्ताला मदत

    घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या

    रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।।

    चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं

    क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।।

    प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली

    श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।।

    चौकशी करतां कृष्ण बदले कहानी एका भक्ताची

    हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।।

    वेडा समजोनी त्यासी दगड होते मारीत

    हरिनाम नाही सोडले वाहात असूनी रक्त ।।५।।

    धावलो होतो त्याचेसाठीं करण्या त्याला मदत

    परि लहू बघूनी अंगावरती दगड घेतला हातात ।।६।।

    समर्थ झाला आता तो रक्षण करण्या स्वतःचे

    हरिनाम सोडता मुखातून कारण नव्हते मदतीचे ।।७।।

    ही झाला छोटी कहाणी सांगे जीवनाची तत्वे

    सर्वस्व अर्पिता प्रभूसी विश्वास ठेवा त्याते ।।८।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 2, 2019


  • कवच

    आघात होवूनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे
    संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य तो ठरत असे...१,

    दु:खाची ती चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई
    कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई....३,

    दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी
    प्रेमभाव तो अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी...३,

    तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती
    दु:खाचे ते वार झेलूनी, रक्षण त्याचे सदैव करिती.....४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      May 14, 2017