निरोप

तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला ।
दूरवर बघत राहीन, ती लेकीला ।।१।।

लेक चालली निरोप घेवूनी, सासरी ।
भरल्या नयनी माय उभी, शांत दारी ।।२।।

जड पावले पडता दिसती, लेकीची ।
ओढ लागली त्याच पावलांना, मायेची ।।३।।

उंचावूनी हात हालवीत, चाले लेक ।
जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक ।।४।।

वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली ।
अश्रूपूसून पदराने, माय घरात आली ।।५।।

दूर गेले ते पाखरू, आकाशी उडून ।
स्वैर जगण्या, आपलेच पंख फूटून ।।६।।

-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला ।
दूरवर बघत राहीन, ती लेकीला ।।१।।

लेक चालली निरोप घेवूनी, सासरी ।
भरल्या नयनी माय उभी, शांत दारी ।।२।।

जड पावले पडता दिसती, लेकीची ।
ओढ लागली त्याच पावलांना, मायेची ।।३।।

उंचावूनी हात हालवीत, चाले लेक ।
जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक ।।४।।

वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली ।
अश्रूपूसून पदराने, माय घरात आली ।।५।।

दूर गेले ते पाखरू, आकाशी उडून ।
स्वैर जगण्या, आपलेच पंख फूटून ।।६।।

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author