शब्द

वाक्य हे आयुष्य मानल्यास, शब्द हे व्यक्तींसारखे असतात



अनेक शब्धांच्या मदतीनेच, संपूर्ण वाक्यें बनतात.

काही कर्ता, काही क्रियापद, तर काही विशेषणे ठरतात.

काही अचूक, काही अनुचित, तर काही अनिवार्य असतात.

सर्व शब्द निघून जाता, वाक्यात् फक्त विरामचिन्हे उरतात.

— विनय शेणॉय

Author