रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 7, 2021
मी माझे सर्वस्व तुला अर्पण करून
तुमचा निरोप घेईल
मुलांनो, मी माझी विनम्रता गिळंकृत केली आहे
मी माझी बनावट संपत्ती तुमच्या नांवे वारस ठेऊन जात आहे
मी महाज्ञानी आहे
मी नेहमीच गांभीर्य पांघरून फिरतो
मला प्रत्येक भेटणारा माणूस मूर्ख वाटतो
मी ही मुर्खता तुला स्वाधीन करून जात आहे
मी तुला माझे भरजरी वस्त्र,
माझे भाषा वैभव
आणि माझा अहंकार
तुला अर्पण करून निरोप घेईल
मी कचरा पेटीत फेकून दिली आहे
सारी सहजता आणि तरलता
मी गंभीर राहील त्या क्षणा पर्यंत
जो पर्यंत माझा सन्मान होत राहील
जरा कुठे माझ्या विरोधात सूर निघतील
तेव्हा पहा माझी मानसिकता, आक्रास्ताळेपणा
आणि शारीरिक हिंसा
माझ्या आत दडला आहे हिंस्त्र पशु आहे व
बाहेर मी एक आदर्श पुरुष आहे,
माझ्या मुलांनो तुम्हाला
अर्पण करील माझा हा दुटप्पीपणा
मी छता वरून लाँच झालेले
रॉकेट आहे
का मोडक्या झोपडीतून
हवेत फेकलेला भाला आहे,
मी काय होतो या पेक्षा
जास्त महत्वाचे आहे की
मी काय झालो आहे,
जे काही असेल ते
अर्पण करून निरोप घेईल
गल्लीत बलात्कार असो, दंगल असो
मी तुला माझा शेळपटपणा अर्पण करून
शिकवून जाईल
कसे शेपूट घालून
दार खिडकी बंद करून घरात रहावे,
शेजारील घरात गरीब मुले भुकेने मरत आहेत
तू मात्र गिळत रहा शिरापुरी भजे, सुका मेवा
मी तुला ही अव्वल निष्ठुरता
अर्पण करून निरोप घेईल
तुला पावलो- पावली दिसतील
अर्धनग्न मळकट पिचलेली
असंख्य बालके आणि बाया
तू त्याकडे दुर्लक्ष करीत
तुझी किमती बनारस साडी
आणि पॅन्ट सावरीत
अलगद निघून जा
मी तुला ही महान बेफिकीरी निर्लज्ज-परंपरा अर्पण करून निरोप घेईल
माझे साहित्य जगात वाचले जाते
अनेक भाषेत माझ्या पुस्तकांचा
अनुवाद झाला आहे
या अहंकाराच्या दुनियेत फुगून जाईल
आणि हीच हवा तुझ्या डोक्यात भरून
मी तुझा निरोप घेईल
माझे जे जे काही आहे
ते ते तुला अर्पण करून
तुमचा निरोप घेईल
-- मूळ हिंदी कविता-
~अनामिका अनु
मराठी अनुवाद- विजय नगरकर
November 8, 2020
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
दिवस हे चालले असे
ऋतु हे प्रसवती जसे
श्वास हे जगता जगता
आंसवे ही झरतात कां?.
जल जीवनी वाहिले असे
मनभाव सारे विरले जसे
निर्माल्य सहज होता होता
भावतरंग मनी जागतात?
दैवयोगे, मनप्रीत उमलता
मूकमनभाव गुंतता गुंतता
प्रीतसुगंध दरवळता दरवळता
भावकळ्या तू तोडल्यास कां?
विसरून आठवांच्या पाऊली
तू असा येतोस कां?
तुझे नी माझे नाते
आतातरी सांगशील कां?।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११९.
१८ - ४ - २०२२
May 3, 2022
कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येतो
राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटतो....१
देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले
अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२
देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी
केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३
जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून
भावांचे ते रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 25, 2019
निसर्गाचा मानवाशी संघर्ष,
प्राणीमात्रांचा मनुष्याशी संघर्ष !
जीवन जगणे म्हणजेच संघर्ष,
जगण्यातील अर्थ म्हणजेच संघर्ष !
संघर्षाची काही ठोस व्याख्या नाही,
कलियुगात माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नाही,
संघार्षावाचून माणसाला जगणे शक्य नाही !
संघर्ष जगण्याची आशा दाखवतो,
जीवनातील संघर्षात माणूस शहाणा होतो !
संघर्षात जीवन तावून सुलाखून निघते,
आणि सोन्यासारखे स्वच्छ होते !
संघर्ष म्हणजे स्पर्धा,
स्पर्धा म्हणजेच संघर्ष !
संघर्ष नसेल तर माणसाची प्रगती खुंटेल,
संघर्ष करतांना माणसाला
जीवन जगण्याचा खरा अर्थ कळतो,
अडचणींवर मात करण्यास संघर्षच उपयोगी पडतो,
जीवन जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो !
जगदीश पटवर्धन
June 24, 2015
कारूण्यामधूनी उगम पावला आद्य काव्याचा झरा
वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे, मानाचा मुजरा....१,
गमविले नाही व्यर्थ प्राण ते, व्याध बाणा पोटीं
टिळा लावला काव्यश्वरीने, मानाने तुझ्या ललाटी...२,
हृदयस्पर्शी जी घटना घडली, तडफड तव होता
कंठ दाटूनी शब्द उमटले, पद्य रूप घेता....३,
उगम पावता काव्य गंगा ही, वाहू लागली भूलोकी
वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका, अशांचे आली मुखी....४,
काव्य प्रवाह हा सतत वाहे, किती जणांच्या शब्दामधूनी
अंशरूपाने काव्यश्वरी ही, बरसे व्यक्त होवूनी...५.
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 4, 2019
नादावले सखीने
मन जडल्या नात्याचे
चंद्र पाकळ्यांची बरसात
फुलणार मग निशेने
भिजशिल गं प्रेमाने
सखी कोणता ऋतुमास
ओठावरी तुझा ध्यास
मन करुन वारुचे
ये प्रणयसखे वेगाने
भिजशिल गं प्रेमाने
भेटशील ना त्या ठिकाणी
दुसरे नसेल कोणी
क्षण तुझ्या भेटीचे
ये करुनि बहाणे
भिजशील गं प्रेमाने
-सौरभ दिघे
May 14, 2024
November 8, 2021
हांसत आली सूर्य किरणे
झरोक्यातून देव्हारयांत
नाव्हू घालूनी जगदंबेला
केली किरणांची बरसात
पूजा केली किरणांनी
जगन्माता देवीची
प्रकाश स्पर्शुनी चरणाला
केली उधळण सुवर्णांची
तेजोमय दिसू लागले
मुखकमल जगदंबेचे
मधुर हास्य केले वदनी
पूजन स्वीकारते सूर्याचे
रोज सकाळी प्रात:काळी
येउनी पूजा तो करितो
भाव भक्तीने दर्शन देउन
स्रष्टीवर किरणे उधळतो
कोटी कोटी किरणांनी
तो देवीची पूजा करितो
केवळ त्याची पूजा बघुनी
मनी पावन मी होतो
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
October 29, 2018
परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद
मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक
नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती
प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार
आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति
ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता
न प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून
वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती
धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक
हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां
झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र विसरती
धर्मासाठीं भांडण । मुर्ख त्याहूनी कोण
भांडतो करवंटीसाठी । विसरुनी खोबरे वाटी
होता अतिरेकी । बनती सर्व दुःखी
वाद करती विद्वान । सामान्यांस विचारी कोण
समजून घ्यावे सर्व धर्म । हेच मावतेचे मर्म
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 14, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti