विधी कर्माना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी, भस्म लावीले सर्वांगाला

वेषभूषा ती साधू जनाची, शोभूनी दिसली शरिराला

खर्ची घातला बहूत वेळ, रूप सजविण्या साधूचे

एक चित्त तो झाला होता, देहा भोंवती लक्ष तयाचे

शरिरांनी जरी निर्मळ होता, चंचल वाटले मन त्याचे

प्रभू मार्गास महत्त्व देतां, विसरे तोच चरण प्रभूचे

विधी कर्मात वेळ दवडता, प्रभू सेवेसी राहील काय ?

देहाच्या हालचाली बघूनी, समाधानी तुम्हीं होत जाय,

सोडून द्या हे सारे सारे, जे मनास गुंतवी भलतीकडे

केवळ तुमचे शांत चित्त, ते पोहचवील तुम्हां प्रभूकडे

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →