काय सांगावे तुला, काय सांगू नये
या कोड्यात राहिलो आयुष्यभर
नेमकं जे सांगायच होतं ते
ते सांगायच राहुनच गेल्ं !!
जेंव्हा उन्ह सरली, तेंव्हा छत्री उघडली.
नको असतांना, सावली अंगावर झेलली.
--- भास्कर पवार
October 23, 2018
सतत गुंतलो आहो सारे
शोध घेण्यास त्या 'आनंदाला'
युगानूयुगे प्रयत्न होतो
मिळवण्यासाठींच प्रभूला...१
बाह्य जगाचे सुख आगळे
लागले सारे त्याच्या पाठीं
'देह सुख' अंतीम वाटे,
खरा 'आनंद' देण्यापोटी...२
'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'
समजूत झाली ही कांहींना
लेखक, कवी, साहीत्यिक हे
पाठ त्याची कांहीं सोडीना...३,
साधू संत हे थोर महात्मे
आनंद शोधूती 'विश्रमांत'
'ध्यान' लावून एक मनानें
शांत होवूनी डूबती त्यांत...४,
आनंदची 'मोक्ष' असून
ध्येय साऱ्यांचे त्याजकडे
मार्ग सर्वांचे वेगळे असून
'तन्मयता' खेची प्रभूकडे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 25, 2020
एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने
तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं
मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत
भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 4, 2016
रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची ।
पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।।१
स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई ।
भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।।२
सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला ।
आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।।३
करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा ।
देवापुढती रांगोळी काढी, दिसे कशी सुंदर बघा ।।४
बागेमध्ये जाऊनी मग ती, दुर्वा काढीत असे ।
पुष्प करंडीत फुले निराळी, ताजी सुंदर दिसे ।।५
स्नान करूनी ओलेत्याने, पाणी ठेवी पूजेसाठीं ।
घास घासूनी चंदन मग ते, भरे लहानशी वाटी ।।६
हरिनाम घेई मुखीं सतत, मंत्र जप ते येईना ।
पूजेच्या परि तयारीमध्यें, उणीव कधी ठेवीना ।।७
जमवित होती पूण्य राशी, पतिची सेवा करूनी ।
द्विगुणीत होई सांठा, प्रभू सेवा लाभूनी ।।८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 1, 2020
-- स्वाती ठोंबरे.
December 7, 2021
राज्य तमाचे येथें
बाह्य जगावरती,
म्हणून दिसे आम्हां,
विध्वंसक प्रवृती ।।१।।
नाश करण्यासाठीं
शक्तीच हवी येथे,
हेच रुप शिवाचे,
समजण्या अवघड जाते ।।२।।
जागा करु देई,
नविन घटनांना,
चक्र कसे चालेल,
न मिटवता त्यांना ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 3, 2020
शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे ।
सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे ।।
बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे ।
निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे ।।
कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता ।
क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता ।।
शिवीगाळ स्वभाव असतां आदरभाव कसा मिळे ।
शत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे ।।
इच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा आनंद ।
शक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद ।।
वागतां कसे या वरती आवलंबून सारे असे ।
वाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले उगवेल कसे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 2, 2016
गुरूजी, तुम्ही सकाळी
जरा होता घाईतच
लवकर गटवायची
असेल ना खेडवळ शाळा ?
तुटलेल्या चपलेचा अंगठा
जोडून घेताना
आज शहराच्या चौकात
पाहिले मी तुम्हाला ..
तिथेच मारलीत
गाडीला मोजून हवा
अन्
अडकवलात
ट्यूशनवाल्याच्या बॅनरला
भाकरीचा डब्बा...
तसे
एकलव्याने गुरूदक्षिणा
म्हणून दिलेला अंगठा
गुरूजींनो,सरांनो,साहेबांनो
परत कधी जोडणार आहात ?
परत कधी जोडणार आहात ?
©विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
मो.9421442995
March 12, 2017
गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची
मला वाटते परंपरा, ती चाले घराण्याची....१,
रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव
प्रेमळपणे खावू घालणें, मनी तिच्या भाव....२,
अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा
जुमानत नाही कुणाचाही, शाब्दीक तो वायदा....३,
प्रेमळपणा असूनी अंगी, अहंकार युक्त ती
गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व, तसेच पुढे चालती......४
सोडून घ्या तो अहंकारी भाव, टिकवा प्रेमळपणा
चक्रामधल्या गुणदोषातील, गुणच अंगा बाणा....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 28, 2018
कधी तरी एक शब्दतरी बोलत जावे असे वाटते
July 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti