उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे ।
संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।१
जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी ।
हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।२
‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी ।
अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।३
बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी ।
तेथेही जो आनंद बैसला. स्वागत त्याचे करी ।।४
पटे मनाला विचार , रूचणारा जो असे ।
हृदयामधला हाच आनंद, स्फूर्ती देवता भासे ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 8, 2020
खिडकीमधूनी टिपत होतो
बाह्य जगाचे द्दष्य आगळे
लोभसवाणें चित्र बघण्या
आतूर होऊन गेले डोळे
नयन नव्हते बघत ते
बघत होतो मीच खरा
खिडकीसम नयनातूनी
द्दष्य उमटते आंत जरा
संगीताचे सूर निनादूनी
लहरी त्यांच्या उठताती
कर्णा मधल्या पडद्यायोगे
आनंद मजला देवून जाती
मालक असूनी मी देहाचा
इंद्रिये सारी असती सेवक
ती केवळ साधने असूनी
आंतील 'मीच' असे साधक
मालक असूनी ताबा नसणें
स्वच्छंदी बनवी सेवकाला
इंद्रिये ती गोंधळ घालती
जागृकता नसतां मनाला
सोडून द्यावी वृत्ति मनाची
अरोप करणें इंद्रियावरी
ती तर केवळ सेवक असूनी
मनाची इच्छा पूर्ण करी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 14, 2020
विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१
दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२
वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 2, 2021
असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।
तेल नाही म्हणून पाण्याऐवजी मेणबत्ती लावू नये ।
पारिजातकाच्या सड्यासारखे रक्ताचे थेंब पडताना ।
बाँबस्फोटचे आवाज, तलवारी नाचताना ।
भ्यायलेल्या हरिणीसारखे घरात लपताना ।
रोषणाईच्या माळा मला भावतच नाही ।
असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।।१।।
पु़ढार्यांच्या भूलथापांना भाळून जाण्यासाठी ।
करंट्याचा जन्म आमुचा असतो मरण्यासाठी ।
त्यांच्या खुर्चीखाली असते जीवन सरण्यासाठी ।
ते मात्र निर्लज्जपणे दारोदारी फिरतात मतांसाठी ।
असे वाटते की... ।।२।।
एन्रॉनचे फुगे उडताना आमच्या घरी रॉकेल नाही ।
भ्रष्टाचार करताना यांची पोटे फुटत नाही ।
करंज्या कडबोळी खायला आमच्या घशात दात नाही ।
गरीबांना घरे देताना घरांवर नांगर फिरल्याशिवाय रहात नाही ।
असे वाटते की... ।।३।।
-- चंदाराणी कोंडाळकर
वरसगांव, कोलाड
December 25, 2015
सारेच आहेत दुबळे
कुणाते नसे शक्ति
वेळ येतां दुर्बल ठरे
जे सबळ समजती ।।१।।
विचार मनी येतां
दुसरा शक्तिशाली
समजोनी जावे तेव्हां
हार तुमची झाली ।।२।।
मनाची सबलता
हेच शक्तीचे मापन
काय कामाचा देह
दुर्बल असतां मन ।।३।।
सुदृढ देह व मन
यांची मिळून जोडी
जीवनातील यश
तुमच्या पदरीं पाडी ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 30, 2016
अशी माती काळीभोर तिला हिरव्याचं भान
July 12, 2026
शेरो शायरी करन माझा पेशा नाही,
माझा पेशा दूसराच आहे
चुकुन पडलो या प्रेमात
आता मी तुमच्या सारखाच आहे
February 6, 2018
सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला
खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला ...१,
बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते,
मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,
खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,
चुकीचा हा हिशोब, निराशा करी...३,
अंतरातील सुख, नितांत असते
एकाच अनुभवाने, जग विसरविते...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 5, 2017
फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.
September 9, 2023
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा ।
काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा ।। १
शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं ।
कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी ।। २
उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती ।
शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती ।। ३
मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता ।
व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची ही दुर्बलता ।। ४
गोविंदाग्रज नि केशवसूत, आणिक ग.दि.मा. ।
तांबे- बोरकर- यशवंत, सर्वजण आले कामा ।। ५
ग्रंथ तयांचे सारे जमवूनीं, एकत्र ठेवियले ।
शब्द भावना यांची सांगड, मन करुं लागले ।। ५
द्रोण मुर्तिपरी भासूं लागली, त्यांची ग्रंथ संपदा ।
काव्यामधली स्फूर्ति मिळूनी, आनंदी झालो सदा ।। ६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 25, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti