अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,

सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,

या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,

अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,

हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,

उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,

ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे

अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,

याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,

अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क - ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,

सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते…१,

या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,

अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही….२,

हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,

उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले…३,

ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे

अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे…४,

याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,

अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी…५

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →