(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कीटकाचे ब्रह्मांड

    कीटक ते लहान असूनी
    रहात होते फळामध्यें
    विश्व तयाचे उंबर फळ
    जीवन घालवी आनंदे १

    ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती
    उंबराच्या नसे पलिकडे
    ज्यासी ते अथांग समजले
    बघूनी त्या एका फळाकडे २

    माहित नव्हते त्या कीटकाला
    झाडावरची अगणित फळे
    सृष्टीतील असंख्य झाडे
    कशी मग ती त्यास कळे ३

    आपण देखील रहात असतो
    अशाच एका फळावरी
    हीच फळे असंख्य असूनी
    असंख्य झाडे विश्वावरी ४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 29, 2019


  • जरा धीर ठेव

    ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
    मिळेल कांहीतरी
    गडबड मनां होऊन जातां
    निराशाच पदरीं ।।१।।

    शांत चित्त आपुले
    तूं ठेव प्रत्येक समयी
    मिळेल यश पदरी तुझ्या
    खात्री याची घेई ।।२।।

    आत्मविकास तूं सोडूं नको
    आपल्या कामाचा
    मोबदला मिळेल तुजला
    योग्य प्रयत्नाचा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      November 22, 2019


  • मुखवटा

    मुखवटेच सारे रंगबिरंगी
    खेळ, लीलया भावनांचा
    भेटतात मुखवटे पांघणारे
    हा अनुभव या जीवनाचा।

    अनभिज्ञ, सारीच मनांतरे
    नात्यातही भाव संभ्रमाचा
    निकोप, निर्मलता संपली
    स्वार्थी, हव्यास जीवनाचा।

    भेटो, निरपेक्ष सत्य मुखवटे
    दरवळावा गंध प्रीतभावनांचा
    हीच सुखदा सदानंदी चिरंतन
    रुजावा, बीजांकुर मानवतेचा।

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    दिनांक :- १२ - ४ - २०२२

      April 28, 2022


  • आई

    आई हा शब्द असतो थोर

    जो सर्वांच्या ओठावरील असतो मोर

    आई या शब्दाला नसतो दुजाभाव

    तो सर्वांच्या मनाचा घेई ठाव

    वाऱ्याचा वेग जसा अंगाला शहारतो

    तसाच आईचा स्पर्श मनाला भावतो

    आईचे प्रेम करते मनाला पल्लवीत

    ते दृष्टीस पडता मन होते हर्षीत

    काही करण्याची हिम्मत आईमुळे मिळते

    म्हणूनच तर ती आत्माला ऑ

    आणि इश्वरातलाइ असते

    - भाग्यश्री सतीश प्रधान

    अलिबाग

      May 13, 2024


  • वासनेतील तफावत

    विपरित वागूनी मन, नाश करीते शरीराचा ।

    वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,

    उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट ।

    परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,

    मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते ।

    मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,

    नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला ।

    शरीर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४

    एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला ।

    साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 3, 2020


  • समाधानी वृत्ती

    कशांत दडले समाधान ते,

    शोधत असतो सदैव आम्ही,

    धडपड सारी व्यर्थ होऊनी,

    प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।

    बाह्य जगातील वस्तू पासूनी,

    देह मिळवितो सदैव सुख,

    क्षणीकतेच्या गुणधर्माने,

    निराशपणाचे राहते दुःख ।।२।।

    'समाधान' ही वृत्ती असूनी,

    सुख दुःखातही दिसून येती,

    चित्त तुमचे जागृत असतां,

    समाधान ते सदैव मिळते ।।३।।

    सावधतेने प्रसंग टिपता,

    समाधान ते येईल हाती,

    सुख दुःखाला दूर सारता,

    अंतरभागी समाधान दिसती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 2, 2017


  • कोण आहेस तूं कृष्णा ?

    कोण आहेस तूं कृष्णा ?
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ? ।।धृ।।

    जीवन तूझे 'बहूरंगी'
    सर्व क्षेत्री अग्रभागीं
    आवडतोस तूं सर्वाना ।।१।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    दहीं दूध खाई लपून
    तूप लोणी नेई पळवून
    'खादाड' वाटलास सर्वांना ।।२।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    फळे चारली बागेमधली
    गोपींची शिदोरी नेली
    'चोर' वाटलास सर्वांना ।।३।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    गौळणीचे उचली कपडे
    दगड मारुनी मटकी फोडे
    'खोडकर' वाटलास सर्वांना ।।४।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    मधुरगीत बांसरीतूनी
    नाचलास तूं तन्मय होऊनी
    'कलाकार' वाटलास सर्वांना ।।५।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    कंसाला तूं ठार मारले
    कित्तेक राक्षसा संहारले
    'रक्षणकर्ता' वाटलास सर्वांना ।।६।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    वेडे केले तूं प्रेमानी
    भवती जमल्या सर्व गौळणी
    'प्रेमिक' वाटलास सर्वांना ।।७।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    पाठीराखा द्रौपदीचा
    मान राखला सुभद्रेचा
    'प्रेमळ बंधू' वाटलास सर्वांना ।।८।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    राज्य करण्यातील तंत्र
    पांडवा दिले तूं मंत्र
    'राजकारणी' वाटलास सर्वांना ।।९।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    जीवनाचे महान ज्ञान
    दिलेस तू गीता सांगून
    'महाज्ञानी' वाटलास सर्वांना ।।१० ।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    दाखवूनी जीवनद्वार
    ठरलास तूं 'पू्र्णावतार'
    आदराने झुकती तुजपुढें माना
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ।।११।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      October 30, 2019


  • साहित्यिक

    साहित्यिक

    परखड
    लिहीतात
    अंजनही
    घालतात

    व्रत घेती
    लिखाणाचे
    जागरण
    समाजाचे

    अग्रलेख
    मुद्देसुद
    देखरेख
    साळसुद

    माहितीचा
    स्त्रोत वाहे
    अखंडची
    टिका साहे

    विविधांगी
    लेख लिही
    साहित्यात
    नसे दुही

    साहित्यिक
    अग्रस्थानी
    वैचारिक
    खतपाणी

    ज्ञानदाते
    बुद्धित्राते
    नमू तया
    चरणाते

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

      January 10, 2020


  • “आनंद” भावना

    ध्येय असावे तुमचे नेहमीं
    आनंद मिळवण्याकडे
    'आनंद ' हाचि ईश्वर असतो
    समजून घ्याहो हे कोडे ।।१।।

    शरीर देई 'सुख ' तुम्हांला
    क्षणिक ते तर असती
    सुखाच्या पाठीशी छाया असते
    'दुःख ' तयाला संबोधती ।।२।।

    सुखाबरोबर नाते असते
    सदैव अशाच दुःखाचे
    वेगळे त्यांना कुणी न करती
    जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।

    'आनंद ' भावना असे एकटी
    नसे तेथे दुजी भावना
    'मोक्ष' तयाला म्हणती कुणी
    आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।

    व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे
    'आनंद' शोधता बाहेरी
    विसरुन जाता जर देहाला
    मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com

      December 30, 2013


  • योग्यतेनुसार यश

    उंचावून झेप, नको घेवू उडी
    खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१

    अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम
    यश येई तुला, तया मध्यें ठाम...२

    अनुमान काढ, आपल्या शक्तीचे
    झेपेल कां ते, विचार युक्तीचे...३

    निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी
    निराश न होई, त्यामध्ये कुणी....४

    जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता
    यश असे पाठी, ज्याची जी योग्यता...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 19, 2017