दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी
जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी
आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती
लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती
पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे
मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे
सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी
जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,
काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन
"शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”
मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे
धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए
ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी
प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 2, 2019
पाऊलोपाऊल चालत जाते,
मनामधली एक वारी,
ना टाळ, ना मृदुंग हाती,
तरी भक्तीची गोड तयारी.
रस्ता नाही धुळीचा येथे,
ना दिंडींची गर्दी भारी,
अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
अखंड सुरू ईश्वराची वारी.
सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
हीच खरी जीवनवारी.
अहंकाराचे ओझे टाकून,
प्रेमाची घेऊन शिदोरी,
करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.
कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
कधी आनंदाची फुले फुलती,
तरी न थांबे हा अंतःप्रवास,
ओढ लागलेली पंढरीची न्यारी.
शेवट नसतो या प्रवासाला,
ना थांबे कधी ही स्वारी,
ईश्वर भेटतो अंतःकरणी,
जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 15, 2026
कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची
कां शब्द न सुचतां म्हणू तुजला, ' प्रेमची '
वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी
हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी
जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई
विश्वासाचे दोन शब्द, उभारी त्यासी देई
नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते
ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते
रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते
काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते
धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हां सारे कांही
आई तुमची एक बिचारी, पर्याय तिजला जगांत नाहीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 6, 2017
प्रफुल्लित भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं
गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं...१
खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे
खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे...२
सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली
भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३
निद्रेच्या आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने
येणाऱ्या दिवसा विषयी, अजाण होता संपूर्णपणे....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 20, 2015
काळोखातही फूल शुभ्रसे फुलते आहे
July 12, 2026
तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला
प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला.....१,
जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती
धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती...२,
हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी
ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी....३,
वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे
उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 10, 2019
कां मजला ही सुंदर वाटते ?
दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ?
कोण हे ठरवी निश्चीत,
मजला काही न कळते
असेल जाण सौंदर्याची तर,
दिसेल सर्वच सुंदर नयनी
तिच एक कशी असेल सुंदर,
जग सारेच असतां सुंदर
सौंदर्याची दृष्टी नाहीं,
म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही
पूर्वग्रह दुषित असते,
तेच सौंदर्याचे परिणाम ठरते
मला जे भासते सुंदर,
दुजास ना लागे तेच मनोहर
विविधेतच्या आवडी निवडी,
सौंदर्यांत त्या वाटा काढी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 1, 2016
डोळे अर्धोन्मीलित,
स्वप्नात रंगलेले,
पापण्यांचे निमुळते काठ,
आसवांत भिजलेले ,--!!!
कळी अर्धोन्मीलित,
पाकळी कशी उमले,
पानांचे भोवती राज्य,
सुगंधाने भारलेले,--!!!
तन अर्धोन्मीलित,
तारुण्याने मुसमुसलेले,
चहूकडून फुलत,
यौवनाने भरलेले,--!!!
काव्य अर्धोन्मीलित,
पण अर्थगर्भतेने,
मनात राज्य करत,
नवरसांनी भरलेले,--!!!
सृष्टी अर्धोन्मीलित,
चरांचरांत पसरलेले,
जीवनदायी संजीवन,
जिथे तिथे मुरलेले,--!!!
प्रेम अर्धोन्मीलित,
हृदय भरलेले,
मनातील राजकुमार,
अंतरी वसलेले,--!!!
पहाट अर्धोन्मीलित,
सोनसळी प्रकाशाचे,
*धरेचे उमलते फूल,
उजेडाचे रांजण सांडले*,--!!!
© हिमगौरी कर्वे.
October 28, 2019
श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।
अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।
मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।
कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।
वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।
ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।
जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 3, 2016
आणखी एक बॉम्बस्फोट
शांततेच काळीज चिरून गेला
पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
सर्वसामान्यांची झोप उडवून गेला
संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां
आणखी एक बॉम्बस्फोट
पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला
ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
मानवतेला काळिमा फासून गेला
डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला
आणखी एक बॉम्बस्फोट
डोक बधिर करून गेलां
जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला
कवी – निलेश बामणे
February 22, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti