उपकार करुन त्याने मन माझे जिंकिले
परि वेळ गेला निघूनी आभार ना मानले
केली नाही परतफेड उपकाराची मी
कामाचे होते वेड सतत मग्न कामी
कामाच्या मार्गांत चालता पाऊल वाट
प्रयत्न करुन कार्यांत यश साधले अर्धवट
खंत वाटली मनां आठवोनी उपकार
पश्चाताप सांगु कुणा उशीर झाला फार
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
October 11, 2016
सुखदुःखाचा , मी कधीच
गणिती हिशेब नाही केला
जीवा जगविता , जगविता
कधी अट्टाहास नाही केला
वेदनांतूनही शोधीता सुखा
दुश्वास कुणाचा नाही केला
सुखसमाधान, योग भाळीचे
त्याचा हव्यासही नाही केला
निर्मळी ! सहवासात लाभले
संस्कारांचे रांजण सोबतीला
आघातातही डगमगलो नाही
विवेके , सावरले मनांतराला
खेळ सारेच त्या अनामीकाचे
ना कधी विसरलो दयाघनाला
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५२
१४ - १२ - २०२१.
December 21, 2021
हा न्याय आंधळा, ती प्रीत आंधळी
धन सत्य न्यायदा, धन सत्य प्रीती।।धृ।।
या युगी धनी ज्येष्ठ वडीलधारी
जगी गुणी,निर्धन कनिष्ठ होई
मंदिरात, धनिका दर्शन आधी
निर्धनास, दर्शनही दुर्लभ होई ।।१।।
कलियुगाची हीच रित असली
कुठली नाती अन कुठली प्रीती
कोण ते जन्मदाते, बंधुभगिनी
सखी, संतती कर्तव्याची नाती ।।२।।
जो तो हवा तसा धावत सुटला
विवेक सारा धनसंचयी गुंतला
प्रेमभाव सारे, मातीमोल झाले
भोगवाद, भोगूनी तोषली वृत्ती ।।३।।
दानपात्रे बेगड्या दातृत्वी भरली
कल्पना वृद्धाश्रमाचीच रुजली
प्रेम सोडुनी,सारेसारे इथे मिळते
मनुजा धनाने कबर तुझी खोदली ।।४।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २६.
२६ - १ - २०२२.
February 4, 2022
April 25, 2022
अंगणात उभी तुळस
ईश्वराचे दुजे रूप आई
वात्सल्याची प्रेमळ मूर्ती
जगात सुंदर भासते आई..
उदरात सांभाळते बाळ
अमृताचा फुटतो पान्हा..
डोळ्याआड जाताच बाळ
कासावीस जीव त्या वीणा...
जगण्याचा घडवते पाया
आई आधार भक्कम...
बोट धरून चालवते
आयुष्य करते संस्कारक्षम..
निस्वार्थी करूणा सागर
आशीर्वाद तिचा पाठी..
फिरून जन्माला यावे
आईचे पांग फेडण्यासाठी..
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
July 22, 2026
तुझ्यात जीव रंगला...
पाहता पाहता तिच्यात गुंतला...
शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला...
विमान सोडून बैलगाडीला भुलला...
मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला...
पांढरपेशा अचानक गावरान झाला...
स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला...
प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला...
कवी - निलेश बामणे
June 3, 2017
नियमित जाऊनी मंदिरी, श्रवण करी तो किर्तन
तन्मयतेनें ऐकत असतां, जाई सदैव तेथे झोपून...१,
एकाग्र करिता चित्त प्रभूसी, निद्रेच्या तो आहारी जाई
निघूनी जाती सर्व मंडळी, एकटाच तो तेथे राही....२,
पवित्रतेच्या वातावरणीं, प्रभू नामाच्या लहरी फिरती
झोपीं गेला कोपऱ्यांत तो, परिणाम त्या त्यावरी करती....३,
शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये, शोषूनी घेती त्या लहरी
आनंदाचे वलय भोवती, समाधान ते त्यास करी....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 18, 2015
दिपूनी गेले नयन त्या क्षणी,
बघता तिची सोज्वळ मूर्ती ।
हाक निघाली अंतःकरणीं,
तुझ्याचसाठी निर्मिली कृती ।।१।।
जरी बघितल्या अनेक सुंदरी,
ठाव मनाचे हिने जिंकले ।
सहचारीणी ही होईल तुझी,
अंतरमनी शब्द उमटले ।।२।।
अनामिक जे होते पूर्वी,
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ ती येता क्षणी,
ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।३।।
शंका भीती आणि तगमग,
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानुबंधन,
बांधले होते भावबंधनी ।।४।।
उचंबळूनी दाटूनी आला,
ह्रदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले,
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 10, 2018
तेजोनिधीच्या आगमनाने,
निळ्या आभाळां सोनझळाळी, जलद अवतरती सोनेरी किती,---- डोकावती विस्तीर्ण जलाशयी,---
आपुला रंग लेऊनी पाणी,-----
कसे खळाळते समुद्री,खाली, अस्तित्व" अमुचे दाखवतो त्यांना, प्रतिबिंबित होऊनी समुद्रकिनारी,--
निळा जलाशय तो हसे गाली, कुठून आली माझ्यावर "निळाई", वर्षा ऋतूत जेव्हा 'बरसला' तुम्ही,
तुमच्यातील पाणीच आले खाली,
निळे--शाssर रंगले माझे पाणी,
किनार्यावर लोक हिंडून बघती, जलभरले' "मेघ" कुठे असती,--
उत्सुकताही त्यांना केवढी,-?
माझ्यात तुमचे प्रतिबिंब दिसे,
भास्करच त्यांना उत्तर देई ,
थेंब -थेंब पारदर्शक होती,
ही जादू सगळी सूर्यप्रकाशाची,
सोनेरी रंगाचा मुलामा घेऊनी,
पाणी कसे वर बघत असे,
विलक्षण रंगसंगती साधती किनाऱ्यावरती बाजूची झाडे,
हिरवागार रंग कंच लेवुनी, भोवती उभी कशी हिरवाई, आपल्या अद्वैताचे साक्षीदार ते,
शिवाय किनाऱ्यावरची रेती,-----
-- हिमगौरी कर्वे
January 21, 2019
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता
धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज
मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी
त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी
सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti