(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माफी

    जिव्हाळा नि आपुलकी
    जा! तूझ्या वाट्यास नाही
    तुझ्याबद्दल लिहून मी
    का संपवू लेखणीची शाई
    आता पुन्हा मवाळ झालास
    आलासच ना माझ्या दारी
    कितीही कारले गुळात भिजले
    तरीही कडू चव सोडणार नाही
    इतके घाव वर्मी बसले
    भळभळती जखम ठायीठायी
    फुंकर घालण्या उशीर झाला
    आता तुज कधीच माफी नाही
    जाऊ द्या, माफी देऊ,
    सोडून देऊ सारे कमलपत्री
    म्हणणे सोपे वागणे अवघड
    कशी विसरू त्या अश्रूंच्या रात्री
    आला गेला इथेच सारे
    सोन्याच्या राशी कुणी नेत नाही
    इतकेच करुया, गेल्यावर म्हणती
    चांगला होता तो एक भाई!!
    -- वर्षा कदम.

      November 3, 2021


  • तिचे आणि त्या दोघांचे प्रेम

    तिचे आणि त्या दोघांचे प्रेम
    म्हणे आंधळे होते
    कुणी हा आंधळा शब्द
    शोधून काढला हेच
    कळत नाही.....
    आंधळ प्रेम आणि प्रेमात
    आंधळे होणे यात फरक कोणता
    शोधणाऱ्यानो शोधा बाबा
    इतका वेळ नाही आमच्याकडे
    आम्ही करतो तुम्ही शोधा
    तुमच्यात दडलेल्या प्रेमाचा
    एकदा शोध घेऊन बघा
    म्हणजे आयुष्य फुकट
    गेल्याचे दुःख तरी होणार नाही
    हा हा हा आणि हा हा
    -- सतीश चाफेकर.

      December 19, 2021


  • आत्ता खरंच….

    आत्ता चं दिवस हे दिवसासारखं,

    खरंच मला वाटत नाही....

    आत्ता माझ्या चेहऱ्यावर,

    खरंच हसू येत नाही....

    आत्ता तुझ्या आठवणी विना ,

    मला काही आठवत नाही....

    आत्ता वाटतं तुझ्या विना,

    काहीही जीवनात नाही....

    आत्ता प्रिये तुझ्या सारखं,

    कुणी गोड बोलत नाही....

    एकाकी एकटा असतो,

    कुणीही विचारत नाही....

    आत्ता प्रिये पूर्वीसारखं,

    नवं काय स्वप्नात नाही....

    एकटेपणा आहे फक्त,

    जगावसं वाटत नाही....

    माझं प्रेम - माझी तू ,

    काहीही नशिबात नाही....

    आत्ता प्रिये तुझ्या विना,

    काहीही जीवनात नाही....

    -- गजानन साताप्पा मोहिते

      December 25, 2018


  • हिशेब

    आता कसला तो हिशेब सारा
    शुन्यत्वाच्याच पलीकडले सारे
    अथांग सागर नजरेत किनारा
    सुखदुःखांचाच ताळमेळ सारा...

    मायाममता अन प्रेम जिव्हाळा
    ऋणानुबंधांचाच केवळ पसारा
    कुणासाठी इथे न वेळ कुणाला
    स्वार्थाचाच निरर्थक विंझणवारा...

    नातीही सारी केवळ नावापुरती
    प्रेमभावची निर्जीवी अंकुरणारा
    फुलणे, गंधणे आज कोमजलेले
    अत्तरकुपीतही, सुगंध उग्र न्यारा...

    जगणे कलियुगातील असेच सारे
    मानवतेचाच सर्वत्र दुष्काळ सारा
    निव्वळ पैशासाठी सर्वत्र लाचारी
    समाज सुजाणतेला धिक्कारणारा...

    रचना क्र.५८
    २६/६/२०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908

      July 29, 2023


  • हळुवार तू …

    हळुवार तू...हळुवार तू ...
    सारेच तुझे हळुवार...हळुवार तू ...।।धृ।।

    हळुवार लाजणे, हळुवार रुसणे,
    हळुवार हसणे, हळुवार बोलणे ।। १ ।।

    तुझे हळुवार माझ्या प्रेमात पडणे,
    तुझे हळुवार मला प्रेमात पाडणे । ।२।।

    तुझे हळुवार प्रेम हळूच व्यक्त करणे
    तुझे हळुवार माझ्या हृदयात शिरणे ।।३।।

    तुझे हळुवार मला हळूच स्पर्शने
    गालात तुझ्या हळुवार गोड हसणे ।।४ ।।

    मला पाहता हळुवार नजर चोरणे
    माझ्या डोळ्यात हळुवार तुझे पाहणे ।।५।।

    माझ्या स्वप्नात तुझे हळुवार येणे
    मी उठता तुझे हळुवार ते जाणे ।।६ ।।

    तुझे हळुवार माझ्या चित्रात उतरणे
    तुझे हळुवार माझी कल्पना होणे ।।७।।

    तुझे हळुवार माझे जीवन व्यापणे
    तुझे हळुवार माझे जीव घेणे ।।८ ।।

    ©कवी - निलेश बामणे

      June 9, 2017


  • तुला लाभलेली निसर्ग देणगी

    खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते

    आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते

    इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि

    लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी

    मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या

    बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या

    इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला

    चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला

    चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी

    दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    Bknagapurkar”Gmail.com

      November 16, 2018


  • जीवन परिघ

    एक परिघ ते आंखले आहे
    विधात्याने विश्वाभोवतीं
    जीवन सारे फिरत असते
    एक दिशेनें त्याचे वरती १

    वाहण्याची ती क्रिया चालली
    युगानुयुगें ह्या जगतीं
    कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा
    एकांच परिघात सारे फिरती २

    जेंव्हां कुणीतरी थकून जाई
    दुजा उठोनी मदत करी
    जीवन मरणाची शर्यत
    जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी ३

    मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी
    नियंत्रित कुणी करी जगाला
    परिघ सोडूनी जाण्यासाठीं
    दिसत नसे मार्ग कुणाला ४

    प्रयत्न तुमचा सदा असावा
    मध्यबिंदूकडे तो सरकण्याचा
    शक्तिरुप ते तेथेंच असूनी
    त्याच्यांत सामावून जाण्याचा ५

    भिती तुमच्या मनीं वसते
    कसे जाऊं त्या आंसाकडे
    तुकडे होतील ह्या देहाचे
    जेव्हां त्या आसांत पडे ६

    सोडूनी देण्या तो सारा खेळ
    केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे
    विसरुन जाता ह्या देहाला
    प्रभू समर्पण करण्यांत असे ७

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 21, 2019


  • एकतेची शपथ

    चला बंधूहो एक होऊ या शपथ तुम्हाला शिवरायाची
    आज देऊ या, खंबीर शाश्वती, समर्थ भावी भारताची ॥ धृ ॥

    प्रणाम असू द्या त्या शिवबाला प्रणाम हा लोकमान्यांना
    प्रणाम असू द्या वीरांना माझा, निष्ठांना नि मूल्यांना ॥
    हिमालयासम पावित्र्याला नि शांतिच्या येथील पूजेला
    प्राणांहूनही प्रिय अशा या विशाल माझ्या देशाला ॥ १ ॥

    हा हिंदूचा देश मुलांनो आहे भूमी गौतम बुद्धाची
    इस्लाम-ईसाई सर्वांस शाश्वती बात कशास हो युद्धाची ॥
    दुभंगलेली मने सांधूनि विभागलेले हात जोडूया
    एकदिलाने एकमनाने भूमीचे या पांग फेडूया ॥ २ ॥

    भारत माझी जात आणिक धर्मही माझा भारत आहे
    एक धर्म नि एक कुळीचे आपण एकच आपला मांडव आहे
    एक ईश्वर एकच अक्षर, एक सदा काळीज अपुले आहे
    एकतेचा मंत्र जपोनी, शांतीचा आपला जयघोष आहे ॥ ३ ॥

    एकोप्याने जवळ येऊ या, एक होऊ या प्रवाहाने
    एकजूटीने उत्कर्ष साधू या मिळून होऊ या एक मने
    खांद्यास मग भिडवून खांदा एक घेऊ या शपथ साथीहो
    एकमुखाने, एक लयीने गर्जत राहू जयजय हिंदुस्थान हो ॥ ४ ॥

    रामायणाचे करुनी पारायण आदर्शाचे करुया मंथन
    विषमतेला बूजवून; अस्मानी झेपाऊ या उदंड उन्मन
    संकोचित तणांना खुडूनी फुलवू प्रेमाच्या विश्वकळ्यांना
    समर्थतेची रुजवून स्वप्ने जोपासूया निरोगी मनांना ॥ ५ ॥

    बंधुभावाशी नाते अतूट होवो अडसर जातीचा नको
    सर्वांप्रती असू द्या समान आदर आनंदाला मग पार नको
    हातात गुंफूनी हात करुया मोहक मोत्यांच्या माळा
    समर्थतेच्या कळसास नेऊया गोवर्धन होऊन सारे गोळा ॥ ६॥

    -- यतीन सामंत

      November 1, 2022


  • प्रतिक्रिया

    क्रियेला प्रतिक्रिया,

    ध्वनीला प्रतिध्वनी ।

    तत्व ते सनातन,

    दिसे नित्य जीवनी ।।१।।

    फेकतां जोराने,

    आदळे भिंतीवरी ।

    प्रवास परतीचा,

    होई तुमचे उरीं ।।२।।

    शिवी वा अपशब्द,

    दिले कुणासाठी ।

    येऊनी धडकतील,

    तुमचेच पाठीं ।।३।।

    प्रेमाने बोलणे,

    सुंगध आणिते ।

    आनंदी लहरी,

    मनां सुखावते ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 27, 2016


  • काळाची झडप

    डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो,
    वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।।

    भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण,
    घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।।

    फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते,
    झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।।

    आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला,
    अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।।

    खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात नाचते,
    ठसका लागून कांहीं वेळी, हृदय बंद पडते ।।५।।

    सतत जागृत असता तुम्हीं, टाळता येई वेळ,
    सावध तुमचे चित्त बघूनी, निघून जाई काळ ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 20, 2013