शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी
विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी
शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी
झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी
काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला
रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला
रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती
नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती
खेळून भूक लागली, हा विचार आला मनी
जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना
शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत
भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत
मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं
जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी
परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते
बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते
निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना
जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 9, 2019
श्रीरामा, घन:श्यामा,sssss---घनघोर या काननी,
किती पुकारु तुमच्या नावा,ssss-
लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,--!!! .
अयोध्येस परतल्यावरी,
बसले मी राणीपदी,
आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,--
त्यातच आणखी गोड बातमी,
स्वर्गच दोन बोटे राहिला,--!!!
कुणाची नजर लागली,
ग्रहस्थिती विपरीत फिरली,
तुम्ही का सोडले मज रानी,
जावे कुठे एकाकी मी आता,--!!!
मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी राहिली,
असे काय घडले सांगा तरी,
काय चुकले माझे, पुरुषोत्तमा--!!!
या रानीवनी मी एकटी,
काट्यांत कोवळी कळी, हिंडताना-- भरकटलेली,
या भयानक अरण्यी,
नाही मज कुणीच त्राता,--!!!
कुळाचा आपुल्या वंश पोटी,--
जीव वाढे, माझिया ओटी,--
पतीने पण सोडल्यावरी,--
काय सांगू त्या लेकराला,-!!!
उद्ध्वस्त सीता, उध्वस्त जानकी उध्वस्तताच या तिन्ही लोकी,
कुठले राज्य कुठला पती,
अर्थच जीवनात न राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे©
April 27, 2019
यातना आणि वेदना,
जीवन दुसरे असते काय,
भोग आणि उपभोग,
असे त्याचे दोन पाय ,,--!!!
स्वार्थ अन् भांडण,
हेच त्याचे अवयव,
कधीकधी फक्त कींव,
कधीकधी चांगुलपण, ,--!!!
दया करुणा उपकार,
सारेच जीवन विसरले,
म्हणूनच आज सगळ्यांना,
जीव न-कोसे करणारे,--!!!
समस्या अडचणी यांचा,
त्याभोवती घेराव ,
कसे कुणाला ठाऊक,
करेल कधी संपूर्ण पाडांव,--!!!
असेना का तरीही,
त्यातच मजा आहे ,
रडके तोंड करण्यापेक्षा,
हसरे गाणे प्रिय आहे,--!!!
माणुसकी आणि सर्व भावना,
आज निषिद्ध आहेत,
स्वतःच्या पोळीवर तूप ओढणे,
एवढेच शिल्लक आहे ,--!!!
पैसा, सत्ता ,लालसा,
यांचीच सारी ओढ,
त्यांच्यात लागते सारखी,
मात देण्याची ओढ,--!!!
पण असे असूनही
मन सुद्धा मरते,
जिवंत असून मन मेलेले,
माणूस हे सिद्ध करे,--!!!!
हिमगौरी कर्वे©
February 4, 2019
माझ्या भावाची बायको, म्हणजे माझी वहिनी, हीच्या हाताचे हाड मोडले आणि plaster मध्ये आहे हात. त्या वर माझ्या भावाने एक कविता बनवली आहे. वाचनीय आहे
July 25, 2017
ठेवावं लांब लोका , भविष्य सांगणाऱ्या
बाळास माहिती द्या , आताच रांगणाऱ्या /
गलका कसा बरे हा ? भवताल भाटगाने
हलकेच नजर ठेवा ,लोकांस पांगणाऱ्या /
आणील आसमंता ,ठेवील या कराशी
तोडाच त्या कराला ,भिकेस मागणाऱ्या /
सारेच आनंदी वातावरण भोवताली
शोधाच कोण आहे , बाम्बस टांगणाऱ्या /
गझलेत 'कौशला ' म्हणे हा मक्ताच झाला
नाहीच आवडली ,डांबास डागणाऱ्या
-- श्रीकांत पेटकर
February 25, 2019
या अशा सांजवेळी,
बाहुपाशी, घे जवळी,
रात्र उतरून आली खाली,
तुजविण जिवाची काहिली,
हुरहुरते मन अशा समयी,
तुझ्यासाठी,आंत तुटते काही
जीव कांतर कांतर होई,
आत्मा तरसे मिलनासाठी,
लौकिक सुखे भोवताली,
जीव कसा जळे त्यातही,
तरसवे मज विरहाग्नी,
तुझ्या शपथांची येतां स्मृती,
उले काळीज माझे किती,
तुला कल्पनाही नाही,
प्रेमाचीच लागे कसोटी,
ताटातुटीचीव्यथा ही,
कोरडेपण तुझे मजसी,
सारखे आत खात राही,
रुक्षतेचे तुझ्या काटे सलती,
टोच बोंच कशी कायम राही,
वरून वरून चित्रे देखणी,
नशीब फरांटे मारत राही,
घायाळ तनी बंबाळ मनी,
एकच छळे मज मूर्ती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
May 25, 2019
चालताना त्या रस्त्यावर आज
का अडखळली मम पाऊले
तोच रस्ता मीही तोच परी
का सर्व अनोळखी भासले ।
त्याच रस्त्यावरील तेच घर
परी आज अपरिचित वाटले
बंद खिडकी ती पाहून घराची
मम नयनी अश्रु का दाटले ।
अजूनही वाटते कधीतरी
ऊघडेल ती खिडकी कुणीतरी
पुन्हा तो ओळखीचा चेहरा
पाहील वाकून त्या खिडकीतूनी ।
सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
२५ सप्टेंबर २०१८
October 5, 2018
November 14, 2021
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 14, 2012
बागेमधला निसर्ग सारा, टिपत होतो मी
रात्र पडूनी चंद्र आकाशी, बाग झाली रिकामी ||१||
बाकावरती बसून एकटा, मोजत होतो तारे
लुकलुकणारा प्रकाश तो, अंक चुकवी सारे ||२||
अगणित बघुनी संख्यावरी, प्रसन्न झाले मन
किती वेळ तो निघूनी गेला, राहिले नाहीं भान ||३||
शितलेतेच्या वातावरणीं, शांत झोप लागली
नयन उघडतां बघितले मी, पहांट ती झाली ||४||
गेल्या निघूनी सर्व तारका, आकाशाला सोडूनी
शोधूं लागले नयन माझे, त्यांना सर्व दिशांनी ||५||
चकित झालो फुले बघुनि मी, सुंदर फुललेली
सुचवित होती मिष्कीलपणें, का तारकांच खाली ? ||६||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 21, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti