मातीमध्ये हात घालतो त्याला कळते
मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते
प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो
प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते
जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ?
जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते
मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो
किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते
दिशा एकही राहत नाही हातामध्ये
तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते
©®_ महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
9579081342
November 5, 2020
वारी म्हणजे फक्त पावलांचा प्रवास नव्हे,
ती विठ्ठलाकडे निघालेल्या मनाची अखंड आस आहे.
वारी म्हणजे टाळ-मृदंगाचा मंगल नाद,
आणि हरिनामात हरवलेल्या भक्तीचा आनंद.
वारी म्हणजे धुळीतही चंदनाचा सुगंध,
प्रत्येक पावलागणिक फुलणारा श्रद्धेचा छंद.
वारी म्हणजे दिंडीत नांदणारे प्रेम,
जात-पात विसरून जपलेले माणुसकीचे नेम.
वारी म्हणजे तुळशीमाळेतील अढळ विश्वास,
आणि "ज्ञानोबा-तुकाराम" म्हणत चालणारा प्रेमळ सहवास.
वारी म्हणजे डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू,
आणि विठ्ठलाच्या चरणी संपूर्ण आत्मसमर्पण.
वारी म्हणजे आईच्या मायेचा कोमल स्पर्श,
संतांच्या अभंगांतून उमलणारा भक्तीचा हर्ष.
वारी म्हणजे स्वतःला शोधण्याची वाट,
अहंकार झटकून प्रेमाची धरलेली कास.
वारी म्हणजे पंढरीकडे जाणारा रस्ता नव्हे,
तर प्रत्येक हृदयात उभ्या विठ्ठलाचे दर्शन.
वारी म्हणजे चालणारी भक्ती,
वारी म्हणजे जगणारी प्रीती.
वारी म्हणजे माणुसकीचा अखंड उत्सव,
आणि विठ्ठलनामात विलीन होणारी अनंत भक्ती.
वारी म्हणजे चालता चालता देव भेटण्याचा सोहळा,
आणि माणसामाणसांत विठ्ठल शोधण्याचा उत्सव.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 14, 2026
तप्त लोखंडात, लपली ती आग
दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग...१,
सुंदर फूलात, सुंगध तो छान
अवती भवती काटे, ते कठीण...२,
विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला,
झटका तो देई, स्पर्श होता तिला..३,
सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया
न दिसे ती आम्हा, असे मोह माया...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 9, 2015
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
December 18, 2023
वळून बघता पूर्व आयुष्यी,
प्रखरतेने हेची जाणले
घडले नाही कधीही ते ते,
हवे असूनी मनी योजीले....१
सभोवतालची देखूनी स्थिती,
आखती योजना कल्पकतेने
खेळामधली चाल नियतीची,
ध्यानी न येते दुर्दैवाने.....२
मार्ग तिचे ठरले असूनी,
बांधलेले इतर जीवांशी
अपूर्व योजना निसर्गाची,
कळेल कुणाला सहज कशी....३
जाळीतल्या धाग्याची टोके,
गुंतली असती ग्रह गोलाशी
फिरता फिरता खेच पडे,
वा ढीली होवून जाती कशी.....४
सुख दु:खाचे परिणाम हे,
असेच दिसून येती मग
अनपेक्षीत हे जेव्हा घडते,
म्हणती त्यासी दैवी अंग....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 22, 2016
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
May 31, 2012
जीवन काय आहे,
मला जे वाटत असे,
ते समजून घ्या तुम्हीं,
प्रभूमय ते कसे ।।१।।
मृत्यूचा तो विचार,
कधी न येई मनी,
मृत्यू आहे निश्चित,
माहित हे असूनी ।।२।।
भीती आम्हां देहाची,
कारण ते नाशवंत,
न वाटे मरूत आम्ही,
आत्मा असूनी भगवंत ।।३।।
आत्मा आहेची अमर,
मरणाची नसे भीती,
जी भीती वाटते,
ती असते देहाची ।।४।।
आत्मा नसे कुणी,
तो तर प्रभूच आहे,
साकारलेला सर्वत्र,
बाहेर व अंतरी राहे ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 14, 2016
क्रियेला प्रतिक्रिया,
ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन,
दिसे नित्य जीवनी ।।१।।
फेकतां जोराने,
आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा,
होई तुमचे उरीं ।।२।।
शिवी वा अपशब्द,
दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील,
तुमचेच पाठीं ।।३।।
प्रेमाने बोलणे,
सुंगध आणिते ।
आनंदी लहरी,
मनां सुखावते ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
March 27, 2016
मुके बसा
कायी सांगु नोका
मायीत हाये आमाले।
गांधी बाबा चा..किती..
पुळका हाये तुमाले।
कायी सांगु नोका..
ते गांधी बाबा चे तीन माकडं।
तुमचं न त्यायचं त
भल्ल हाये वाकडं।
बस झाले तुमचे ते
सूत अन चरखे।
मायीत हाये..गांधीजी
किती आपले न परके।
कायी सांगू नोका..की
गांधीजी हात नोटावर।
रोज लावता थुका...
घेऊन दोन बोटावर।
कायी नोका सांगू आमाले
सत्त्याग्रह अन मिठाचं।
कायले करता कौतुक
काढेल टपाल तिकिटाचं।
कायी हाये तुमी ...
म्हणता देश स्वच्छ करू।
अन त्या नावाखाली..
सोताचेच खिसे भरू।
गांधीजीच नाव घेऊन
जाता मतं मांग्याले।
तुमाले तरी समजले का गांधी...
चालले मोठे ..आमाले सांग्याले।
आबे गांधीजी का कोणी माणुस हाये..
ते त विचार धन हाये।
आमचा जीव की प्राण...
आन आमचं मन हाये।
-- नारायण जाधव, खामगाव.
January 30, 2020
नातं कसं असावं? नातं डब्यासारखं असावं..
उघडल्यावर रुचकर, खमंग आठवणी देणारं आणि त्यांना जपूनही ठेवणारं..
तर कधी नाविन्याला जन्माला घालणारं..
नातं कसं नसावं..? तुझ नि माझं सारखचं रे, असं न म्हणणारं
वा माझं सगळ्यांवर सारखाचं प्रेम आहे हे हि न सांगणारं..
नातं कसं असावं? नातं डब्यासारखंचं असावं..
ज्याची झाकणं ज्याची त्यालाचं बसतील असं..
- शिल्पा परांडेकर
October 23, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti