विसरलास का श्रीरंगा

विसरलास का श्रीरंगा, गोकुळीच्या गोपिकांना,
सोडून गोकुळां जाता,
तुम्ही द्वारकाधीश होता,--!!!

आठवतो बाळकृष्णा,
तुझा हुडपणा आम्हा,
बाळपणीचा काळ सुखाचा,
येतो प्रत्यय जेव्हा तेव्हा,--!!!

जो तो गेला भूतकाळा,
काय घडते वर्तमाना,
कुणाचा कोणास नाही पत्ता,
विराण ही शांतता,
खायला उठे गोकुळा,--!!!

मौज, मस्ती करत दंगा,
स्मरतो साऱ्या बालगोपाळा, दही-दूध-लोणी,पळवत होतां,--
कोण रागे भरणार तुम्हां,--!!?

कोण होई तक्रार -करतां,-? होतास गोंडस नंदकिशोरा,
अगणित तुझ्या खोड्या,--?
नाटके अन् तुझी अदा,
गाई वासरे सगळी खिल्लारे,
त्रस्त होते नंद-यशोदा,--!!!

धुमाकूळ चाले तुम्हा गोपाळांचा,
साक्षीलाही आहे यमुना,--
तिच्याच तीरी साऱ्या लीला,
साथही देई तुम्हां उधांणता,--!!!

अक्रूराने तुज दूर नेता,
गोकुळात भयाण शांतता,
जो तो येथे बघ हिरमुसतां,
कधी बाळकृष्णा, तुम्ही परततां,--?

© हिमगौरी कर्वे.



विसरलास का श्रीरंगा, गोकुळीच्या गोपिकांना,
सोडून गोकुळां जाता,
तुम्ही द्वारकाधीश होता,–!!!

आठवतो बाळकृष्णा,
तुझा हुडपणा आम्हा,
बाळपणीचा काळ सुखाचा,
येतो प्रत्यय जेव्हा तेव्हा,–!!!

जो तो गेला भूतकाळा,
काय घडते वर्तमाना,
कुणाचा कोणास नाही पत्ता,
विराण ही शांतता,
खायला उठे गोकुळा,–!!!

मौज, मस्ती करत दंगा,
स्मरतो साऱ्या बालगोपाळा, दही-दूध-लोणी,पळवत होतां,–
कोण रागे भरणार तुम्हां,–!!?

कोण होई तक्रार -करतां,-? होतास गोंडस नंदकिशोरा,
अगणित तुझ्या खोड्या,–?
नाटके अन् तुझी अदा,
गाई वासरे सगळी खिल्लारे,
त्रस्त होते नंद-यशोदा,–!!!

धुमाकूळ चाले तुम्हा गोपाळांचा,
साक्षीलाही आहे यमुना,–
तिच्याच तीरी साऱ्या लीला,
साथही देई तुम्हां उधांणता,–!!!

अक्रूराने तुज दूर नेता,
गोकुळात भयाण शांतता,
जो तो येथे बघ हिरमुसतां,
कधी बाळकृष्णा, तुम्ही परततां,–?

© हिमगौरी कर्वे.

Author