March 11, 2022
कळले माझे मलाच आता जगणे माझे अल्प
July 12, 2026
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाचे शरीर अमोल किंमतीचं
पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं
माणसाच्या हातून चांगलंच घडावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा
माणसानं आचरणात बदल करावा
आपल्या आचरणातून इतरांना सांगावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं नजरेतून चांगलच पहावं
चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं
चांगलं वाईट माणसाला कळावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं चंचल मनाला आवरावं
चांगल्यांच्या संगतीत त्याला रमवावं
वाईटाला दूर करावं, चांगल्याला जवळ करावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसानं तहानलेल्या जीवाला पाणी पाजावं
भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं
इतरांसाठी प्रेम द्यावं
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
माणसाला माणुसकीचं वागणं कळावं।
माणसानं कसं माणसासारखं वागावं।।
January 28, 2020
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।
बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा ।।४।।
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा
आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा ।।५।।
तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 18, 2020
(अरुणा साधू, मुंबई) – माझे यजमान “अरुण साधू” ह्यांना जाऊन दोन वर्ष होत आहेत. २५ सप्टेंबर ला ह्यांचा दुसरा स्मृतीदिन. दिवस,वर्ष सरतात, पण क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते आणि माझे मन व्याकुळ होऊन जाते. ह्या व्याकुळतेतून सुचलेली ही कविता…..
September 24, 2019
तिचे अस्तित्व आज तीच शोधत होती
कधी काळाच्या ओघात रडत होती
युगे युगे लोटली तिच्या या लढाईला
स्त्रीचं ती प्रश्न समाजास विचारत होती
कधी गर्भात खुळल्याजात होती
ती गर्भात समाजाला नकोशी होती
तिच्या रडण्याचा आवाज नाही ऐकला कोणी
निरागस कळी ती जगणे शोधत होती
कोण करेल ग माझे स्वागत असे घर शोधत होती
अन् मिळालाच तोही आनंद एक आई तिची वाट पाहत होती
नको नको म्हणता म्हणता आलेच मी आयुष्यात
या हळव्या प्रश्नाने ती आज फारच खुश होती
चिमुकल्या पावलांनी ती अंगणात खेळत होती
मंद मंद वाऱ्यासवे फुलासमान डोलत होती
निरागस तिच्या हसण्याने हसत होते अंगणही
पण लगेच तिच्या खेळण्यावर निर्बंध लादले जात होती
पोरींची जात तू या शब्दाने ती हिनल्याजात होती
अन् परक्याच धन तिला आपलेच करीत होती
शाळेचे दिवस कसे भरकन उडून जातात
पण निरागस चेहऱ्यावरून आसवे वाहत होती
जगणे बदलते पण रित मात्र तीच होती
लवकरच ती सासरी जाणार होती
वाजले सनई चौघडे पडल्या डोई अक्षदा
नव्या आयुष्याचे ती स्वप्न पाहत होती
दिवस गेले सुखाचे पण आता ती हुंड्यासाठी जळत होती
जळता जळता त्या आसवाला हलकेच पुसत होती
आता पुरे झाले होते आयुष्य संघर्षच जगता जगता
पण माझा स्त्री असणे हा काय गुन्हा हा प्रश्न ती विचारत होती
-- अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जी अकोला
September 11, 2019
हासतात तुला वेड्या ते,
पकडला गेलास समजून
परि सहानूभूती आहे त्यांच्यात,
चोर आहेस म्हणून
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 16, 2019
कधी वाटते,
कोसळता पाऊस व्हावे,
रपरप पडत धरणीला,
सर्वकाळ बहरत ठेवावे,---
कधी वाटते
उसळणारा दर्या व्हावे,
विशाल रूप बघणार्यांना,
चकित करून सोडावे,---
कधी वाटते
लख्खकन आभाळी चमकावे, प्रचंड मोठी वीज होऊनी,
पृथ्वीला भारावून टाकावे,---
कधी वाटते
घनगर्द अरण्य व्हावे,
भयभीत आकार पाहुनी,
इतरांनी गर्भगळीत व्हावे,---
कधी वाटते,
झुळझुळणारा झरा व्हावे, आपल्याच धुंदीत मस्तमौला, सगळीकडे थेंब लुटावे,---
कधी वाटते,
वळसेदार नदी व्हावे, गावाला कुशीत घेऊनी,
त्याची प्रेमळ आई बनावे,---
कधी वाटते,
गगनांगणी मेघडंबरी व्हावे, विविधरंगी पंचमी खेळत,
धरेवरील सृष्टीला न्याहाळावे,--!!!
हिमगौरी कर्वे ©
August 9, 2019
शब्दांविना संवादू,असंभव"" तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी",
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,--
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय--!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,--!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,--
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,--!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
April 8, 2019
गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती.
November 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti