(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाजारचा खाऊ

    तू एक बहीण
    आम्ही तिघे भाऊ
    वाटे टाकू चार
    मिळून खाऊ, खाऊ

    बाजारच्या खाऊची
    मजा असते भारी
    पुडा सोडताच
    तोंडा सुटते खारी

    गोडीशेव, जिलेबी
    शिळे नको ताजे
    आई म्हणते कशी
    नका खाऊ भजे

    रंग फळांचा दिसे
    गंज आबलुकवाणी
    दाताने कुरतडावे
    जिभेस सुटते पाणी

    उघडा खाऊ खाऊन
    दुखेल बरकां पोट
    पालेभाज्या खाऊन
    सुधारते ती तब्येत

    सकस खा, खूप खेळा
    परिपाठास शाळेत पळा

    -- विठ्ठल जाधव
    शिरूरकासार, जि.बीड
    सं. ९४२१४४२९९५

      November 23, 2018


  • आस्तित्व

    समोर ये तूं केंव्हा तरी,
    बघण्याची मज ओढ लागली,
    फुलूनी गेली बाग कशी ही,
    बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।

    कल्पकता ही अंगी असूनी,
    दूरद्दष्टीचा लाभ वसे,
    अंधारातील दुःखी जनांची,
    चाहूल तुज झाली असे ।।२।।

    शीतल करुनी दुःख तयांचे,
    जगण्याचा तो मार्ग दाखविला,
    सोडूनी सारे वाटेवरी,
    आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।

    आस्तित्वाची चाहूल येते,
    आज इथे केंव्हातरी,
    तव आशीर्वादे जगतो सारे,
    हीच पावती त्याची खरी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      April 30, 2021


  • कुठे काय

    कुठे काय अन कुठे काय

             पैशाला येथे फुटले पाय 

    दीड-दोन दमडी साठी

    ईमान येथे विकला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    सत्य झाले मिथ्य, मिथ्यस मानले तथ्य

    मक्कारी दुनिया करे खोट्याचे नेपथ्य

    चौका चौकां मध्ये असत्या चा

    पोवाडा आता गायला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    जुने गीत, नवीन संगीत

    चोरीस आम्ही नाही भित

    नाविण्य आला नाही संधी

    हुन्नर येथे लयाला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    कसला छंद, ही कसली धुंदी

    नशेच्या बाजारातील हे सगळे नंदी

    दिवसा ढवळ्या या पोळ्यांचा

    रंगा नाच रचला जाय

    कुठे काय अन कुठे काय

    लोकांचे राज्य, पोसले राजे

    जाे तो स्वार्थाची पोळी भाजे

    तळागाळातील लोकांन साठी

    येथे कोणी वाली नाही

    कुठे काय अन कुठे काय

    तर्काचा बाेध, उत्तरांची शोधा शोध

    विज्ञानाच्या नावे सोडला प्रबोध

    आधुनिकतेच्या पायाखाली

    नैतिकता ही चिरडली जाय

    कुठे काय अन कुठे काय

    नवा दिवस नवीन प्रीत

    रोज हवा नवीन मित

    वासनेच्या लाटेवरती

    मन मात्र पोहोत जाय

    कुठे काय अन कुठे काय

    कुठे काय अन कुठे काय

    सगळच येथे जुनेच हाय

    तुम्हीच तुमचं बघा विनोद बाबू

    बाकी दुनिया भाड मे जाये

    -- विनोद खराडे

      July 16, 2021


  • ऋतू

    किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये,
    वाट पाहताना जीव थकला,
    मन चिंतातूर आतमध्ये,---

    सारखे हे काळीज उले,
    चंद्र उगवे हा डोईवरी,---
    का सवतीने वाट अडवली,
    मोहात पाडत तुला सत्वरी,--!!!

    कितीक दिन होऊन गेले,
    ना निरोप कसला संदेश,
    तू गेल्यावर भोवताली,
    वाटे हा परकाच प्रदेश ,--!!!

    भोवती आहेत नाती सारी,
    आवडते ही मज सासुरवाडी,
    राम नाही पण त्यात कुठला ,
    एकली भासते मी संसारी,--!!!

    रामरगाडा अवती असता,
    सांगाया कोणास जावे ,
    दुःख तुझ्या विरहाचे रे,
    कोणापाशी मोकळे बोलावे,--!!!

    आता येईल जीवा बेचैनी,
    कसे त्यास रमवावे,
    डोळे लावून बसू किती,
    दूर तू त्या परागणी,--!!!

    नसते तुला कधीच चिंता,
    घरच्या आपल्या माणसांची,
    ते सगळे मात्र जीव टाकती,
    कशी तुझी बेपर्वा वृत्ती,--!!!

    मनमोर माझा नाचेल खरा,
    जेव्हा कधी येशील तू ,--
    इतरांसाठी असेल ग्रीष्म, माझ्यासाठी फुलेल ऋतू --!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 28, 2019


  • स्मरण

    आव्हानांना पेलत पेलत
    आता फक्त जगत रहावे

    कयास सारे कलियुगाचे
    ओळखुनी सतर्क जगावे

    व्याख्या जगण्याची बदलली
    तीच उमजुनी जगत रहावे

    भुरळ आता नावीण्याची
    जगताना सावध असावे

    जुने जे, ते सोने असते
    ते मना समजवित रहावे

    मन:शांती हेची सुख खरे
    याचे सदा स्मरण असावे
    *******

    --वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३१३

    २९/११/२०२२

      December 11, 2022


  • दिवसां दिसणारा चंद्र

    रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं

    भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं....१

    कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती

    कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती....२

    शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत

    एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात....३

    कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो

    चुकून देखील तुझ्या राज्यीं, कधी येत नसतो....४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 27, 2018


  • खूर्चीसाठी काय पण…

     

      February 25, 2014


  • ती – माझी छत्री

    ती – माझी छत्री
    हल्ली असे होत नाही...
    मी घराबाहेर पडल्यावर ती माझ्या सोबत नाही...
    तिला माझ्या सोबत पाहून तो आलाच नाही...
    तिला पाहताच तो कोठे दडून बसला मला माहीत नाही...
    तो आल्याखेरीज तिच्या माझ्यासोबत असण्याला काही अर्थच नाही...
    तो आल्याखेरीज ती ही कधी मोकळी होत नाही...
    तो आल्यावर ती मोकळी झाल्याखेरीज राहात नाही...
    आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने मायेचा पदर धरायला ती विसरत नाही...
    तेंव्हाच मला तिची माझ्यासोबत असण्याची खरी किंमत कळल्या खेरीज राहात नाही....
    तो येतो तसा जातो... त्याच्या प्रेमात ओलीचिंब झालेली ती ही मग सुकल्याखेरीज शांत होत नाही...
    मी तर सुकाच असतो... तिच्यामुळे....
    पावसात भिजणार्‍या तिच्याकडे पाहात... ती भिजून ओलीचिंब झाल्याखेरीज मी काही जागचा हळत नाही...

    -- कवी- निलेश बामणे ( एन.डी. )

      July 14, 2024


  • ज्यांचे घर फुलून आले

    ज्यांचे घर फुलून आले ।।

    त्यांनी आसरा द्यावा ।।

    ज्यांना ज्ञान प्राप्ती झाली ।।

    त्यांनी लोकांना शिक्षण द्यावे ।।

    ज्यांचे नाते सूर्या बरोबर आहे ।।

    त्यांनी थोडा उजेड द्यावा ।।

    ज्यांचे नाते चंद्रा बरोबर आहे ।।

    त्यांनी थोडा अंधार द्यावा ।।

    निसर्गाने दिलेली जन्माची ।। देणगी स्विकारून घ्यावे ।।

    ।। जाता जाता मातीला समृद्ध आणि भेट देऊन जावे ।।

    • कवी : सचिन राजाराम जाधव
    • sachinrjadhav1992@gmail.com

      November 21, 2018


  • फुलझाडाचे स्वातंत्र

    उगवले होते जंगलात ते उंच माळावरी

    रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी //

    जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी

    खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी //

    वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे

    ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें //

    वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा

    स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा//

    कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला

    बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला //

    खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते

    आधूनिकतेची दृष्टी ठेवूनी वाढवित त्यास होते//

    डेरेदार डौलदार भरगच्च भासला तो आता

    परि स्वातंत्र्याच्या जीवनाला कात्री लागून जाता //

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 8, 2020