(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उचलून जेव्हा पापण्या

    उचलून जेव्हा पापण्या माझ्याकडे तू पाहिले
    चांदणे चंद्राविना मी सांडताना पाहिले
    पौर्णिमा उतरुन आली की धरेचा स्वर्ग झाला
    ऐश्वर्य साऱ्या नंदनाचे बहरताना पाहिले पाहिले
    तू चुकवूनी सारे पहारे भोवतीचे
    लाजले मी भासुनी तू लोचनांनी स्पर्शिले
    पाहतां तू अंतरीचे शल्य माझ्या फूल झाले
    लोचनांसाठीच या मी ताप सारे साहिले
    मानिनी होते कधी मी या क्षणी झाले सती
    वाहुनिया सारे तुला मी हे रितेपण ल्यायले.

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

      April 3, 2023


  • विरहार्त रात्र ही

    विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते,
    भासे तीही एकटी,
    चमकण्यात कमी जाणवते,--!!!

    चेहरा तिचा उतरुनी,
    निस्तेज ती दिसते,
    का बुडाली कुणाच्या विरही,
    कोडे मजला वाटते,--!!!

    असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले,
    चंद्र दिसे ना कुठे जवळी,
    रजत किरणांचे लेऊन शेले,--!!!

    समूहातून दूरच उभी,
    अंतरी कोलाहल उठलेले,
    लांबूनही ती दिसते "दुःखी*,
    पाणी डोळां साठलेले,--!!!

    वाट बघे सुधाकरांची,
    जीव पहा कसा लावते,
    तळमळत आत आत सारखी, सख्याची कल्पना करते,--!!!

    मिलन दूर,- दर्शन नाही, अधिकाधिक उदास वाटते,
    वाट पाहत साजणाची, चमचमण्याचा देखावा करते,--!!

    गायब माझा राजा कुठे,
    विचार करते अंतर्यामी ,
    स्थानाहून ना ढळणे,
    धोरण तिचे मनोमनी,--!!!

    इथे धरणीवरती मी,
    राजसा, तुझी वाट पाहते,
    कढ पचवत विरहाचे, जिवाशिवांचीच ओढ लावते,--!!

    © हिमगौरी कर्वे

      January 9, 2020


  • चतुर्भुज गणेश

    रक्तवर्ण कांती । कटी पितांबर।
    नयन सुंदर। तेजोमय।।१।।

    ललाटी त्रिशूल। सोनेरी मुकुट।
    त्यावरी किरीट। नागेश्वर।।२।।

    स्थानापन्न झाली। लंबोदर मूर्ती।
    गण अधिपती। वरदात्री।।३।।

    पाश अंकुशाचे। दोन कर उभे।
    मोदक ही शोभे॥ एक हाती ।।४।।

    दुजे हस्ते देतो। फळ आशीर्वाद।
    विघ्न निर्विवाद। दूर होई।।५।।

    अष्टविनायक। सभा मंडपात।
    बसले मध्यात। चतुर्भुज।।६।।

    दिव्य भव्य तुच। गणाधीश देवा।
    घडवावी सेवा। प्रतिभेने।।७।।

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      June 11, 2026


  • एका मनाचे हे भाग

    एक विशाल मन, भाग त्याचे अनेक ।

    विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१,

    छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे ।

    अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२,

    मनाचे स्वभाव, सारखेच असती ।

    फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती...३,

    अगणीत मनें, कोठे नसे फरक ।

    अनेक बनली, जनक तिचा एक....४,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 14, 2020


  • तुझा स्पर्श

    सप्त शृंगी गडासी
    वणीची देवी
    धावत येते
    गाईन तुझी ओवी

    पायरी पायरीस
    हा तुझा स्पर्श
    मना मोहवी
    मनी दाटतो हर्ष

    बोलले मी नवस
    साडी चोळीचा
    आले फेडण्या
    नित्य ध्यास वणीचा

    रुप सुंदर तुझे
    हे मोहविते
    भक्तासाठीच
    गडा वस्ती करिते

    लोळण घेतले मी
    तुझ्या पायाशी
    आसुसले मी
    गं वर मिळण्याशी

    महती गाईन मी
    आई अंबाई
    वणी वासिनी
    तुच माझी धनाई

    मागेन मी जोगवा
    हा स्पर्श तुझा
    या दरबारी
    फिटे नवस माझा

    सौ.माणिक (रुबी)

      December 12, 2019


  • सिकंदरची शांतता

    दिग्वीजयाच्या स्वारीवरती, निघे सिकंदर सैन्य घेवूनी

    जग जिंकण्या ध्येय मनाशीं, महान आशा उरी बाळगूनी

    आश्वा रुढ ते सैनिक सारे, सिकंदराच्या मागें धावती

    लगाम खेचूनी वृक्षा पाशीं, एक साधू तो बघूनी थांवती

    पृच्छां करितां साधू म्हणाला, शांत चित्त तो बसला असे

    मिळविण्यास ते कांहीं नसतां, शोध प्रभूचा घेत दिसे

    सिकंदर वदे देश जिंकूनी, संपत्ती घेई लुटून सारी

    जगत् जेता नांव कमवूनी, जाईन माझ्या देश दरबारी,

    काय करशील नंतर तू गे? प्रश्न विचारी तो साधू जन

    "शांत राहण्या प्रयत्न करित, अखेरचा मी काळ घालविन”

    मिस्कीलतेने साधू विचारी, मी तर आजच शांत आहे

    धडपड सारी करूनी एवढी, माझ्याच मार्गे तुम्ही जाए

    ध्येय विसरूनी सारे आपण, धावत असतो वेड्या परी

    प्रभू मिलनाचे कार्य खरे, ते मनास जागविते केंव्हां तरी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      May 23, 2016


  • मनातुरता

    क्षिणले स्वर आता
    थकलेली ही लोचने
    जाहली कातरवेळा
    वाटते तुजला भेटावे ।।१।।

    बिंब ते तेजाळलेले
    सांजेस गुलमुसलेले
    गगनही अंधारलेले
    वाटते तुजला भेटावे ।।२।।

    उचंबळलेल्या भावना
    मिठीस आसुसलेल्या
    शिथिल सारीच गात्रे
    वाटते तुजला भेटावे ।।३।।

    क्षितीजी रंग केशरी
    सत्यप्रीत ती आगळी
    मन स्मरणात गुंतलेले
    वाटते तुजला भेटावे ।।४।।

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ८०

    १९ - ६ - २०२१.

      June 23, 2021


  • आधाराचा हात देई पंढरीचा नाथ

    ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात

    आधाराचा हात देई पंढरीचा नाथ ।।

    चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी –

    विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी

    मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात ।।

    जरी मी न जाऊं शकलो कधी पंढरीला

    मंदिरीं न पाहूं शकलो विटेवर हरीला

    भाग्यवंत परि मी, विठ्ठल भेटला मनात ।।

    पाडुरंगनाम येतां एकदाच माझ्या तोंडीं

    स्वर्गानंदाच्या स्पर्शें पावन झाली कुडी

    झरा अमृताचा अक्षय प्रगटला मुखात ।।

    जगत्-भान हरपे माझें, अंतरीं निवालो

    पाप सर्व जळलें माझें, पुण्यवंत झालो

    जन्मचक्र-भीती विठ्ठल तोडतो क्षणात ।।

    -- सुभाष स. नाईक

    पंढरीचा राणा

      July 2, 2017


  • गजल की कविता

    गजल आहे की कविता आहे
    गुंफलेल्या शब्दांची माळ आहे !!

    राग आहे की ताल आहे
    सूर शब्दांची धमाल आहे !!

    देव आहे की भक्त आहे
    आरोळीतला मृदंग टाळ आहे !!

    मी आहे की तू आहे
    डोक्यावर ठेवलेली झाल आहे !!

    आवाज आहे की सुर आहे
    एक गळ्यातला स्वर आहे !!

    रक्ताची आहे की भावनांची आहे
    जी आहे ती अस्सल आहे !!

    -- विश्वनाथ शिरढोणकर
    इंदूर, म.प्र

      July 13, 2023


  • समलैंगिकता

     

      December 13, 2013