कृतकृत्य

निसर्ग भगवंताचे रूप
स्पर्श दिव्य अनामिक
लाभता या स्पंदनांना
आत्मिक शांती सात्विक....

अविष्कार पंचभुतांचे
सदा सर्वदा सौख्यदायक
नक्षत्रे अलंकार सृष्टिचे
लोचनी उमले नंदनवन....

क्षण सारेच भारावलेले
स्वानुभूतिच आनंदघन
दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ
मनमनांतर पावन पावन....

सृजनता ही अलौकिक
झुळझुळते तृप्त जीवन
निर्मोही, भाव परस्पर
निरंतर कृतकृत्य जीवन....

--वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र.१९२

८/८/२०२२



निसर्ग भगवंताचे रूप
स्पर्श दिव्य अनामिक
लाभता या स्पंदनांना
आत्मिक शांती सात्विक….

अविष्कार पंचभुतांचे
सदा सर्वदा सौख्यदायक
नक्षत्रे अलंकार सृष्टिचे
लोचनी उमले नंदनवन….

क्षण सारेच भारावलेले
स्वानुभूतिच आनंदघन
दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ
मनमनांतर पावन पावन….

सृजनता ही अलौकिक
झुळझुळते तृप्त जीवन
निर्मोही, भाव परस्पर
निरंतर कृतकृत्य जीवन….

–वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र.१९२

८/८/२०२२

Author