तीची गगनभरारी

विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री
अबला नाही तर दुर्गा असलेली स्त्री
शरीराने असली नाजूक तरी रोजची कसरत करते ती
मनाने असली हळवी तरी खंबीर असते ती
माहेर, सासर जन्मापासून सगळी नाती सांभाळत असते
स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्यभर जगत असते
स्त्री म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याची खाण असते
चार भिंतीना घरपण देऊन घराचे पावित्र्य राखत असते.
स्त्रीवर अत्याचार करणे आता थांबवा
महिला दिनाचे औचित्य वर्षभर राखा
मुलगी जन्मास आली तर तिला नाकारू नका
उलटपक्षी महिलांचे सक्षमीकरण करा
स्त्री शक्तीचे पाऊल आता पुढे पडू दे
उंच गगनभरारी तिला तिच्या अवकाशात घेऊ दे
स्त्री पुरुष संसार रथाची दोन चाके
बरोबरीने चालतील तरच आयुष्य होईल ओके
आयुष्य होईल ओके ।

- मिनल आठल्ये

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री
अबला नाही तर दुर्गा असलेली स्त्री
शरीराने असली नाजूक तरी रोजची कसरत करते ती
मनाने असली हळवी तरी खंबीर असते ती
माहेर, सासर जन्मापासून सगळी नाती सांभाळत असते
स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्यभर जगत असते
स्त्री म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याची खाण असते
चार भिंतीना घरपण देऊन घराचे पावित्र्य राखत असते.
स्त्रीवर अत्याचार करणे आता थांबवा
महिला दिनाचे औचित्य वर्षभर राखा
मुलगी जन्मास आली तर तिला नाकारू नका
उलटपक्षी महिलांचे सक्षमीकरण करा
स्त्री शक्तीचे पाऊल आता पुढे पडू दे
उंच गगनभरारी तिला तिच्या अवकाशात घेऊ दे
स्त्री पुरुष संसार रथाची दोन चाके
बरोबरीने चालतील तरच आयुष्य होईल ओके
आयुष्य होईल ओके ।

– मिनल आठल्ये

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →

MS Team 

This is editor1