हे टिपूर चांदणे

हे टिपूर चांदणे,सख्या तुला बोलावे,
आकाशातील घनमाला,
घराची तुला वाट दाखवे, --||१||

डोईवरचा चंद्रमा,
माझिया प्रियाला स्मरण देई,
एक चंद्र घरी वाट पाहे,
सारखा सूचित करत राही,--||2||

शांत नीरव वातावरणी,
बघ सजणा बोल घुमती,
विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे,
कानात कसे गुपित सांगती,||3||

भवतीचा काळोखही,
येण्याची तुझ्या वाट पाहे,
मिलन कल्पून मनाशी,
दोन जिवांची संगत देई, --||4||

सुगंधित रातराणी
मिलाफाचे गान गाई,
दरवळ आपुला पसरत,
शेज सुगंधित करत राही,--||5||

दाराचा उंबरा पहा,
वाट किती पाहतो,
तोच आधी प्रतीक्षेत,
तुझ्या सखीचे काम करतो,--||6||

सभोवार झाडे उभी,
डौलदार ती स्वागतां,
माना झुकवून वाट पाहती,
धनी कधी यायचे आता,--||7||

तुळशीजवळ पणती,
जीव धरून पाहे,
कितीही उशीर झाला तरी,
सखी सोबत करत राहे,--||8||

नादखुळा वाराही झेपावे,
बघ ना रे तुझ्यासाठी,
तू आल्याची खबर सांगे,
पुढे येऊन तुझ्या आधी,-!!||9||

हिमगौरी कर्वे.©



हे टिपूर चांदणे,सख्या तुला बोलावे,
आकाशातील घनमाला,
घराची तुला वाट दाखवे, –||१||

डोईवरचा चंद्रमा,
माझिया प्रियाला स्मरण देई,
एक चंद्र घरी वाट पाहे,
सारखा सूचित करत राही,–||2||

शांत नीरव वातावरणी,
बघ सजणा बोल घुमती,
विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे,
कानात कसे गुपित सांगती,||3||

भवतीचा काळोखही,
येण्याची तुझ्या वाट पाहे,
मिलन कल्पून मनाशी,
दोन जिवांची संगत देई, –||4||

सुगंधित रातराणी
मिलाफाचे गान गाई,
दरवळ आपुला पसरत,
शेज सुगंधित करत राही,–||5||

दाराचा उंबरा पहा,
वाट किती पाहतो,
तोच आधी प्रतीक्षेत,
तुझ्या सखीचे काम करतो,–||6||

सभोवार झाडे उभी,
डौलदार ती स्वागतां,
माना झुकवून वाट पाहती,
धनी कधी यायचे आता,–||7||

तुळशीजवळ पणती,
जीव धरून पाहे,
कितीही उशीर झाला तरी,
सखी सोबत करत राहे,–||8||

नादखुळा वाराही झेपावे,
बघ ना रे तुझ्यासाठी,
तू आल्याची खबर सांगे,
पुढे येऊन तुझ्या आधी,-!!||9||

हिमगौरी कर्वे.©

Author