एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला ।
शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला ।।१।।
जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती ।
झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती ।।२।।
किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे ।
रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते. ।।३।।
विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर ।
राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर ।।४।।
पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे ।
पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते ।।५।।
संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी ।
परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी ।।६।।
घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर ।
आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार ।।७।।
सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे ।
कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे ।।८।।
फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती ।
मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती ।।९।।
चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना ।
शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना ।।१०।।
गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे ।
आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे ।।११।।
वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली ।
अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली ।।१२।।
चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची ।
लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची ।।१३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 29, 2019
आम्ही नाही त्यातले म्हणत ….. नाकारलं कोणीही किती …. तरी प्रत्येकाला वाटतंच असते ….. कसली ना कसली भीती ….
September 15, 2021
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। १
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। २
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। ३
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।। ३
संचार त्यांच्या आत्म्याचा , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।। ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 4, 2020
माझ्या विहीणाई बाई
तुम्हा बहीण मानते
जपली जी अमानत
तुम्हा हाती सोपवते
द्यावी मायेची सावली
पुन्हा पुन्हा विनवते
कधी सोसलेना तिने
उन्हातान्हाचे चटके
तिच्या सोनपावलांची
दारी उमटली नक्षी
आनंदाने भारारला
गगनात तेव्हां पक्षी
अशी अंगणी खेळता
कधी झाली पहा मोठी
अजूनही सान बाळी
तिच्या बाबा दादासाठी
कन्या परक्याचे धन
किती सांगू या मनाला
हृदयाच्या हुंदक्याला
आता बांध मी घातला
कांही चुकले माकले
माय सांभाळून घेई
आता माझी न राहिली
तुम्हीच व्हा तिची आई
October 16, 2018
त्याचे दोघांचे नेहमी
मस्त चालले असते,
कधीही भांडत नाहीत,
कधीही कुठलाही हेका नाही
सर्वाना कुतूहल वाटत असते
एकदा सहज त्याला विचारले
हसून म्हणाला कुणीतरी
एखादे पाऊल मागे घेले की झाले
सात पाऊले तर एकत्र असतो
असतो ना पुढे मागे...
मग त्यांनतर त्या
पाऊलाची चर्चा कशाला
हेच तर आम्हाला कळत नाही
पावला पावला वर
बदलणे आवश्यक आहे
निदान संसार नावाच्या
प्रवासात...
-- सतीश चाफेकर.
December 6, 2021
मी बाहेर आलोय आता भ्रमातून...
आता पाहीन मी जगाकडे
फक्त माझ्या चष्म्यातून...
आता कोणी सुटणार नाही
माझ्या चाणाक्ष नजरेतून...
माझे मौन मी आता
कायमचे सोडणार आहे...
गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची
आता किंमत लावणार आहे...
प्रत्येक दिवस आता फक्त
माझा असणार आहे...
माझे प्रत्येक पाऊल
आता यशावर पडणार आहे...
मिळविण्यासाठी जे जे असते
ते मी मिळविणार आहे...
प्रत्येक प्रश्नचे उत्तर
तोंडावर मारणार आहे...
भ्रमात होता बरा होता जग म्हणेल...
कवी - निलेश बामणे ( बी डी एन )
June 10, 2017
शब्दभावनांची झाली उधळण
August 31, 2021
February 26, 2014
ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,
आकाशाला जाऊनी भिडती,
नष्ट करूनी डोंगर जंगल,
हा: हा: कार तो माजविती ।।१।।
शब्दांची ही ठिणगी अशीच,
क्रोधाचा तो वणवा पेटवी,
मर्मघाती तो शब्द पडतां,
अहंकार तो जागृत होई ।।२।।
सूड वृत्तीचा जन्म होवूनी,
वातावरण दूषीत होते,
संघर्षाचा अग्नी पेटूनी ,
जीवन सारे उजाड करीते ।।३।।
कारण जरी असे क्षुल्लक,
विनाश व्याप्ती होई भयकंर,
केवळ तुमचे प्रेमळ शब्द,
दुष्ट चक्र थांबवी सत्वर ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 8, 2016
December 16, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti