(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाशिवरात्री

    शिवापासून वेगळा झालेला जीव
    पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा
    काळ म्ह्णजे जीवन...
    पण जीव रमतो
    जगण्यातील मजा लुटण्यात
    आणि गुंतून पडतो असंख्य मोहात...
    शिवाला विसरलेल्या जीवाला
    पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच
    कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय
    महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत...

    कवी- निलेश बामणे

      March 7, 2016


  • श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

    विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग

    चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग

    नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते

    परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते

    अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं

    विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी

    सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर

    आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार

    आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच

    लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे

    कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती

    जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 28, 2020


  • चुकीचे मूल्यमापन

    चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे

    रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,

    कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली

    टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,

    जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले

    श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,

    यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी

    कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 17, 2018


  • अवकळा

    आभाळ ढगांनी
    दाटलेले होते,
    पावसांच्या सरी
    कोसळतील
    या आशेने
    सारे सिवार
    बहुरंगी नटलेले होते.

    नांगरण – कुळवनाने,
    माती आता
    चांगलीच पेटली होती,
    लाले-लाल
    मातीची आग,
    आता तळपायातून
    मस्तकी पोहचली होती.

    खर्चाचे डोंगर,
    आता चांगलेच
    जीवावर बेतले होते,
    बेताल जीवनाने
    मरनोत्तर गोष्टीत
    आज चांगलेच
    रस घेतले होते.

    दऱ्या – खोऱ्यातून
    नदी- नाल्यातून
    तळी – ओढ्यातून
    आपुलकी, जिव्हाळ्याचे
    पाणी....
    आता बऱ्यापैकी
    आटले होते.
    कठोर – निर्दयी
    दुष्ठ – नीतीने
    सुख – दुःखाला
    मधो – मध
    चिरले होते.

    पाखंडी, भ्रष्ट
    झुंड, शंड
    ठोक, बिनडोक
    मनमानी, मनोवृत्तीने
    सुव्यवस्थेस,
    आता चांगलेच
    घेरले होते.

    मळे, धन–दांडग्याचे,
    आता चांगलेच
    फुलले होते,
    अवकाळाने
    झोडपले तरी,
    व्यवस्थेने मात्र..
    हात जोडले होते.

    दुःखाचे धनी,
    नशिबाने चांगलेच,
    होरपळले होते,
    कितीही हात
    जोडले तरी,
    व्यवस्थेने पायदळी
    तुडविले होते.

    न्यायाचेच हात
    आज डोळ्यादेखत ,
    रक्ताने माखलेले होते,
    भ्रष्ट नोकरशाहीपुढे, आज
    सत्य हि झुकलेले होते...

    - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे (कवि, लेखक, संमिक्षक, संपादक, गीतकार)
    ☎️ मो.न.8830800335 ================================
    Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ================================

      September 1, 2021


  • या गर्दीतून जाता जाता

    मित्रांनो, “या गर्दीतून जाता जाता ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे.

      June 29, 2018


  • चक्र ऋतुंचे

    जगायचे ते जगले
    नाही काही राहीले
    श्वासही भगवंताचे
    नाही काही आपुले

    जन्म, मृत्यु प्रवास
    ते भ्रमणही आपुले
    बाहुले, कळसूत्रीचे
    चक्र ऋतुंचे चालले

    दशदिशा भारलेल्या
    नेत्री दृष्टांत रंगलेले
    भोगणेच संचिताचे
    या जन्मी लाभलेले

    पसरूनी दोन्ही बाहु
    क्षणक्षण ते झेललेले
    हेच सत्य साक्षात्कारी
    अस्ताचली सांज रंगले

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी )

    9766544908

    रचना क्र.१७४

    २०/७/२०२२

      August 25, 2022


  • समर्थ – स्वामी राज माऊली-

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

      June 17, 2012


  • चरण रज

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

      May 14, 2012


  • आनंदी भाव हाच भगवंत

    गेले सारे आयुष्य परि न कळला ईश

    इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।।१

    बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ

    मनाची एकाग्रता केली शरीरा करिता ।।२

    तरुणपणाची उमेद जिंकू वा मरु ही जिद्द

    करुन प्रयत्नांची पराकाष्टा बनवी जीवन मार्ग निष्ठा ।।३

    संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण

    वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव ।।४

    काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा

    भजन पुजेत जाई वेळ ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।५

    आता झालो देह दुर्बल प्रभू चिंतनात जाई वेळ

    वाट बघतो निरोपाची ओढ फक्त जगदंबेची ।।६

    आयुष्य संपता सारे खंत येऊन मन विचारे

    कां न प्रभू भेटला ह्याची रुखरुख मनाला ।।७

    आत्म चिंतन करिता जाणवे मी भगवंता

    ईश्वर निर्गुण निराकार कर्म करी त्यास साकार ।।८

    दया क्षमा शांती ह्याच ईश्वराच्या शक्ती

    आयुष्यातील आनंदी क्षण हीच ईश्वराची खूण ।।९

    जीवनांतील समाधान ईश्वर प्राप्तीचे लक्षण

    नसावी मनी खंत आनंदी भाव हाच भगवंत ।।१०

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 5, 2020


  • संमेलन

    सम्मेलन भरली गेली पाहिजेत
    एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी
    एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी
    एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I

    सम्मेलन भरली गेली पाहिजेत
    जातिवाद मिटवण्यासाठी
    धर्मवाद मिटवण्यासाठी
    एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l

    सम्मेलन भरली गेली पाहिजेत
    सर्व धर्म समभावासाठी
    अज्ञानाचा अंधकार मिटविण्यासाठी
    गुणी गोविंदाने कसे रहावे ते सांगण्यासाठी l

    केवळ आपला मोठेपणा मिरविने
    स्वताचा मान सम्मान कमवीने
    इतर सम्मेलन भरवीता कशासाठी
    बाकीचे विषय उगाच कोणासाठी l

      October 30, 2018