दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,
या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई,
तेथ कुणाची कल्पकता १
धगधगणारे अंगारे हे,
जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी,
येईल कधी का समज २
मर्मा वरती घाव बसता,
सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे,
हलके हलके जाती मिटूनी ३
त्या दुःखीताला जाणीव असते,
जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो,
इतर जणांच्या काळजाशी ४
सुख दु:खातील दु:ख आधीक ते,
पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी,
दु:खी अनूभवी धाव घेई ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 6, 2021
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १
सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २
प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३
– सुभाष स. नाईक.
Subhash S. Naik
August 2, 2016
हिशोबाची वही घेवूनी बसलो,
हिशोब करण्यासाठीं ।
जमाखार्च तो करित होतो,
जीवनाच्या सरत्या काठीं ।।
घोड दौड ती चालूं असतां,
सुख दु:खानी भरले क्षण ।
प्रसंग कांहीं असेही गेले,
सदैव त्याची राही आठवण ।।
कष्ट करूनी जे कमविले,
थोडे धन या देहाकरिता ।
उपयोग नव्हता त्याचा कांहीं,
जग सोडूनी देह जाता ।।
कधी काळचा निवांतपणा,
घालविला दुजाच्या सेवेत ।
पुण्य राहिले शिल्लकीमध्ये,
वाटते तेवढेच हिशोब वहीत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 27, 2016
तप्त होतां धरणी माता,
शांत करी वर्षा तिजला
प्रफुल्लतेचे झरे फुटती,
आंतूनी त्या मातीला.....१,
जलमय होती नदी नाले,
दुथडी भरूनी वाहती
धबधब्यातील खरी शोभा,
वर्षामुळेंच दिसती...२,
हिरव्या रंगीं शाल पसरते,
धरणी माते वरी
ऊब यावी म्हणून मेघांचे,
आच्छादन ती करी....३,
वर्षा धरती बहिणी असूनी,
प्रभूची भावंडे
उचंबळूनी प्रेम येतां,
धावून येते तिजकडे....४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 13, 2017
-- सौ. सुधा नांदेडकर
November 12, 2010
तुझे माझे नाते,
दुःखाचे दुःखाचे,---
पोळलेल्या जिवांचे,
व्यथित अशा हृदयांचे,--!!!
तुझे माझे नाते,
एकाच अखंड बंधाचे,
अगदी जन्मोजन्मीच्या,
गोड ऋणानुबंधाचे,
विचरशी तू सहचरे,
पण वेगळेच हे धागे,
काळजाच्या विणींचे
समसुखाचे, समदु:खाचे,--!!!
ओघळलेल्या अश्रूंचे,
आत लपलेल्या समुद्राचे,
खोलवरच्या भोवऱ्याचे, उसळणाऱ्या लाटांचे,
तुझे माझे नाते,
दुःखाचे दुःखाचे,---!!!
कधी भरतीओहोटीचे,
दोघातल्या ओढीचे,
वाचणाऱ्याला बुडवणारे, बुडणार्याला वाचवणारे,
पाण्याशी जीवनाचे,
निष्ठूर या जगातले, ---!!!
तुझे माझे नाते,
दुःखाचे दुःखाचे,
अंतरात्म्यांतील आवाजांचे
आत्मिक एकरुपतेचे, ऐहिकापल्याड अलौकिकाचे, लौकिकातील असामान्यतेचे,-!!!
तुझे माझे नाते,
सुखाचे सुखाचे,
हवेशी गारव्याचे,
पावसाशी पाण्याचे,
झाडांशी टवटवीचे,
दवांशी थेंबांचे,
देठाशी फुलांचे,
सुगंधाशी कळीचे,
तुझे माझे नाते ,----
सुखाचे सुखाचे,--!!!
बालपणीच्या दोस्ताचे,
सहवासातील मित्रांचे,
सवंगड्यांशी हृदयाचे,
जिवाशी सगळ्या मनांचे,
तुझे माझे नाते,
सुखाचे सुखाचे,--!!!
आरपार जाणारे,---
जन्म मृत्यू पलीकडले,
आत्म्याशी आत्म्याचे, परमात्म्याशी आत्म्याचे,
चैतन्याशी परमात्म्याचे,
तुझे माझे नाते,
सुखाचे सुखाचे,---
सुखाचे हे सुखाचे,--!!!
हिमगौरी कर्वे.
©
August 13, 2019
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.
मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.
बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतात
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतात.
त्यांना कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतात
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतात .
तुमचा शब्द ते कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.
तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
पेलत सगळी आव्हाने
घडवतात तुमचा भविष्यकाळ..
तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबाही खचत असतात
आधार देता तरी
मन मारून हसत असतात..
तुमच्याकडूनं तसं त्यांना
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्यांचं
अवघं पोट भरत असतं.
त्यांच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाहीत
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाहीत.”
त्यांच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.
एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल
तेव्हा म्हणाल, “ आपले बाबा
खरंच कधी चुकत नव्हते
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होते.”
तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.
आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..
आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
November 8, 2016
बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर ।।१।।
श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो ।।२।।
तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले ।।३।।
धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो ।।४।।
देह बनला दुर्बल विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल सहानुभूती आली मनी ।।५।।
अनुभवासारखा शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका परिस्थीती समजावूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 4, 2019
संत सखया अगा पांडुरंगा
कां? रे रंग तुझा हा काळा ।।धृ।।
अयोध्येचा रघुनंदन सावळा
गोकुळीचा यदुनंदन तो नीळा
म्हणुनी तुच कां रे विठुसावळा।।
नीलांबरी, घनमेघ ते सावळे
प्रांगणी खेळतो नीळासावळा
लोचनी तूच विश्वरूपी सावळा।।
निष्पाप रंगले, रुप हरिहराचे
द्वैत, अद्वैत एकरूपची झाले
वाळवंटी, रंगला स्वर्गसोहळा।।
भूधरी ध्वजपताका वैष्णवांच्या
नादती टाळमृदंग झांजचिपळ्या
विठ्ठल विठ्ठल गजर दंगदंगला।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२०.
१९ - ४ - २०२२
May 4, 2022
आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे.
February 11, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti