एका मोठ्या कारखान्याचा मालक,
भासत होता छोट्या विश्वाचा चालक
लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,
मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण
उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,
लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,
खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत
पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे
पण नशीब दुर्दैवी बिचारे,
मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,
वर्ज्य केल होत साखर व मिठाला
नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी
भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.
जगण्यासाठी आहार नियंत्रण
समजला होता हे तत्व.
वात पित्ताची प्रकृती त्याची.
थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची.
लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,
कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,
आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये,
कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर
व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.
पाने मागे पुढे चाळीत होता,
मध्येच मान वर करून बघत होता,
विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता,
हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर
सारे उभे होते सभोवताली.
माना त्यांच्या झुकत होत्या,
शब्द त्याचे ते उचली,
कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार
चेहऱ्यावर चमकत होता.
आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या
उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे
या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले
लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत....
स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस.
साखर मिठ वर्ज्य असलेले,
हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,
तरी देखील हे सारे माझे आहे,
हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 17, 2018
सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे...१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती...२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करीते....३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी....४
लगेच अनुभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा...५,
पुनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख....६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी...७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 5, 2016
१९६८ साली प्रदर्शित झालेल्या धर्मकन्या या चित्रपटातील हे गीत. या गाण्याचे गीतकार होते पी. सावळाराम. उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी या गीताला आपला आवाज दिला. संगीतकार होते पंडित ह्रदयनाथ मंगेशकर. चला तर मग ऐकुया हे गाणे..
July 18, 2013
दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी
काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या कुणीतरी....१
शून्यामधले कितीकजण, शून्यची सारे अवतीभवती
परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती....२
आज हवे त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती
सहानुभूतीचा शब्द, निर्माण करील सहनशक्ति....३
क्षीण होता दृष्टी, दिसेल कां धडपड
श्रवणदोष येण्यापूर्वी, ऐकून घे दु:खी ओरड...४
चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू
संगे जावून जाण त्यांचा, जगण्यामधला हेतू...५
जेव्हां असशील विंवचनेत, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती
कोण जगतो कसा काय , जाणून घेण्या सवड कुणा ती...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 6, 2020
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण
त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही
उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण
साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार
देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना
उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना
सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान
प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई
तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 23, 2020
आई विषयी व्यक्त केलेल्या भावना या कवितेत दिसून येतील. छंदबद्ध ओळी आणि आर्इविषयी मनात उमटलेल्या भावना कवितेच्या रुपाने कागदावर उमटले.
June 26, 2012
या कातरल्या क्षणांना,
सय तुझी येते,--
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,---!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
March 21, 2019
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 20, 2015
सूर्यकिरण येती दाराशी
चंद्र झोपतो रोज उशाशी ।
अवसेची त्या कशास चिंता
दिवे सभोती, उठता बसता ।
धनचिंता ना ज्यास भिवविते
तोळा मासा दुःखही निवते ।।
सूर्य लोपता चंद्र पुरेसा
प्रकाश नसूदे पुरे कवडसा ।
अवसेच्या रात्रीला उरतो
व्रुथा भरवसा देवावर तो ।
दारिद्र्याचे असेच असते
तोळा मासा सुख नांदते।।
.......मी मानसी
May 17, 2020
सोडून दे अहंकार तुझा
लाचार आहेस आपल्या परि
पूर्ण जीवन तुला न मिळे
न्यूनता राहते कांहीं तरी...१
धनराशि मोजत असतां
वेळ तुजला मिळत नसे
शरीर संपदा हाती नसूनी
मन सदा विचलित असे...२
शांत झोपला कामगार तो
दगडावरी ठेवूनी डोके
देह सुदृढ असूनी त्याचा
पैशासाठी झुरतां देखे...३
उणीवतेचा कांटा सलूनी
बाधा येत असे आनंदी
म्हणून खरे समाधान ते
लाभत नसते मग कधी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 18, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti