(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुलाखत : विशाल जाधव (अभिनेता/दिग्दर्शक)

    विशाल जाधवची (अभिनेता/दिग्दर्शक) मी घेतलेली मुलाखात, जी महाराष्ट्र २४ तासमध्ये प्रकाशित झाली आहे. महाराष्ट्र २४ तास, हे एक गुगल ऍप्स आहे. हे ऍप्स पाहण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवरुन “महाराष्ट्र २४ तास” (इंग्रजी किंवा मराठीतून) टाईप करा किंवा या लिंकवर टिचकी मारा

  • मराठी माणूस आणि योगविद्या

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ नोव्हेंबर, १९५४ साली हैद्राबादयेथील ’मराठवाडा साहित्यपरिषदेत‘ भाषण करताना म्हणाले होते की, ”भारतातील सर्वभाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत कुठला असेल, तर तो ’महाराष्ट्र‘ होय! इतर परप्रंातीयांकडून संपूर्णपणे नागवला गेलेला, हा भोळाभाबडया माणसांचा प्रदेश आहे. भारतीय नागरिक सर्व एक, हे जरी खरे असले, तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो!“ आधुनिककाळाच्या रेटयात या ’नागवल्या गेलेल्या व म्हणूनच मागे पडलेल्या‘ भोळयाभाबडया मराठीजनांना, पुन्हा एकवार ’अटकेपार झेंडा‘ लावण्यासाठी व शिवछत्रपतींप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रधर्म निर्मिण्यासाठी गरज आहे, ती एका तेजस्वी व निरोगी-निर्व्यसनी तरूणपिढीची… आणि ही अशी ’पिढी‘, फक्त अविरत योगाभ्यासाच्या मजबूत ’शिडी‘वरच चढून गगनाला गवसणी घालू शकेल!!!“

  • दाभोलकरांच्या निमित्ताने…..

    सकाळी घराबाहेर पडणारा आपला नोकरदार नवरा संध्याकाळपर्यंत घरी सुखरुप परत येईल याची शास्वती त्याच्या बायकोला नाही आणि आपण घरी येईपर्यंत आपली बायका-मुले आणि घर सुद्धा सुखरुप राहील याची त्याला खात्री नाही.

  • टिप्पणी – ८ : ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’

    बातमी : ‘संगम’ सिनेमातील गीत , ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’
    संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, लोकरंग पुरवणी, दि. ०७.०८.१६ मधील, ‘पडसाद’.

    • वर उल्लेखलेल्या ‘पडसाद’ मध्ये वसंत खेडेकर यांची, ‘आधी कोंबडी की .. ?’ या शीर्षकाची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यात उल्लेखलेल्या , ‘संगम’ सिनेमातील गीतावर ही टिप्पणी.
    • पुढे जाण्यापूर्वी एक लहानशी चूक आपण सुधारूया. खेडेकर म्हणतात की, ‘संगम’ हा सिनेना १९७० च्या दशकात आला होता. पण, माझ्या आठवणीप्रमाणें तो १९६५-६६ च्या सुमाराला प्रदर्शित झाला होता. ( हें मला आठवण्याचें कारण असें की, मे १९६७ ला मी आय्. आय्. टी. खरगपुर येथील बी. टेक्. चा कोर्स पूर्ण केला ; आणि मला आठवतें आहे त्याप्रमाणें, ’संगम’ त्याआधी आलेला आहे ) .
    अर्थात्, या चुकीमुळे, मूळ चर्चा-विषयात फरक पडत नाहीं.
    • खेडेकर यांनी ‘रसरंग’ या नियतकालिकामधील चर्चेचा संदर्भ दिलेला आहे. त्यातील ‘आधी गीताचे शब्द की आधी गीताची चाल’ या वादाचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्याबद्दल थोडेसें नंतर पाहूं या.
    • मात्र, रणजीत बुधकर यांनी ‘आधी आंगडें, मग अपत्य’ या शीर्षकाखाली संगममधील गीताबद्दल जें लिहिलें आहे, त्याबद्दल मला मुख्यत्वें टिप्पणी करायची आहे.
    • बुधकरांचा मूळ लेख मी ‘रसरंग’मध्ये वाचलेला नाहीं. मुंबईत ‘रसरंग’ सहजासहजी मिळत नाहीं, मग जुन्या आवृत्या मिळायची गोष्टच नको. ‘वेब’वर बरेंच शोधूनही मला ‘रसरंग’ची ई-आवृत्ती गवसली नाहीं. त्यामुळे, खेडेकर यांच्या प्रतिक्रियेवरून मला मूळ लेखाबद्दल जें उमगलें, त्यावरून ही टिप्पणी.

    (१)
    • रणजीत बुधकर यांनी त्यांच्या लेखात मांडलेल्या मुद्द्यावरून, त्यांना हिंदी भाषेची केवळ जुजबी जाण आहे, हें स्पष्ट आहे. त्यामुळे, बुधकरांचा मूळ मुद्दा बरोबर असो वा नसो, मात्र या गीतातला त्यांनी दिलेला reference चुकीचा आहे. ( बुधकर याचा अधिक्षेप करायचा हेतू नाहीं. मात्र, परिस्थिती काय दिसते, हें सांगणे आवश्यक आहे) .
     ( माझें हायस्कूलचें शिक्षण हिंदीभाषी प्रदेशात झालेले आहे . हिंदी-हिंदुस्तानी साहित्य मी बर्‍यापैकी वाचलेलें आहे. शेरोशायरी आणि गझला यांची आवड असल्यामुळे, माझा हिंदी-हिंदुस्तानी, व कांहीं अंशीं उर्दू , यांच्याशी आयुष्यभर संपर्क राहिलेला आहे . मी स्वत:ही हिंदी-हिंदुस्तानीमध्ये लिहीत आलेलो आहे, त्यातील कांहीं प्रकाशितही झालेलें आहे, आणि त्यातील कांहीं लेख गझल-गीतांच्या रसास्वादाचे आहेत. हें सर्व सांगण्याचें कारण स्वस्तुती नव्हे ; तर तें असें आहे की, त्याकाळीं सिनेमागीतें हिंदी-हिंदुस्तानी-उर्दूमध्ये लिहिली जात, आणि त्या भाषेबद्दल मला आवश्यक तेवढी माहिती आहे ; ही गोष्ट वाचकांपुढे स्पष्ट व्हावी. )
    • बुधकरांनी मुख्यत्वें मुखड्याचा संदर्भ देऊन असा मुद्दा मांडला आहे की, ‘कांहींही कारण आणि अर्थ नसतांना , केवळ संगीताची जागा भरण्यासाठी यात ‘की’ हा शब्द टाकला आहे.
     By the way, हा शब्द ‘की’ असा नसून, ‘कि’ असा असायला हवा, किंवा ‘के’ असा असायला हवा होता. मराठीत ‘की’ असा दीर्घ शब्द होतो, तर हिंदीत तो ‘कि’ असा र्‍हस्व होतो, आणि उर्दूत ‘के’ होतो. हिंदी सिनेगीताबद्दल लिहितांना, त्या गीतातले शब्द हिंदी-उर्दूप्रमाणें लिहायला नको कां ?
     आतां, हें ‘के’ चें दीर्घ ‘की’ कोणी केलें ? बुधकरांनी, की खेडेकरांनी , की ‘रसरंग’मधील, अथवा ‘लोकसत्ता’मधील, DTP करणार्‍यानें ?

    • ‘संगम’ हा सिनेमा राज कपूरचा होता, संगीत होतें शंकर-जयकिशन यांचें. अर्थातच, गीतलेखन शैलेन्द्र व हसरत जयपुरी यांचें. हिंदी सिनेगीतांमधे कोणीच भरतीचे शब्द घालत नाहीं असें माझें म्हणणें नाहीं. मात्र शैलेन्द्र व हसरत हे लोक भरताड शब्द वापरणारे कवी नव्हेत. आपण चर्चा करत आहोत, तें गीत, त्याची style व शब्द पाहतां, बहुधा हसरत यांचें आहे. ( सिनेगीतांचें पुस्तक पाहून, त्याचा कवी कोण तें varify करतां येईल. पण , तूर्तास, तशी आवश्यकता नाहीं ) . हें गीत गाइलेलें आहे मोहम्मद रफी यांनी.
    • या गीताच्या मुखड्याच्या २ ओळींमधील शब्द असे आहेत : ते ज्याप्रमाणें आपल्याला ऐकूं येतात, तसेच खाली लिहिले आहेत. त्यांत कांहीं सुधारणा करायची कां , व काय, तें आपण मागाहून पाहूं या. –
    ये मेरा प्रेमपत्र पढ़कर
    के तुम नाराज़ न होना ।
    के तुम मेरी ज़िंदगी हो,
    के तुम मेरी बंदगी हो ।

    • आपण आधी पहिली पंक्ती पाहूं या. इथें ध्यानात घ्या की, या ओळीतील ‘के’ हा उर्दूमधील ‘कि’ च्या ऐवजी येणारा शब्द नाहीं. ‘पढ़कर के’ (पढ़करके) असा तो शब्द आहे. मराठीत प्रत्यत शब्दाला जोडून लिहितात, मात्र हिंदी-हिंदुस्तानीत, प्रत्यय बहुतांशी शब्दाला न जोडतां लिहिला जातो.
    मात्र, इथें चालीमुळे यतिभंग झालेला आहे , आणि त्यामुळे या ओळीचे दोन अर्ध-भाग असे झालेले आहेत :
    ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर’ ।
    ‘के तुम नाराज़ ना होना’ ।

    ती ओळ खरें तर अशी तोडली जायला हवी :
    ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर के’ ।
    ‘तुम नाराज़ ना होना’ ।

    हिंदी सिनेगीतांमध्ये यतिभंग हा विशेष दोष मानला जात नाहीं, अन् त्यामुळे अनेकदा आपल्याला असे यतिभंग दिसून येतात.
     त्यावरून आठवण येते की, सुधीर फडके उपाख्य बाबूजी हे, यतिभंग होऊं नये, किंवा शब्दाचा / शब्दसमुच्चयाचा अयोग्य/ चुकीचा अर्थ निघूं नये म्हणून , चाल बनवतांना व गातांना, अतिशय जागृत असत. (तें मी स्वत: अनुभवलें आहे. मगर, ‘वो कहानी फिर कभी’ ).
     मोहम्मद रफी हे श्रेष्ठ गायक होते. पण त्यांची tendency अथवा त्यांची policy अशी होती, की ते संगीतकारानें दिलेल्या चालीप्रमाणेंच गात असत , मग, त्यात यतिभंग झाला तरी ठीक आहे. त्यामुळे, रफी यांच्या गीतांमधे कांहीं वेळा आपल्याला यतिभंग दिसून येतो.
     लताबाईसुद्धा चालीचें पालनच करीत ; मात्र यतिभंग होत असल्यास, त्या, आधीच्या शब्दाच्या अंतिम अक्षराला लांब ओढून (ऽ ), पुढील भागाशी जोडून घेत. त्यामुळे, चाल कायम राहूनही यतिभंग टळत असे.
    • कदाचित कोणाला असें वाटण्याची शक्यता आहे की , ‘पढ़कर के’ यांत कांहीं पुनरोक्ती झालेली आहे काय ? ( कारण, ‘कर’ या हिंदी प्रत्ययाऐवजी उर्दूत ‘के’ वापरतात, जसें की ‘जाकर’ , ‘जाके’).
     पण कांहीं ठिकाणी असें duplication होत नाहीं. उदा. शिवसेनेनची हल्लीची एक स्लोगन होती : ‘करून दाखवलें’. त्याचें हिंदी-उर्दू असें होईल : ‘कर के दिखाया’. इथें डुप्लिकेशन नाहीं.
     हें कसें ? तर, जेव्हां ‘करना’ (करणें) हें क्रियापद वापरलें जातें, त्यावेळी, ‘करून’ या अर्थानें, ‘कर के’ असा शब्द वापरला जातो ( ‘कर कर’ च्या ऐवजी ). ध्यानात घ्या, आपण भाषेच्या रोजमर्राच्या वापराबद्दल बोलत आहोत.
     तेब्हां, गीताच्या या ओळीत, ‘पढ़कर’ किंवा ‘पढ़ के’ , अथवा सध्या आहे तसें ‘पढ़कर के’ असें सगळें चालण्यासारखें आहे. ‘पढ़कर’ किंवा ‘पढ़ के’ म्हणजे ‘वाचून’ ; आणि ‘पढ़कर के’ म्हणजे ‘वाचन करून’.
     कवीला या ओळीत ‘पढ़कर के’ असा शब्द वापरणें योग्य वाटलें. That is his prerogative as a poet.
    • वरील विवेचनाचा अर्थ थोडक्यात असा की, या ओळीत भरताड शब्द नाहीं.
    • आतां आपण मुखड्याची दुसरी ओळ पाहूं या. या ओळीत दोनदा ‘के’ आलेला आहे,पण तो योग्यच आहे, भरताड नाहीं. या विशिष्ट ‘के‘ चा मराठीत अर्थ आहे – ‘कारण की’. तें ध्यानांत घेऊन, आतां आपण या मुखड्याचा अर्थ पाहूं या -
    ‘हे माझें प्रेमपत्र वाचून तूं नाराज होऊं नकोस, कारण की, (म्हणजे, हें पत्र लिहिण्याचें कारण की), तूं माझें जीवन आहेस, (कारण की) तूं माझी ‘उपासना’ (बंदगी) आहेस.
     ‘बंदगी’ हा शब्द मुख्यत: ईश्वराच्या उपासनेसाठी वापरला जातो. तेव्हां, प्रेमाच्या संदर्भात ‘बंदगी’ हा शब्द वापरून कवि प्रेमाला किती उंचीवर नेऊन ठेवतो, पहा.
    • या ‘के’ ची चर्चा करत असतांना आपण या गीतातील, अगदी सुरुवातीला, म्हणजे मुखड्याच्या आधी आलेल्या, दोन ओळी पाहूं या. या गाइलेल्या माहींत, तर ‘तरन्नुम में’ म्हटलेल्या आहेत. त्या अशा आहेत :
    ‘मेहरबाँ लिखूँ, हसीना लिखूँ, या दिलरुबा लिखूँ ?
    हैरान हूँ के, आप को इस ख़त में क्या लिखूँ ?’
     हिंदी सिनेमातील तत्कालीन गीतलेखक उर्दूतील मोठे कवी होते. त्यामुळे, ही गीतें अनेकदा गझलप्रमाणें लिहिली जात. मात्र, गझलमधील प्रत्येक कडवें हा दोन पंक्तींचा शेर असतो, तर गीताचें प्रत्येक कडवें दोनपेक्षा-अधिक ओळींचें असते.
     गझलमध्ये अनेकदा ‘मत्ल्या’च्या आधी (पहिल्या शेराआधी) अशा ओळी लिहायची पद्धत आहे. ती पद्धत या गीतात शायरनें वापरली आहे.
     या, ‘मेहेरबाँ …’ वाल्या, द्विपदीमधेसुद्धा ‘के’ आलेला आहे. त्याचा अर्थ आहे मराठीतील ‘की’. या दोन ओळींचा अर्थ असा आहे –
    ‘मी संभ्रमात, दुविधेत, आहे, की, मी या पत्रात तुला काय म्हणूं, तुला कसें कसें address करूं, संबोधू ? मेहरबाँ म्हणूं, (की) हसीना म्हणूं, (की)) दिलरुबा असें म्हणूं (की आणखी कांहीं म्हणूं ) ?’
     हा ‘के’ सुद्धा unwanted नाहीं. आणि, इथें तर, ओळी फक्त ‘तरन्नुम में’ म्हटलेल्या आहेत, म्हणजे संगीतकाराच्या चालीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे , हा ‘के’ भरताड असण्याचा सवालच पैदा होत नाहीं. तरीही तो वापरला गेलेला आहे, व योग्य तर्‍हेनें त्याचा वापर झालेला आहे.
    • तरीही कुणाचें समाधान झालें नसल्यास, आपण हिंदी सिनेगीतांमधील कांहीं अन्य उदाहरणें पाहूं या, जिथें हा ‘के’ वापरलेला आहे –
     ‘अनाड़ी’ सिनेमातील एका गीताचे कांहीं बोल पहा –
    ‘सबकुछ सीखा हम ने, ना सीखी होशियारी
    सच है दुनियावालो, के हम हैं अनाड़ी’ ।
     आणखी एक उदाहरण पाहूं या. सिनेमा आहे, ‘हम दोनों’. शायर आहेत, साहिर लुधियानवी. कांहीं शब्द पहा –
    ‘अभी न जाओ छोड़कर,
    के दिल अभी भरा नहीं’ ।
    • आपला मुद्दा स्पष्ट झालेला आहे.
    • मात्र , यानंतर कुणाच्या मनात असा प्रश्न उठूं शकेल की, ‘पढ़कर के’ मधील ‘के’ , व ‘के तुम मेरी ज़िंदगी हो’ मधील ‘के’ एकच नाहींत कशावरून ; किंवा दोन्हीत फरक काय ?
     त्यासाठी आपल्याला उच्चारणात जायला हवें. ‘पढ़कर के’ मधील ‘के’ हा दीर्घोच्चार आहे. ( अर्थात्, हिंदी-उर्दूत दीर्घोच्चार हा मराठीइतका लांबवला जात नाहीं. ) तुम्ही, गाइलेलें गीत ऐकून पहा. (आपण यतिभंगाबद्दल आधी बोललोच आहोत, तेव्हां तूर्तास त्याचा विचार आपल्या चर्चेसाठी आवश्यक नाहीं.)
    ते शब्द असे ऐकू येतील :
    ‘ये मेरा प्रेमपत्र पढ़कर
    केऽ तुम नाराज़ ना होना ।’
     या तुलनेत, ‘के तुम मेरी ज़िंदगी हो’ मधील ‘के’ पहा. हा उच्चार short आहे, हिंदी ‘कि’ सारखा.
    आपण गाणें ऐकलें तर, शेवटी लताबाईंच्या आवाजात हळुवारपणें म्हटलेली हीच ओळ पहा. तिथें, लताबाईंचा उच्चार हा, जवळजवळ ‘कि’ कडेच पोचतो.
     आतां हा ‘के’ चा प्रश्न पूर्णपणें उलगडला आहे, असें म्हणायला हरकत नसावी.

    (२)
    • आपण चर्चा करत असलेल्या ‘संगम’ सिनेमातील संपूर्ण गीताचे शब्द द्यायची आवश्यकता नाहीं. पण, आस्वाद घेण्यापुरत्या, आपण अंतर्‍यातील कांहीं ओळी पाहूं या .
     या दोन ओळी पहा -
    ‘तुझे मैं चाँद कहता था । मगर उस में भी दाग़ है ।
    तुझे सूरज मैं कहता था । मगर उस में भी आग है ।’
    अर्थ स्पष्ट आहे. पण आपण एक खास गोष्ट ध्यानात घेऊं या -
    प्रियेला ‘चंद्र’ किंवा ‘सूर्या’ची उपमा अनेक कवी देतात. मात्र प्रस्तुतचा हा कवी तशा उपमांच्या कितीतरी पुढे निघून जातो. तो सांगतो की, त्यानेंही प्रियेला जरी चंद्र-सूर्यांची उपमा दिली असली, तरी ते (चंद्र-सूर्य) कवीच्या प्रियेपेक्षा गुणांनी कमीच आहेत. तें कां, तेंही कवीनें सांगितलें आहे ( दाग़ है ; आग है ) .
    अशा तर्‍हेची कल्पना किती अन्य कवींनी मांडलेली आहे, सांगा .
     आणखी एक ओळ पहा :
    ‘अगर मर जाऊँ, रूह भटकेगी तेरे इंतज़ार में ।’
    म्हणजे, हें आपलें प्रेम माझ्या मृत्यूनंतरही संपणार नाहीं. जर मी (प्रेमात) मरण पावलो, तर त्यानंतरही माझा आत्मा (रूह) तुझी वाट बघत थांबून राहील, भटकत राहील.
    - या शब्दांमधे दडलेला अर्थ समजण्यासाठी इस्लामधील एक कल्पना आधी जाणून घ्यायला हवी. ती म्हणजे, ‘क़यामत’ची कल्पना. क़यामत म्हणजे महाप्रलय, जगाचा अंत. अशी समजूत आहे की, क़यामतच्या दिवशी, सारे मृतात्मे पापपुण्याचा हिशेबासाठी ईश्वराच्या समोर येतात. ( म्हणजे, अर्थातच, भिन्नभिन्न मृतात्म्यांची तिथें भेट होते) . उर्दू काव्यात क़यामतच्या कल्पनेचा बरेचदा वापर केला जातो.
    - आतां , वरील शब्दांचा संपूर्ण अर्थ लक्षात येईल :
    तूं मला भेटली नाहींस आणि माझा जरी मृत्यू झाला तरी मी क़यामतची वाट पाहात राहीन (इंतज़ार में) , म्हणजेच क़यामतच्या दिवशीं तुझी भेट होण्याची वाट बघत राहीन . (कारण,अंतत:, त्या दिवशी तर आपली भेट होणारच होणार). त्या दिवसापर्यंत, माझी ‘रूह’ तुला शोधण्यासाठी भटकतच राहीत.
    - म्हणजे बघा, किती कमी शब्दांमधे किती अधिक अर्थ भरलेला आहे. ‘गागर में सागर’ म्हणा अथवा ‘कूजे में समंदर’ .

    (३)
    • आतां थोडेसें , ‘आधी चाल मग शब्द, की, आधी शब्द नंतर चाल’, याबद्दल. हा विषय मोठा आहे. त्यावर एक वेगळा लेख लिहिणें आवश्यक आहे. मात्र, आपण या मुद्द्यात फक्त थोडेसें डोकावून पाहूं या.
     मी स्वत: एक ( कसा कां होईना, पण ) कवी आहे. संगीतकार तर नाहींच. त्यामुळे माझा झुकाव, ‘आधी शब्द, नंतर त्यांना चाल’ असा असल्यास नवल नव्हे. तरीही, मी objectively या बाबीवर विचार करण्याचा इथें प्रयत्न करत आहे.
     श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे कधीच आधी चाली बांधत नसत. शब्द समोर आल्यावर, ते मुखड्याच्या एकापेक्षा अधिक चाली बांधत, आणि त्यातून एक निवडून मग सबंध गीताची चाल व संगीत तयार करत असत.
    खळे यांच्याकडे एक हिंदी सिनेमा येत होता. प्रोड्यूसर म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या कांहीं ट्यून मला दाखवा’. खळे उत्तरले, ‘ट्यून-बीन ( ट्यून वून ) में नहीं जानता. आप शब्द दीजिये, में संगीत बना दूँगा ’.
     दुसरीकडे असेंही आहे की, खर्‍या शब्दप्रभूला चालीवर शब्द लिहायला अडचण येत नाहीं. हिंदी सिनेमातील कितीतरी सुंदर गीतें चाल बांधून झाल्यावर तिच्यावरून लिहिली गेलेली आहेत. उदाहरण म्हणून, ‘काला बाज़ार’ या सिनेमातील ‘खोया खोया चाँद’ हें गीत घ्या.
    अन्नू कपूर यांनी त्यांचा प्रोग्राम ‘गोल्डन ईरा …’ यात, या गीताच्या जन्माबद्दल सांगितलें आहे :
    एस्. डी. बर्मन यांनी आधी धुन बांधली होती. गीतलेखनाचें काम होतें शैलेन्द्र यांच्याकडे. राहुल देव बर्मन हा शैलेन्द्र यांच्याकडे शब्द मागायला गेला. ते बसले होते समुद्रकिनार्‍यावर सिगारेट ओढत. राहुलनें त्यांना ट्यून ऐकवली. ऐकतांना ते समोर आकाशाकडे टक लावून पहात होते. त्यांनी लगेचच त्या चालीवर मुखडा रचला व सिगारेटच्या पाकीटावरच बोल लिहून
    दिले –
    ‘खोया खोया चाँद, खुला आसमाँ,
    आँखों में सारी रात जाएगी
    तुम को भी कैसे नींद आएगी ?’
    जेव्हां अनेक वर्षांपूर्व हा सिनेमा रिलीज् झाला तेव्हां मी हें गीत त्यात पाहिलें-ऐकलें होतें, व नंतरही अनेकदा. आणि, त्याच्या शब्दांनी मला मोहित केलें होते. मात्र, अन्नू कपूरनें सांगेपर्यंत, हें शब्द, आधीच रचलेलल्या चालीवरून लिहिलेलें आहेत, हें मला माहीत नव्हतें.
    चालीवर शब्द लिहून कांहीं फरक पडला कां ?
     मराठी भावगीतांमधेंही अशी उदाहरणें मिळतात.
    - ‘जिवलगा, राहिलें रे दूर घर माझें’ या गीताचें असेंच आहे. आणि, त्याचें वर्णन हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वत: एका प्रोग्रॅममध्ये केलेलें आहे. त्यांना आवडलेल्या व अभिप्रेत चालीवर त्यांना गीत हवें होते. त्या चालीवर शांताबाई शेळके यांनी तें लिहून दिलें. अत्युत्कृष्ट शब्द, सुंदर चाल, व अतिश्रेष्ठ गायन. हृदयनाथांनी सांगेपर्यंत, मला तरी माहीत नव्हतें की हें गीत एका आधीच ठरलेल्या चालीवर लिहिलेलें आहे. पण , चालीवर लिहिल्यानें, शब्दांच्या गुणवत्तेत कांहीं फरक पडला कां ?
    - ‘घुंगरू तुटले रे’ या, सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या गीताचेंही असेंच आहे. तिथें तर, नुसती चालच नव्हे, तर गीतात मुख्य अर्थही काय असायला हवा, हें आधीच ठरलेलें होतें. पण त्यामुळे, मोघे यांना चपखल शब्दरचना करायला कांहींच अडचण आली नाहीं.
     कवी आधी शब्द लिहितो, तेव्हांही, सुरुवातीचे कांहीं शब्द लिहिल्यावर, त्या कवितेची/ गीताची साधारण चाल ( / लय) त्याच्या मनात तयार होते (म्हणजेच, ’वज़न’ ), आणि त्यानुसार तो पुढे लिहीत जातो.
    खास करून, गझलमधे तर असेंच होतें , कारण एकदा वज़न (वज़्न) ठरलें , की संपूर्ण गझल त्याच वज़नावर लिहावी लागते.
     चाल ही कवीच्या मनांत असतेच, याचें एक मजेदार उदाहरण :
    ‘अजुनी रुसुनी आहे’ व ‘आज अचानक गाठ पडे’ ही काव्यें अनिल यांची. अनिल यांनी ती कुमार- गंधर्व यांना दिली (चाल लावून, संगीत तयार करून, म्हणण्यासाठी). कुमार गंधर्वांनी अशी आठवण सांगितलेली आहे की, अनिल त्यांना म्हणाले, की या (अमुक एका) कवितेची चाल मी लावलेली आहे, व ती मी तुम्हाला ऐकवतो. आणि, कुमार ‘नको नको’ म्हणत असतांना अनिल यांनी ती चाल ऐकवली. कुमारांनी म्हटलें आहे, की, ‘मला त्यानंतर त्या गीताला चाल लावायला फार त्रास झाला, कारण, चालीचा विचार केला की अनिलांचीच चाल आठवत असे’. महद्प्रयत्नानें कुमारांनी ती अनिलांची चाल मनातून पुसून टाकली, तेव्हांच ते स्वत:ची वेगळी चाल बांधूं शकले.

    निष्कर्ष : तेव्हां , मी तरी एक गोष्ट निश्चितच म्हणूं शकतो. गीतकार श्रेष्ठ असला (/ली), तर, आधी बनवलेल्या चालीवर तो / ती उत्कृष्ट शब्द लिहील. तसेंच, संगीतकार श्रेष्ठ असला, तर, आधी लिहिलेल्या शब्दांना न्याय देणारी चाल व संगीत तो नक्कीच देईल. आणि, कवि किंवा संगीतकार ‘सुमार’ असला, तर ‘सोन्याचें मोनें’ होऊं शकेल, व अंतत: गीत हिणकसच होईल.

    • ‘संगम’मधील गीताच्या निमित्तानें एवढी चर्चा पुरेशी आहे , बराबर है के नहीं ?

    - - -
    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • फसवणूक (वात्रटिका)

    मनाची लाही लाही…..अंगात ज्वर उसळला……(वात्रटिका)

  • भारवाहन क्षमता

    भारताने नुकतेच १०४ सॅटेलाईट एकाच लॉंचरमधून अवकाशात सोडले. जगभरातून त्याचे कौतुक झाले.. एकाच वेळी १०४ !!! जबरदस्त !!!

    पण जगाला काय माहित की आमच्याकडे कोणत्याही वस्तू वाहून नेण्याची क्षमता म्हणजेच भारवाहन क्षमता (Carrying Capacity) वर्षानुवर्षे फार मोठी आहे....

  • वेध संसदीय कार्यपद्धतीचा

    भारतीय संसदेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तरीही या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्या-बोलण्यासारखे बरेच काही असते. कदाचित म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांचे ‘द पार्लमेन्टरी सिस्टिम’ हे नवे पुस्तक बरेच काही सांगून जाणारे ठरते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. सामान्य माणसाला त्यातून प्रचलित राजकारणाचा नव्याने परिचय होतो.

  • वीजनिर्मिती – एक वेगळा विचार

    “महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात नवीन वीजनिर्मिती झाली नाही.”

    “महाराष्ट्र २०१२ पर्यंत लोडशेडींगमुक्त होणार- ऊर्जामंत्री”

    “२०१६ पर्यंत लोडशेडींग चालू ठेवावे लागणार- महाजेनको”

  • संस्कृती रक्षण

    संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची.

  • सफारी इन माबुला – भाग २

    आल्या आल्याच सुग्रास पंगतीचा बेत होता. खास 'बिग५' च्या देखरेखीखाली! जेवणगृहाच्या भिंतीवरून ते पाहुण्यांकडे लक्ष ठेऊन होते.

    सजावट विविध प्राण्यांची मुंडकी, कातडी, शिंगे वापरून केलेली होती, उजेडही आवश्यकते इतकाच. आफ्रिकन पदार्थ जेवणात होतेच पण इतरही चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. पदार्थांच्या चवी थोड्याश्या परिचित वाटत होत्या म्हणून चौकशी केली तर मुख्य आचारी भारतीय असल्याचे समजले. नुसत्या वासानेच 'घरेलू' वाटले. हॉटेलचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी हसून प्रेमाने स्वागत करत होते.

    इथपर्यंत सगळे कसे मस्त होते. पण "पहिली तीन तासांची सहल संध्याकाळी आहे, खोलीत जाऊन थोडावेळ विश्रांती घेऊन सफारीसाठी तयार रहा" असा गाईडचा आदेश ऐकताच माझ्या पोटात गोळाच आला. जेवण अंगावर आले होते, त्यामुळे पाय आपोआप खोलीकडे वळले. सफारीला जायची भीती जास्त का खोलीत एकटीने बसायची भीती जास्त हेच समजत नव्हते. शेवटी बाहेर जाऊन पहाणेच पसंत केले. १०-१२ जीपचा तांडा लॉज समोर उभा होता. ५-७ फूट उंचीच्या, ६ते ८ चाकांच्या, हिरवट रंगाच्या, ९ जणांच्या बसण्याची व्यवस्था असणाऱ्या उघड्या टपाच्या जीपकडे पाहूनच जीव दडपला. वर चढून बसायचं कसं हा प्रश्न फक्त माझ्या मनात आला नाही, तर सगळेच या विचारात दिसले. या जीपमध्ये ९ प्रवासी तीन चढ्या बाकांवर बसतात त्यामुळे कोणत्याही सीटवरून सगळीकडचे दृश्य स्पष्ट दिसते. त्यांचे चालक असे धिप्पाड की, क्षणभर त्यांचीच भीती वाटावी. रंगाने काळेकभिन्न, उंची ६ फुटांपेक्षा जास्त, मजबूत बांधा असणारे असे असले तरी पण त्यांचे विनम्र बोलणे, हसणे, मदतीचा हात पुढे करणे, सारेच प्रसन्न करणारे होते. सगळ्यांनाच जीपमध्ये चढायला चालकाची मदत लागली. आमच्या जीपमध्ये आम्ही फक्त ६ जणच होतो. कसे चढायचे, कुठे पाय ठेवला तर चढणे सोईचे होईल याचा विचार माझ्या मनात चालू असताना जीपच्या चालकाने मला जीपमधल्या सगळ्यात उंच बाकावर कधी टाकले तेच कळले नाही. जीप मध्ये बसल्यावर एका रेंजरने प्रत्येक चालकाजवळ एक एक बंदूक व तीन तीन गोळ्या दिल्या व त्याची नोंद केली. एकंदर रागरंग पाहता मला खोलीत परत पळून जावे असे फार वाटू लागले. तेवढ्यात जीपचा तांडा चालू झाला.लॉजच्या आवारातून गमती देशोदेशी बाहेर पडताच पुरुषभर उंचीचे पिवळे पिवळे गवत सगळीकडे दिसू लागले. थोड्या अंतरापर्यंत एकत्र राहून मग प्रत्येक चालकाने आपला वेगळा मार्ग स्वीकारला. भोवती सर्वत्र गवत व आपण त्यात एकटे ह्या भीतीने काळजाचा ठोकाच चुकला. चालक मात्र त्याच्या ठरलेल्या गतीने पुढे गवतातल्या रस्त्यात जीप दामटवत होता. भन्नाट वारा सुटला होता, वाऱ्यावर डुलणाऱ्या गवताच्याही वरून लांबवरचे दृश्य पहाताना भीतीची जागा उत्सुकतेने व प्रसन्नतेने कधी घेतली कळलेच नाही.

    समोर लाल मातीचा कच्चा रस्ता, व आजूबाजूच्या नजरेच्या टप्प्यापर्यंत रानच रान दिसत होते. गवत व झाडे याखेरीज दुसरं काही नव्हतंच. चालक तर मातीच्या खडबडीत रस्त्यांवरून वेगात गाडी हाणत होता, पटकन उजवी डावी वळणे घेत होता. १२००० हेक्टरचे रान, त्यात मातीचे रस्ते. ना कुठे चिन्हे, पाट्या वा खुणा. आपण चुकणार तर नाहीना अशी पाल चालक सोडून बाकी प्रत्येकाच्या मनात चुकचुकली. आपापसात तशी कुजबूजही सुरू झाली. आपोआपच शेजारच्या सीटवरच्या सोबत्याचे हात घट्ट धरले गेले. त्यात अचानक गाडी थांबली. समोर पाहिले तर दूरवर दोन गेंडे उभे होते. इथे गवत थोडे कमी उंच होते त्यामुळे लगेच आम्ही फोटो काढणे सुरू केले. उदी रंगाचे ४-५ फूट उंचीचे २ गेंडे आम्हाला पाहायला आमच्याच दिशेने यायला लागले. त्यांचा आकार व आविर्भाव बघण्यासारखा होता. आमच्या जीपपासून ५-६ फूटांवर थांबून त्यांनी आमचे निरीक्षण सुरू केले. रानातले ते रहिवासी व आम्ही पाहुणे. आमचे नीट निरीक्षण करून 'अत्यंत निरुपद्रवी' असल्याचा शिक्का त्यांनी पायाखालची जमीन जोरजोरात उकरून उमटवला व तोंडाने 'फुर्रर्र' करून ते आमच्या समोरून दुसऱ्या बाजूला निघून गेले. ते रस्ता ओलांडून जाईपर्यंत आमचा मुक्काम तेथेच. रानाच्या सुरुवातीसच ते दोघे भेटल्याने त्यांची नेमणूक या रानाचे पहारेकरी म्हणून असावी यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले. गेंडे पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत आम्ही एकटक बघत होतो. सुरुवात तर छान झाली म्हणून आम्ही खूश! जीप पुढे निघाली. थोडे पुढे जातो तो हरिणांचे व झेब्यांचे कळप मुबलक प्रमाणात भेटले. त्यांचे भरपूर फोटो काढून आम्ही पुढे निघालो. वाटेत बबून, जिराफ, नीलगाई वगैरे मंडळी भेटतच होती. पण अजून हत्ती व जंगलचा राजा दिसले नव्हते. "आता सायंकाळी पाणवठ्यावर सिंह दिसतील, कदाचित लेपर्डही दिसण्याची शक्यता आहे." असे चालक महाशय सांगत होते. तोच 'खर्र खट्ट' असा आवाज करून जीप थांबली. आम्हाला वाटले हत्तीबित्ती आला की काय? आमचे कॅमेरे सरसावले तोच "गाडी पंचर हाय, टायर बदलायला हवा, तवा समदे खाली या" अशी आज्ञा ऐकू आली. सहज सभोवती नजर टाकली तर हाकेच्या अंतरावर हरणं, नीलगाई, झेब्रे व दूरवर गेंडे दिसत होते. जवळच कुठेतरी गजराज व वनराजही असणार होते. हे सगळे मनात आले, अन् खाली उतरायचे कुणाचेच धाडस होईना.

    आसपास दुसरी जीप दिसत नव्हती, लॉज तिकडे दूर कुठेतरी राहिलेले. भोवताली फक्त रानगवत, प्राणी अन् टायर फुटलेली जीप. बापरे! 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे' च्या चालीवर 'श्वापदांच्या शोधात सहा प्रवासी' ऐवजी 'सहा प्रवाशांच्या शोधात श्वापदे' असे नवीन नाटक जंगलाच्या पार्श्वभूमीवर रंगणार की काय याची भीती वाटायला लागली. माझी तर पाचावर धारण बसली. "बघा, मी म्हणत नव्हते का की...." ह्या माझ्या बडबडीकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता कारण चालकाची "खाली उतरा व दूर गवतात उभे रहा" अशी घाई चाललीच होती. शेवटी जीव मुठीत धरून सर्वजण उतरले. आता झेब्रे व हरणांची सोबतही खूपच हवीहवीशी वाटू लागली. आम्हाला धीर देण्याच्या उद्देशाने तेही आमच्या जवळ येऊ लागले. त्यांचे फोटो काढण्यात आम्ही रंगून गेलो त्यामुळे खाली उतरताना वाटलेली भीती कशी व केव्हा कमी झाली ते कळलेच नाही.

    आजुबाजूला बघण्यासारखे तर खूपच होते. इतकावेळ जीपमधून एकसारख्या दिसणाऱ्या गवताच्याही खूप जाती आहेत, त्यावर छोटीछोटी नाजूकशी विविधरंगी फुलेही आहेत हे समजले. मोठ्या झाडांच्या शेंड्यांवरून गुलाबी, पांढरट दिसणारे फुलांचे झुबके मन आकर्षित करत होते. हे सगळे भरधाव जाणाऱ्या जीपमधून दिसलेच नव्हते. आमचे निरीक्षण चालू होते तोवर जीपमधल्या दोन्ही पुरुष प्रवाश्यांच्या मदतीने चालकाने अर्ध्या तासात जीप ठीकठाक केली. जीपचे बदललेले भले मोठे चाक त्याने एकट्याने हाताने जीपमधे आदळताच जीप जागेवरच थरथरली. जीपला उचलण्यासाठी लावलेला जॅक जीप इतकाच भक्कम होता. तो लावताना त्याचा आकार बघण्याचे कुणालाच सुचले नव्हते तर आता उतरवताना तरी बघू या म्हणून आम्ही जीपजवळ गर्दी केली. ते पाहताच चालकाने ओरडून "जीपपासून १०-१२ फूट लांब जा' असे ओरडून सांगितले. आम्ही दूर जाताच त्याने जीपला जॅक लावलेला असतानाच जीप जोरात चालू केली, व इतका वेळ उभ्या स्थितीत असणारा जॅक धाडकन मातीत आपटला, खूपच धूळ उडाली, मोठा आवाज झाला, जीप पुढे गेली. चालकाने ती परत आमच्याजवळ आणली, जीपमध्ये चढण्याची खटपट झाली. जॅक लावण्याच्या पद्धतीची, जॅकच्या नवीन प्रकाराची आमच्या ज्ञानात भर पडली व आम्ही पुढे निघालो.

    थोड्याच अंतरावर आमची वाट बघत असलेले गजराज भेटले, अगदी दहा फुटावरून दर्शन झाले. नशीब, ते थोडे उशीराने संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी निघाले होते नाही तर आमची गाठभेट अगदी जवळूनच झाली असती. जीपवर चढल्याने आम्ही आता थोडेतरी त्यांच्या लेव्हलला आलो. आफ्रिकन हत्ती किती मोठा असतो ते आत्तापर्यंत फक्त पुस्तकात वाचले होते. पण इथे समोर आपले प्रशस्त कान हलवत, लांबलचक सोंडेने गवत तोडून डोक्यावर मारत आपल्या बारीक डोळ्यांनी आम्हाला ते बराच वेळ न्याहाळत होते. पुरेसा वेळ फोटो काढायला देऊन सावकाशपणे गजराज हलले. जरी ते आमच्यापासून दहा फुटावर होते, आम्ही जीपमध्ये होतो तरी गजराज दिसेनासे होईतो जीव थोडा धाकधूकच करत होता. पुढे गेल्यावर पाणवठ्यावर सुसर, हिप्पो दिसले. वनराज मात्र थोडक्यात हुकले.इतरांना कदाचित हळहळ वाटली असेल, पण मला मात्र चालकाची खटपट, त्याची ताकद, कुठलेही संकट न येताच आलेली मानसिक धास्ती, झेब्रे, हरणे, गेंडे इत्यादींचा अवतीभवतीचा वावर हे वेगळे पण अद्वितीय अनुभवच संपूर्ण सहलीचे फळ देऊन गेले. बघता बघता रान अंधारात गडप झाले व आमची जीप परत वळली. बिग ५ पैकी तिघे तर भेटले. आता पोटात कावळे कोकलत होते, तरी रानावरून नजर हटत नव्हती. सभोवतीचा अंधार, आकाशात रेंगाळणारा चुकार संधिप्रकाश, त्यात उजळून निघालेले ढग, चंद्राची कोर, दूरवरचे धूसर डोंगर सारे सारे खूपच रम्य दिसत होते.

    लॉजवर परतलो तर आफ्रिकन वाईन (आणि सरबताचेही) ग्लास तयार! सकाळच्या ताल वाद्याऐवजी खास आफ्रिकन तंतूवाद्य वाजत होते. खांबाखांबावर मशाली तेवत होत्या. त्यांचा उजेड व धुराचा वास आपण शहरापासून दूर जंगलात आहोत याची जाणीव करून देत होते. चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असलेला बूफे उघड्यावर मांडला होता. खमंग वासानेच पोट भरून गेलेसे वाटले. बटाट्याची भाजी, वांग्याचे खरपूस भरीत, वेगवेगळ्या उसळी, सलाडचे प्रकार... एवढे सगळे पदार्थ आहेत तर त्याबरोबर पोळी किंवा भाकरी मिळेल तर किती मजा येईल असे मनात येईतो मागून प्रश्न आला, "हॅल्लो सर, लाइक टु हॅव रोटी?" उत्स्फूर्तपणे "वॉव" असा प्रतिसाद आला आणि उरलेले पोटही भरून गेले. ओळीत मांडलेली टेबले, मधे मधे छोट्या छोट्या फायर-प्लेसेस, वाद्यवृंद, झोपड्या... अगदी मस्त माहोल होता. थोडी चौकशी केली तर दुपारच्या जेवणाच्यावेळी थोडक्यात चुकामुक झालेले बल्लवाचार्य भेटले. ते चक्क मुंबापुरीचे पूर्वरहिवासी निघाले. ते आणि आम्ही अगदी एका गावचेच की! मग तर रोटी जास्तच गोड लागली. सगळे पदार्थ नुसते चाखून पाहिले तरी पोट तुडुंब भरले, निद्रादेवी खुणावू लागली व पाय आपोआपच खोलीच्या दिशेने पडू लागले.

    खोलीत पंखा होता पण हवेतला गरमा कमी करण्याएवढी ताकद त्याच्यात नव्हती. पलंग, गाद्या, उश्या सगळे छान होते पण थोडीशी डासांची गुणगुण बेचैन करत होती. दिवे नव्हतेच त्यामुळे भींतीवर हलणाऱ्या आमच्याच सावल्या खूप मोठ्या वाटत होत्या, कसेबसे कंदिलाच्या प्रकाशात झोपायचा प्रयत्न करत होतो तोच खोलीमागच्या व्हरांड्यात खुसफूस ऐकू आली. हळूच पडदा करून पाहिले तर एक हरीण आपल्या कुटुंबासह आमच्या खोलीपाशी मुक्कामाला आला होता. आपण कुठेही गेलो आणि कुणी आपल्याला भेटायला आले तर किती छान वाटते ना! तसेच एका हरिणाने सहकुटुंब भेट देऊन आमचे क्षेमकुशल विचारण्याचे सौजन्य दाखवले हे खूप म्हणजे खूपच छान वाटले आणि लगेच मस्त झोपही लागली एवढे मात्र खरे!

    दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा दुसरा फेरफटका होता. परत जीपची सफर. पण आज मात्र भीती अजिबात वाटत नव्हती. उलट कधी एकदा जीपमध्ये शिरतो याची उत्सुकता होती. पहाटेचा मस्त गारवा, चमकते दवबिंदू, अगदी झालेला सूर्योदय बघताबघता आम्ही रानात प्रवेश कधी केला कळलेच नाही. काल रात्रीचे रान ते हेच का असा प्रश्न पडावा एवढे सगळे सकाळच्या वेळी वेगळे दिसत होते. सकाळच्या-पहाटेच्या कोवळ्या उन्हात सगळे गवत कसे सोन्यासारखे लखलखत होते. झाडे ताजीतवानी होऊन वाऱ्यावर डोलत होती.

    त्यावर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी इकडून तिकडे आपले पंख फडफडवत घिरट्या घालत होते. त्यांचा चिवचिवाट वाऱ्याच्या शिळेला साथ देत होता. पक्षांच्या विविध जाती पाहायला मिळाल्या, काल आमच्या नादुरुस्त जीपला सोबत करणारे झेब्रे, हरणे आमची वाट तितक्याच उत्सुकतेने पहात होती. ते मोकळं सोनेरी रान, उडणारे पक्षी आजूबाजूला वावरणारे प्राणी....काहीही विसरणे केवळ अशक्यप्रायच!परत आलो तेव्हाही ओला टॉवेल व सरबताचा ग्लास तयार. या लॉजचे वैशिष्ट्य असे की, कोठेही सुवेनीर शॉप, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर नाही. चहा पाणी, न्याहारी, जेवण सगळे सगळे इथेच. टी.ही. फोनची गरज खरं तर किती कमी असते याची जाणीव झाली. पहाटेचा वेक अप कॉलही प्रत्येक खोलीच्या दारावर हाताची थाप देऊनच दिला गेला. किमान पण सर्व अत्यावश्यक सुखसोयी पुरवणारं हे लॉज एक वेगळाच अनुभव देणारं ठरलं. भीती मनात घेऊन सुरू झालेली सफर खूप आनंद व खूप सारे अनुभव घेऊन मजेत झाली. पण आपल्या अगदी दारात सहकुटुंब आलेल्या हरीणकुटुंबीयांचा पाहुणचार करायचा राहून गेला याची मात्र मनात रुखरुख राहून गेली!!!!!!!!!!

    --अनामिका बोरकर