(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संगीतातून व्यसनमुक्ती… (बेवड्याची डायरी -भाग ३४ वा)

    आज सायंकाळी ' म्युझिक थेरेपी ' आहे हे मला सकाळीच समजलेले ...शनिवारी संध्याकाळी प्राणयाम आणि समूह उपचाराच्या ऐवजी संगीत उपचार होतो हे सांगून शेरकर काका मला म्हणाले होते ..तुला पण गाणे म्हणावे लागेल ..मी घाबरलोच ..मला संगीत आवडत असले तरी ..गाणी म्हणण्याचा वगैरे प्रकार कधी केला नव्हता ..गाणी खूप ऐकली होती ..म्हणजे सिनेसंगीत ..गझल्स ..विरहगीते वगैरे अनेक प्रकारची गाणी मी आवडीने ऐकत असे. .. दारू पितांना बार मध्ये बसल्यावर आम्हा मित्रांची खास गझल्स लावण्याची फर्माईश असे बारमालकाला ..मेहंदी हसन ..गुलामली ...पंकज उधास ..अशा गायकांच्या गझल्स ऐकून ' चियर्स ' करण्यात ..आम्ही वेळेचे भान विसरून जात असू ..मात्र मी कधी गाणे म्हणण्याचा प्रयत्न केला नव्हता ..शेरकर काकांनी तुला पण गाणे म्हणावे लागेल हे सांगून मला काळजीत टाकले होते ..

    काही उत्साही लोक सकाळपासूनच लायब्ररी मधून गाण्याची पुस्तके घेवून त्यातील गाणी पाठ करण्याचा मागे लागलेले..सायंकाळी ७ वाजता ...बाहेरच्या ऑफिस मधून तबला ..पेटी ..कोंगो ..अशी वाद्ये वार्डात आणून लावली गेली ..एका कार्यकर्त्याने माईक सिस्टीम लावली ..एकंदरीत वातावरण निर्मिती झाली होती ..सर वार्डात आल्यावर प्रार्थना घेवून त्यांनी बोलायला सुरवात केली ..मित्रानो मला माहित आहे आपण शनिवारच्या संगीत सभेची वाट आतुरतेने पाहता ..कारण संगीत अशी एक जादू आहे ज्याचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो ..आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहे संगीत असे म्हणता येईल ..आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण करण्याची शक्ती संगीतात आहे ..नकारात्मक भावनांवर मात करण्याची शक्ती संगीत देवू शकते ..म्हणूनच आपण इथे आठवड्यातून एकदा संगीत उपचार घेतो ..

    इथे कोणी मोठा गायक अथवा कलाकार नाहीय आपल्यात .. तरीही सर्वांनी स्वताच्या आनंदासाठी या उपचारात भाग घेतला पाहिजे अशी माझी सर्वाना विनंती आहे ..प्रास्ताविक झाल्यावर सरांनी एक हिंदी भक्ती गीत म्हंटले ..अनुप जलोटाने गायिलेले हे भक्तीगीत मी पूर्वी लहानपणी अनेकदा ऐकलेले होते ..सर गाणे म्हणतात हे पाहून मला नवल वाटले ..दुसरे सर हार्मोनियम वर बसले होते ..वा म्हणजे आज दोन्ही प्रमुख समुपदेशक या थेरेपीला हजर होते तर ..सरांचे गाणे झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या ..मग सरांनी आम्हाला एकेकाला आवाहन केले गाणी म्हणण्यासाठी ..जे उत्साही गायक वार्डात होते त्यापैकी एक जण उठून समोर गेला ..त्याने माईक हातात घेवून गाणे म्हणण्यास सुरवात केली ..' दोनो ने किया था प्यार मगर ..मुझे याद रहा ..तू भूल गई ' महुवा सिनेमातील हे दर्दभरे गाणे तो म्हणू लागला ..त्याचा आवाज यथातथाच होता ..मात्र तो अतिशय तल्लीन होऊन हे गाणे म्हणत होता ..तबल्यावर आमच्यातीलच एक जण बसला होता ..तो उत्तम तबलजी नव्हताच तरी तालाचे बरे भान होते त्याला ..मध्ये एक दोन ओळी विसरल्याने गाणाऱ्याने जेव्हा शब्दांऐवजी न ना ना न नाना ..नान न नाना सुरु केले तेव्हा सगळे हसू लागले ..दर्दभरे गीत सुरु असताना एकदम विनोदी वाटू लागले ..त्याचेही गाणे संपल्यावर टाळ्या वाजवल्या आम्ही ...

    एकाने मराठी लावणी म्हंटली ..त्याबरोबर शिट्ट्या वाजू लागल्या ..वातावरण चांगलेच रंगले ..शेरकर काका माझ्या मागे बसून मला बोटांनी ढोसत होते ..तू जा गाणे म्हणायला म्हणून ..वैतागून मी उठून दुसरीकडे गेलो ..मध्येच सर्वांनी ' वुई वांन्ट रमेश 'असा गलका सुरु केला ..एक रमेश नावाचा गांजाचा व्यसनी तयारच होता गाण्याचे पुस्तक घेवून ..हा खूप चांगला गायक असावा म्हणून सर्व त्याची मागणी करत आहेत असे मला वाटले.. रमेशने माईकचा ताबा घेतल्यावर खूप मोठा गायक असल्यासारखे जरा ' हॅलो माईक टेस्टिंग ...वन ..टू ' ...मग एकदम त्याने हिमेश रेशमाईया सारखा नाकात सूर लावला ..' झलक दिखलाजा ..एक बार आजा ...आजा ' सगळे हसू लागले ..रमेशला ताल सुराशी काही घेणे देणे नव्हते असे दिसले ..तो मस्त डोळे मिटून ...आजा ..आजा आळवीत होता ..त्याची तल्लीनता पाहून सर्वाना हसू येत होते ..सुदैवाने त्याचे डोळे बंद असल्याने त्याला समजत नव्हते की आपल्याला सगळे हसत आहेत ..एक गाणे संपल्यावर लगेच त्याने दुसरे गाणे सुरु केले ..' लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता ' ..जेमतेम दोन ओळी म्हंटल्यावर मग पुन्हा दुसरे गाणे ' ओब्लाडा डा डा डा ..ओब्लाडू डू डू ' तो डोळे मिटून असे अंगविक्षेप करत होता ..की हसून हसून आमची मुरकुंडी वळली ..बरेच मनोरंजन झाल्यावर मग सर्वांनी एकदम टाळ्या वाजवायला सुरवात केली ..गाणे सुरु असताना सतत टाळ्या म्हणजे श्रोते तुम्हाला खाली बसायची सूचना करत आहेत हा अर्थ रमेशला माहित नसावा ..त्याचे ..डा डा डू डू सुरूच होते ..शेवटी सरांनी त्याला थांबवून आता नंतर म्हणा गाणे असे सांगितले तेव्हा त्याने माईक सोडला ..

    मला लक्षात आले रमेश चांगला गायक होता म्हणून नव्हे तर त्याची फिरकी घेण्यासाठी त्याला गाण्याचा आग्रह होता होता ..बराच वेळ धमाल सुरु होती ... ' देखा ना हाये रे सोचा ना ..हाये रे ' या गाण्याला पब्लिक उठून नाचू लागले ...' खैके पान बनारसवाला ' पण झाले ..सुमारे दोन तास अतिशय मजेत गेले सर्वांचे..आम्ही सगळे आमच्या जीवनातील अडचणी ..संकटे ..दुखः ..विसरून जणू आनंदाच्या प्रदेशात शिरलो होतो ..सरांनी जेवणाची वेळ झाल्यावर सरांनी थांबण्याची सूचना केली आणि माईक हातात घेतला ..मित्रांनो सुमारे दोन तास आपण हा संगीताचा आनंदानुभव घेत होतो ..आता वास्तवात परतायची वेळ झालीय असे म्हणत ..समारोप करू लागले..

    माणसाच्या जीवनात निराशा ..अडचणी ..संकटे असणारच ..तरीही जेव्हा जेव्हा आपण खूप अवस्थ असू ..कशातच मन लागत नसेल ..सगळ्या नकारात्मक भावना घेरतील तेव्हा संगीत नक्कीच तुम्हाला सगळ्या चिंता विसरायला लावते ..व्यसने करण्याच्या काळात देखील आपण संगीताचा आनंद घेतला आहे ..मात्र पोटात आणि डोक्यात दारू असताना आलेला आनंद हा कितीही झाले तरी कृत्रिमच ...भानावर राहूनच संगीताचा खरा आनंद लुटता येतो ..गीतकाराचा शब्द न शब्द बोलका होतो ..त्यात दडलेला गहन अर्थ मनात उतरतो ..सुरांची जादू हृदयात आनंदाचे कारंजे निर्माण करते ..तसेच वाद्यांचा ध्वनी आपल्या डोक्यात ताल निर्माण करून कोणतीही नशा न करता पाय थिरकायला लावतो ..मन भारून टाकतो हा अनुभव आता आपण सर्वांनी घेतलाय ..जगातले कोणतेही मादक द्रव्य देवू शकणार नाही अशी नशा संगीत आपल्याला देते ..इथून बाहेर पडल्यावर आपण हा आनंद विसरता कामा नये ..जेव्हा जेव्हा सगळे जग तुमच्यावर रागावले आहे असे वाटेल ..जगण्याचा कंटाळा येईल ..जीवन निरस वाटू लागेल ..एकटेपणाची भावना मनाला ग्रासेल ..व्यसन करण्याची अनावर ओढ मनात निर्माण होईल ..त्या त्या वेळी आपण जर संगीताचा वापर केला तर नक्कीच आपल्याला व्यसनमुक्तीचे जीवन आनंदाने व्यतीत करण्यास उर्जा मिळेल ..असे सांगत सरांनी उपचारांचा समारोप केला ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • स्वारगेट ते अमेरिका..

    जायचंय अमेरिकेला.. पण विमानतळ सोडून भलतीकडेच पोचलेय स्वारी......

    p-16393-swargate-te-america

  • दैनिक लोकसत्ता

    इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्र समूहाने १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरु केले. त्र्यं. वि. पर्वते हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर ह. रा. महाजनी संपादक झाले. त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत. लोकसत्ता मुंबई, ठाणे, महामुंबई, वसई-विरार, पुणे, नाशिक व नागपूर येथून प्रकाशित होते. याशिवाय मुंबईतून सांज लोकसत्ता हे सायंदैनिकही प्रसिद्ध होते. लोकप्रभा साप्ताहिक लोकसत्ताचे प्रकाशन आहे. यात करिअर, अर्थ, रविवार, नागपूर, नाशिक वृत्तांत, लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे आणि चतुरंग, वास्तुरंग या पुरवण्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • संस्कृतीचा पुजारी

    विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील. 

    – मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

  • सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !

    सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !

  • माझे मन तुझे झाले !

     

  • थोरांच्या ऐतिहासिक वास्तूंतून प्रेरणा

    पुणे शहरात खासगी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजचा परिसर म्हणजे तर ज्ञानवंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला परिसर होय. गोपाळ कृष्ण गोखले, रॅंग्लर परांजपे, रॅंग्लर महाजनी यांसारख्या अनेक ज्ञानी व व्यासंगी शिक्षणतज्ञांचे वास्तव्य व वावर या परिसरात झालेला आहे. येथील प्रत्येक इमारतीला वैभवशाली इतिहास व परंपरेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आईवडिलांच्या अशिर्वादाने मला या फर्ग्युसन कॉलेजचा आवारात तब्बल ८ वर्षे बंगला नं.१ म्हणजे, प्राचार्य आगरकरांच्या बंगल्यात राहण्याचा योग आला. त्या वास्तूतील रम्य आठवणी एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.

  • मातृभूमीशी ‘गद्दारी’!

    आज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !

  • मानसिक तणाव (क्रमशः पुढे ५ वर चालू)

    जीवनाच्या रगाड्यातून –

    मानसिक तणाव (क्रमशः पुढे ५ वर चालू)

    00
    जीवनाचे एक महान सत्य …..

  • भ्रष्टाचाराचा डेटाबेस

    भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे. आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत.