— श्री.अनिल रा. सांबरे
Author
Post Views: 12
श्री वसंत चिंचाळकर हे नाव ललित लेखनाच्या वाचकांना सुपरिचित आहे. निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून प्रसिद्ध होणारे त्यांचे लेखन हे चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. समाजातील स्थित्यंतरांचा त्रयस्थपणे वेध घेणारी पत्रकाराची नजर, मूल्यांच्या होत जाणार्या र्हासामुळे तळमळणारे संवेदनशील मन आणि या दोहोंची यथार्थ सांगड घालणारी बुद्धी यांचा त्रिवेणी संगम चिंचाळकरांच्या या कथांमधून वाचकाला दृष्टीस पडतो.
Copyright © 2025 | Marathisrushti