आपल्या लाडक्या सरकारने म्हणजे आम आदमीचा विचार करणारे सरकार,
ऑनलाईन यंत्रणा फोफावत गेली तर शैक्षणिक ग्रंथालये, ग्रंथालय सेवक या नव्या यंत्रणेत उपयुक्त ठरतील का? टिकतील का? टिकायचे असेल तर ग्रंथालये ऑनलाईन पध्दतीत कशी आणता येतील यावर तज्ञांनी विचार मंथन करायला हवे.
निरर्थकातही जेथे अर्थ गवसु लागले,
नियतीचे डावं सारे सार्थ भासु लागले.
आम्ही म्हणजे आमच्या घराण्यात या चित्रात दिलेल्या आकाराचा पेला गेली आठ दहा दशके तरी वापरत आहोत. पुर्वी पितळिचे होत. मग जर्मन सिल्वर व १९७०-८०पासून स्टीलचे.
स्वामीजींनी एक उत्तम गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी या कर्मयोगाची व्याख्या केली नाही. जर मला काही कृती करायची असेल तर आधी मला हे कळणे गरजेचे आहे की हे माझं कर्म आहे. तेव्हाच मी करु शकेन. पुन्हा कर्माची कल्पना ही निरनिराळ्या राष्ट्रात निर निराळी असते.
कुटणे, दळणे, भरडणे, कांडणे, सडणे,फोडणे, वाटणे ...केवढ्या या क्रिया ! आणि त्यासाठी पूर्वी घराघरातून जाती,( किमान २ /३ प्रकारची ), पाटा-वरवंटा, खलबत्ता , रगडा, उखळ-मुसळ अशा गोष्टी असायच्याच ..दगडी वस्तूंना टाकी लावून घेणे, लाकडी वस्तू नीट साफ करणे, लोखंडी वस्तू धुतल्यावर गंज लागू नये म्हणून नीट पुसून ठेवणे अशी केवढी उस्तवा
र असायची ! मसाल्याचे काही नाजूक पदार्थ आणि औषधे कुटण्यासाठी पितळी किंवा संगमरवरी खलबत्ते असायचे. रोजच्या छोट्या कुटण्यासाठी जमिनीतच वायन असायचे. मेंदी किंवा अफू वाटायला वेगळ्याच आकाराच्या वरवंट्याचे पाटे असत.हलकी किंवा जड अशी २ प्रकारची मुसळे असत. पण ..पण साला
एक मिक्सर आला ....आणि या सगळ्यांची वाट लागली ! मराठी भाषेतून कांही वर्षांनी ही सर्व क्रियापदेच बाद होतील. लग्नात घाणा भरतांना पाटा-वरवंटा, जाते , मुसळ यांचा सन्मान होई. देव देवतांनी असुरांशी लढताना मुसळ हे हत्यार म्हणून वापरले होते. बारशाला
तर तान्हुल्याच्या आधी वरवंट्याचा केवढा मोठा मान !
तसेच कायम अग्नी जपून ठेवणारे गावचे अग्निहोत्र म्हणजे -चूल वैल ! ज्या चुलीवर जेवण शिजवले जायचे त्यातच वैश्वदेवाच्या आहुतीही दिल्या जायच्या. हे सगळंच आता वेगाने नाहीसे होतंय.
यातील काही वस्तूंच्या ३-४ इंचाच्या सुंदर प्रतिकृती मला अलीकडे नाशिकला मिळाल्या. जाते,पाटा वरवंटा, रग
डा हे अस्सल दगडाचे,चूल-वैल मातीची ,लोखंडी खलबत्ता ( तुळशीबाग),लाकडी उखळ-मुसळ.. अशा सुंदर वस्तू !! एका मित्राच्या खूप महागड्या flat मधील नवीन "किचन" च्या सजावटीसाठी मी या वस्तू त्याला दिल्या. त्या त्याला आणि पाहणाऱ्यांना खूप आवडल्या . माझ्या संग्रही तर या गोष्टी आहेतच पण त्याचा असा प्रचार झाला तर निदान आठवणी तरी टिकून राहतील !!
--मकरंद करंदीकर
यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.
जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात.
पुणे तिथे काय उणे महाराजा ?
संतूर वाद्यापासून प्रेरणा घेत आणि त्याला आपलंसं म्हणत ठाण्याच्या गौरव देशमुखनी या क्षेत्रात काहीतरी आगळे-वेगळे संगीत निर्मिती करण्याचे पाऊल उचलले ते पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत….
हॉँगकॉँगच्या एका टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद.
नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.....पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल.
"माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव....
जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या.
मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार.
मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस.
जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा.
प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस.
अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना.
माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा.
आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही.
- तुझा पप्पा
Copyright © 2025 | Marathisrushti