भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच
दादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले.
अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे रंगभूमीच्या निरलस सेवेचा सन्मान आहे. बालपणीच नाट्यवेडाने झपाटलेल्या जाधव यांनी अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. नाट्य चळवळीची परंपरा असणार्या अकोल्यात ही चळवळ अधिक रूजवण्यात आणि त्याद्वारे नाट्य व्यवसायाला बळकटी प्राप्त करुन देण्यात जाधवांचे योगदान मोलाचे आहे.
ही कविता माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे.
काही व्यक्तींमध्ये कलाकार हा कुठल्यातरी कप्प्यात दडून बसलेला असतो, योग्य संधी मिळाली की तो स्वत:चं रुप प्रगट करतो, आणि त्या व्यक्तीला ही जाणीव होताच, त्याची कारकीर्द त्या दिशेनं वळू लागते, घडू लागते, पुढे फुलून त्या कलेला बहर पसरतो व कलाकार म्हणून ती व्यक्ती लौकिक मिळवते आणि सातासमुद्रपार सुद्धा चाहते निर्माण करते. अशीच प्रचिती आली संदीप लोखंडे या तरुणाशी बोलताना. स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक आणि स्वत:तील अभिनयाचे पैलू त्यांनी “शेअर” केले मराठीसृष्टी.कॉम शी केलेल्या या बातचीत मधून……..
त्या दुकानातील नौकर दुकानाची सायकल ढकलत आणत होता. मालकाने विचारलं तर म्हणाला, सायकल पपंचर (puncture) आहे. मालकाने गल्ल्यातून 10 रुपये काढून दिले, 1 तासाने तोच नौकर, तीच सायकल, तशीच ढकलत आणत होता. पुन्हा मालकाने विचारलं, तर उत्तर मिळालं, दोन पपंचर होते, 10 रुपयांत 1 पपंचर काढतात, माझ्या कडे 10च होते म्हणून एकाच काढून आणलं..
नौकाराचे नाव होतं- ज्ञानेश्वर !!!
"आखें" चित्रपटात अमिताभ बच्चन 4जणांना 'नेमबाजी' शिकवत असतो, त्यात नेमका अर्जुन रामपाल चा नेम चुकतो आणि परेश रावल पटकन बोलून जातो, "ए, तेरा नाम अर्जुन किसने रखा?"
तर मूळ मुद्दा हा की, आपल्या आजूबाजूला 70-80 % लोकं अशी असतात की जी त्यांच्या नावाच्या अगदी विरुद्ध वागत असतात. "लेकराचे पाय पाळण्यात दिसतात" म्हणतात मग नावं ठेवताना ती का दिसत नाहित ?
* अनुजा तुझी कोण? तर उत्तर येतं 'मोठी बहीण'.
* त्याने त्या 6 फूट उंच असलेल्या मित्राची ओळख करून दिली, हा 'वामन'.
* मोठ्या भिंगाचा चष्मा असलेल्या व्यक्तीच नाव होतं, 'संजय'
एका मित्राच्या वडिलांचे नाव 'हनुमंत' सुद्धा आहे.
'कृष्णा' नावाचा खूप सज्जन मित्र आहे माझा तर 'राम' नावाचा खूप वाह्यात मित्र सुद्धा आहे मला.
'लक्ष्मी' नावाची मोलकरीण कित्येक जणांच्या घरी असेल, तर 'राजा' नावाचा नौकर किती तरी दुकानात असतो.
एकाच मुली नंतर अपत्य न होऊ देण्याचा निर्णय, "कुंता" नावाच्या मैत्रिणीने घेतलाय.
'मीना' नावाच्या मुलीला पाण्याला घाबरलेलं पाहिलंय 'अबोली'ला बडबड करताना पाहिलंय.
बरं नुसते नावं च नाही तर 'आडनावात' विसंगती असलेली कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात...
5 वर्षापूर्वी लग्न झालेला, "अष्टपुत्रे" 1 वर्षांपासून 'वंध्यत्व निवारण केंद्रात' जातो आहे.
"कुबेर" नावाचा माणूस पोटापाण्यासाठी छोटेखानी हॉटेल चालवतो आहे.
कधीच दारू न पिणारा "झिंगरे" नावाचा मित्र मला आहे.
Adv वैद्य नावाचे मोठे वकील आहेत.
"लोखंडे" आडनावाचे कोमल ह्रदयाची माणसं जशी आहेत, तशीच अतिशय शांत स्वभावाची 'जमदग्नी' आडनावाची माणसं सुद्धा आहेत......
लिहिता येईल अशी खूप खूप उदाहरणे सापडतील, पोस्ट चा आकार भला मोठा होईल म्हणून थांबतो.
जाताजाता- ज्यांच्या नावात काहीच आकार उकार नसतात ते माणसं साधी सरळ असतात, असं म्हणतात. पण ही देखील माझी अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणारा "उदय"नावाचा मित्र मला आहे तर तुमची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ""श र द""हे एकच नावं पुरेसे आहे, असं मला वाटतं !!!
तळ टीप :- आमच्या परिसरात "डावरे" आडनावाचा खूप मोठा गोतावळा आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या या "डावरे" परिवाराची माझी देखील ओळख नाही. मग कुणीतरी नवीन ओळख झालेला मला विचारतो, आमका - तमका "डावरे" तुमचे कोण? मी ही बेधडक, "हो आमचे नातेवाईक आहेत." असं ठोकून देत असे.
एकदा एकाने विचारलं, "विनय डावरे" तुमचा कोण? एका क्षणाच्या अवधीच्या आत बायको म्हणाली, 'नाही, तो आमचा कुणी नाही' घरी आल्याबरोबर मी विचारलं, तुला ग काय माहित त्याच्या बद्दल ???
ती म्हणाली, आहो तो कुणा "विनय डावरे" बद्दल विचारत होता. मला ठाम विश्वास आहे, "डावरे" मधे "विनय" असूच शकत नाही...!!!
विनोद डावरे, परभणी.
##सहजच सुचलं - 80
मी आपल्याला खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहे. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली.
काहि नाहि
चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.
7 मे - कोल्हापूर, मिरज, सांगली.
10 मे - सातारा, अक्कलकोट.
11 मे - वाई, महाबळेश्वर.
12 मे - बार्शी, बारामती.
13 मे - लातूर.
14 मे - अलिबाग, दौंड, पुणे.
15 मे - मुंबई.
16 मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
18 मे - पैठण.
19 मे - जालना.
20 मे - औरंगाबाद, नाशिक.
21 मे - मनमाड.
22 मे - यवतमाळ.
23 मे - बुलडाणा, मालेगाव.
24 मे - अकोला.
25 मे - अमरावती.
26 मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.
आपापल्या शहरात शून्य सावली चा अनुभव जरूर घ्या !
Copyright © 2025 | Marathisrushti