(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाराष्ट्रात विस्तारतेय अतिरेक्यांचे नेटवर्क

    गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.

  • सुप्रसिद्ध अभिनेते गणपत पाटील

    त्यांनी मा. विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेथे त्यांनी सुरवातीच्या काळात सुतारकाम , रंगभूषा करणे अशी कामे केली.

  • आयुर्विन न्युट्रिगेन

    Ayurwin-nutrigain

  • फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात…

    फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात....-

    ...अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस "चाललो हो शेट मी आता..." असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं.

    ....जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं

    ....आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं..

    ....गणपती विसर्जनाचे वेळी "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणताना कसलासा आवंढा दाटुन येतो..

    .....असंच काहीसं भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी विझलेल्या पणत्या काढतानाही होतं..

    ....अनेक वर्ष आपण ज्यात आनंदाने काढली ती चाळ पाडली की त्या विटामातींचे ढिगारे बघवत नाहीत. उनवारा पावसापासुन आपलं रक्षण करणारे ते पत्रे बघितले की काहीतरी विचित्रच होतं..

    ....आठवडाभर आलेले पाहुणे निघाले की अजुनही त्यांच्या चपला लपवाव्याश्या वाटतात रे...

    .....शाळेच्या रम्य दिवसांपासुन स्मृतीत जपुन ठेवलेलं कोपऱ्यावरचं चिंचेचं झाड पावसाने पडलं की आपल्या आतमध्येही कसलीशी "पडझड" होते...

    .....पहिला पाऊस आला की अजुनही सुट्टी संपल्याचं दु:ख होतं..

    .....ट्रॅफिक सिग्नलला भर दुपारी उपाशीपोटी माय पोराला घेऊन भिक मागताना दिसली की आपल्याच पोटात खड्डा पडतो, तिच्या आणि त्या पोराच्या काळजीने..

    .....बदली झाली म्हणुन गाव सोडुन जाणारे शाळासोबती पुन्हा कधीही भेटण्याची शक्यता नसते ते दु:खंही असंच काहीसं...

    .....अनोळखी लग्नात, कोणाचीही मुलगी सासरी जाताना आपला कंठ कशाला बुवा दाटुन येतो?

    .....

    .....या आणि अशा असंख्य Involvements जपत आपण आयुष्य काढतो...

    .....कसलासा "ओलावा" कायम आपल्या सोबत असतो. बराचसा भिजवुन टाकणारा, पण कुठेतरी आपला एक कोपरा जिवंत ठेवणारा.....!

  • परिस्थितीशी जुळवून घेणे ( बेवड्याची डायरी – भाग २९ वा )

    खरे तर निसर्गाशी ..कुटुंबियांशी ..नातलगांशी ..समाजाशी ..परिस्थितीशी जुळवून घेण्यातच माणसाचे भले असते ..त्रासदायक असलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी भावनिक पातळीवर संतुलित राहून..सर्वांच्या हिताचा विचार करून प्रयत्न केले तरच आपण परिस्थिती बदलण्यासाठी स्वता:ची ताकद वाढवू शकतो ..त्यामुळे माणसाचा नेहमी जुळवून घेण्याकडे कल असला पाहिजे .

  • प्राचीन मंत्र , तंत्र ,यंत्र वीद्येचा आधुनिक शिक्षाणात उपयोग

    मंत्र ,तंत्र , यन्त्र ह्या योग प्रकारा विषई काही गैर समज असतिल तर ते दुर व्हावे व आधुनिक शिक्षण शास्त्रातील लोकाना ह्याची माहीती व्हावी

  • तो निर्मळ आनंदी‘आनंद’ आहे म्हणून

    आयुष्य हे अष्टकोनी आहे असे गृहीत धरले तर माझी आजी, हिंदी सिनेमा,क्रिकेट, जयवंत दळवी,(महाराष्ट्र टाईम्ससहीत) विवि करमरकर, शिरीष कणेकर,मेधा (त्यासोबत मुलगी अक्षता हा कोटीकोन आणि नातू ईवान हा लघुकोन आलाच) आणि आनंदची मैत्री हे माझ्या आयुष्याचे आठ कोन आहेत. मराठेसरांची भूमिती काहीही म्हणो पण हे आठही कोन माझ्यासाठी विशालकोनच आहेत. यांतील एकही कोन जर माझ्या आयुष्यात डोकावला नसता तर माझ्या सप्तपदीचे (त्याला रतन खत्रीच्या मटक्याच्या भाषेत लंगडा म्हणतात) काही खरं नव्हते अशीच माझी पक्की धारणा आहे.

    आनंदच्या काही सद्गुणांचा मला कायम हेवा वाटत आलेला आहे. लहानसे उदाहरण द्यायचे तर बघा, तो शक्यतो कोणाच्याही वाढदिवसाला संदेश पाठवून शुभेच्छा देण्यापेक्षा त्या व्यक्तीला फोन करुन प्रत्यक्ष शुभेच्छा देणे जास्त पसंत करतो. आता एखाददोन अपवाद वगळा. उदा.त्याला राजश्री गोखलेला तिच्या वाढदिवशी फोन करण्याची प्रबळ इच्छा होती. मात्र सुजाता नाडकर्णीने जपानी लिपीतील राजश्रीचा फोननंबर, त्याने जंगजंग पछाडूनही जाम त्याच्या हाती लागू दिला नाही.

    अर्थातच हा अपवाद आहे.नियम नव्हे. त्याच्या दोन (की तीन,की किम ?) साउथ कोरियन मैत्रिणी वाढदिवसाला त्याचा फोन आल्याशिवाय वाईनच्या ग्लासाला ओठ लावीत नाहीत असे मला एकदा त्याची बायको सुजाताच (कोरडा आवंढा गिळून) सांगत होती. पुरूषस्य भाग्यम्, दुसरे काय ?

    तो कमालीचा मित्रव्यसनी आहे.त्याची प्रचंड मित्रसंपदा हा खरेतर एखाद्या प्रबंधाचा (आणि असुयेचा) विषय आहे.
    त्याचे शाळेतील मित्र, हाजीअली कॉलनीतील मित्र, विल्सन आणि चेतना कॉलेजमधील मित्र,जुन्या सोसायटीतील मित्र (उदा.पुष्कर चव्हाण), सिंगापूरचे मित्र, व्यवसायानिमित्त झालेले मित्र (उदा.कुमार केतकर), नोकरीनिमित्त झालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मित्र आणि काही तर कारणाशिवाय झालेले मित्र असा त्याच्या मित्रमंडळींचा अजस्त्र गोतावळा आहे.
    ठाण्याहून टिटवाळ्याच्या गणपतीला जावे त्या सहजतेने तो या मित्रांना भेटायला भरतभेटीच्या ओढीने वारंवार सिंगापूरहून मुंबईला येतो.

    त्याच्याकडे दोन आसनांच्या मधे उभे रहाण्याचा किंवा हवाईसुंदरीच्या आसनावर बसण्याचा मासिक पास असावा. (“मग हवाईसुंदरी कुठे बसत असेल ?” सतिश दामजी चौहानची पुणेरी खोचक शंका.) आम्ही माहीमला डॉ.नाडकर्ण्यांच्या फ्लॅटवरून (ज्यावर सध्या वसंतचा अवैध कब्जा आहे) स्टेटस हॉटेलला आमच्या गेटटूगेदरसाठी निघण्याची तयारी करत असताना आनंद त्याची ती सुप्रसिद्ध चंदेरी रंगाची बॅग घेऊन दारात दत्त म्हणून उभा राहिला. त्या बॅगेत एक दिवस ते एक महिन्याच्या मुक्कामापर्यंत कितीही दिवसांचे (पांढरा लेंगा व झब्ब्यासकट) कपडे व इतर सामान राहू शकते.

    तो अक्षताच्या लग्नाला येणार असे आम्ही गृहीत धरलेले असताना तो आठवडाभर आधीच्या “संगीत”लाच थेट डान्सफ्लोअरवर आला आणि माझ्या मावसबहिणीच्या कमरेला विळखा घालून सालसा नृत्य करु लागला. तिचा सालस नवरा बिचारा हॉलच्या एका कोपऱ्यात आइस्क्रीम चोखत उभा होता. गरीब माणूस.

    अगदी गेल्या महिन्यातील गोष्ट. आमची साठी साजरी करण्यासाठी अलिबागला जाताना आम्ही रोरोची वाट पहात भाऊच्या धक्क्यावर उभे होतो. तर एखाद्या ट्रॉलरमधून देवमासा व जलपरी पाण्यावर यावी तसे आनंद व सुजाता स्वागतसमितीच्या सदस्यांप्रमाणे रोरोच्या मुखाशी आमचे स्वागत करायला सुहास्य वदनाने उभे होते. तेव्हा आम्हाला बसलेल्या धक्क्यापुढे भाऊचा धक्का काहीच नाही.

    एकदा शेवटची कर्जत लोकल चुकावी तसे शेवटचे विमान चुकल्यावर तो प्रफुल्लच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांची शिकवणी घेण्यासाठी IIM त्रिचीला थेट सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांचे खाजगी विमान घेऊन आला होता. विमानात परराष्ट्रमंत्र्यांचे खाजगी कुटुंब होते की नाही याची मात्र (प्रफुल्लने आणि) इतिहासाने नोंद ठेवलेली नाही.

    कस्टम्समधे (सासूबाईंच्या नावाने) काहीतरी सेटिंग करुन तो मैत्रीचा उपकर किंवा अधिभार म्हणून सिंगापूरहून येताना १७ ते २१ बाटल्या मद्य घेऊन येतो. मग दोन दिवस माझे घर अबकारी खात्याने धाड मारलेल्या भिवंडीतील गोदामासारखे दिसू लागते. मी विश्वासास पात्र नसल्यामुळे त्या मद्याच्या वितरणाची जबाबदारी तो मोठ्या मनाने मेधावर सोपवितो. परवलीच्या शब्दांची देवाणघेवाण होते.मग एकेक जण येऊन (त्यात आनंदच्या पुण्याच्या मामेबहिणीचा मानलेला आतेभाऊही आला) मेधाने दिलेले कडक बुंदीलाडू (प्रत्येकी २ नग) खाऊन आपापली हक्काची बाटली घेऊन जातात.

    इतिहासाचा पेपर सोडवून झाल्यावर शेवटाला नागरिकशास्त्राचे दोन प्रश्न रहावेत तशा, कोणालाच नको असलेल्या दोन बाटल्या अनिल व माझ्यासाठी तळाशी शिल्लक रहातात. (साईड इफेक्ट्स…..आमच्या दाराशी ड्युटी फ्री प्लॅस्टिकबॅग्सचा ढीग पाहून समोरच्या सोज्वळ व धार्मिक उषावहिनी माझ्या व्यसनमुक्तीसाठी शारदामठात २१ दिवसांचे अनुष्ठान ठेवतात.)

    चित्रपट स्विकारण्यापेक्षा चित्रपट नाकारून दिलिपकुमार महान नट झाला असे गमतीत म्हंटले जाते. आनंदचे मात्र अगदी याउलट आहे. जो समोर येईल त्याच्याशी मैत्र करीतच तो लहानाचा मोठा झालेला आहे.

    त्याचे पाचसहा सही केलेले चेक्स कायम माझ्याकडे वस्तीला असतात.(शॉर्टटर्म लोनसाठी इच्छुकांनी मेधाशी संपर्क साधावा.) मधेच त्याला ससा चावल्यागत तो भलत्या वेळेस काकुळतीने मला विचारतो…

    “तुझ्याकडे माझा एखादा चेक आहे का ? बिर्ला इन्शुरन्सला द्यायचा आहे.” त्याच्या आवाजात इतकी अजीजी असते की जणू कुमारमंगलम बिर्लाच्या घरी पुढच्या दोन महिन्यांचे रेशन भरण्याची जबाबदारी याच्याच शिरावर आहे. मी मोठ्या उदार मनाने बिर्लाच्या खात्यात (आनंदचा) चेक भरतो.मग जणू कुमारमंगलमच्या घरी कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यागत मला तीनदा आनंदचा आभाराचा मेसेज येतो.

    माझ्या बहुतांश लिखाणाचा तो पहिला वाचक आहे. मी काळवेळ न पाहता त्याला दर दोनपाच मिनिटांनी लिखाणाचा कच्चा खर्डा पाठवीत असतो. तो विश्वामित्री एकाग्रतेने डोक्यावर बर्फ ठेऊन त्यात मौलिक सुधारणा सुचवीत रहातो. कधीकधी हा सिलसिला रात्रभर सुरू असतो.

    आता त्याच्यात अगदीच काही दोष नाहीत असे नाही. कधीकधी त्याच्या अंगात भिनलेली कॉर्पोरेट संस्कृती मैत्रभावनेवर मात करते.

    काही तातडीचे बोलायचे असल्यास तो मेसेज करतो.
    “कॉल करू का ?” अथवा
    “पाच मिनिटांनी बोलूया का ?”
    आता लेका, मी फोन पाहणार तेव्हा ना तुझा मेसेज वाचणार.
    मनात आले तर उचल फोन आणि कर की.
    फारफार तर मी सांगेन की बाबा आत्ता लसूण सोलतो आहे किंवा कांदा चिरतो आहे. तेव्हा (वरणाला फोडणी दिल्या) नंतर बोलू.
    पण नाही.

    मात्र त्याने आता स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याने हळूहळू त्याचा कॉर्पोरेटी सुसंस्कृतपणाचा मुखवटा गळून पडेल याची मला खात्री आहे. पण त्याच्याशी बोलले अथवा तो भेटला की मनावर पसरलेले दाट मळभ दूर झाल्यासारखे वाटते.

    जगात आजूबाजूला काहीच चांगले घडत नाहीए ( “Everything in this world is Bogus,including Dilipkumar and Madhubala” असे थोर पत्रकार बीएसव्ही राव म्हणाला असता.) अशी दृढ होत चाललेली भावना काहीशी विरळ होऊ लागते. अन् मला माझ्यासाठी इतके पुरेसे आहे.

    आता हे लिखाण वाचल्यावर त्याचा मेसेज येईलच…
    “संदीप,वेळ आहे का ?
    कॉल करू ?”
    आणि मग त्याच्या कॉलची वाट पहात मी फोनपाशी बसून राहीन.

    संदीप सामंत.

    १३ डिसेंबर २०२३

  • योगायोग होता म्हणून

    ग़ालिब म्हणतो,
    ख़्याल उनका सुख़न मेरा,
    ज़बाँ उनकी दहन मेरा
    बहार उनकी, चमन मेरा
    गुल उनके, गुलिस्ताँ मेरा !
    (विचार त्याचे पण भाषा माझी,
    त्याचा स्वर,पण माझे मुख;
    त्याचा वसंतऋतु, बगिचा माझा;
    त्याची फुलं नि वाटिका माझी.)

    "कोसला"कार भालचंद्र नेमाडेंच्या शब्दांत सांगायचे तर उदाहरणार्थ मी आज मिलिंद शंकर नेरुरकरवर लिहिणार आहे.
    तुम्हाला पहलेछूटच सांगून टाकतो की मी आणि मिलिंद काही एकमेकांचे 'खास' मित्र नव्हतो.
    अभय, दुर्गेश,अनिल व विशेषतः प्रविण सांगळे हे त्याला जास्त जवळचे होते हे मी माझगावच्या कोर्टात (ज्या कोर्टात दिलीपकुमारने एकही रिटेक न घेता मधुबालावरच्या आपल्या दिव्य प्रेमाची जाहीर कबुली दिली होती) पुराव्यानिशी शाबित करेन.

    झाले असे होते की आमची शाळा सहभागी झालेल्या एका आंतरशालेय नाट्यस्पर्धेच्या नाटकात मिलिंद प्रमुख भूमिकेत होता.
    तो सकाळी वर्गात आल्या आल्या पहिल्या बाकावर आपले दप्तर टाकून (हे पाहूनच नंतर मला पनवेल -मुंब्रा लालपरीत खिडकीतून सीटवर रुमाल टाकून जागा अडवायची कल्पना सुचली असेल का ?)
    मोठया ऐटीत तालमीसाठी निघून जात असे.
    एकेदिवशी त्याने शाळेला (व अर्थातच तालमीला) बुट्टी मारली.
    शाळा सुरु झाल्यावर थोड्याच वेळात घामाघूम झालेले नाटकाचे सर्वेसर्वा दाभोळकर सर आमच्या वर्गावर आले.
    मिलिंद आलेला नाही हे कळल्यावर त्यांनी 'मिलिंदच्या घरी फोन आहे का ?' अशी समस्त विद्यार्थ्यांकडे चौकशी केली.
    त्याकाळी तो काळा कुळकुळीत फोन आम्ही फक्त फॅमिली डॉक्टरांच्या आणि हिंदी सिनेमातील तहहयात पोलीस कमिशनर इफ्तिकारच्या टेबलावर पाहिला होता.
    'हो, आहे ना !' प्रविण उठून उभे रहात म्हणाला आणि त्याने विरार फास्ट लोकलच्या वेगात तो सहा आकडी नंबर धाडधाड सांगून टाकला.
    त्यावेळी गिरीशकडून पेन घेऊन आपल्या खिशातल्या चिटोऱ्यावर तो नंबर लिहिताना दाभोळकरसरांची उडालेली धांदल माझ्या चांगलीच लक्षात आहे.

    अवांतर वाचनाची आवड हा मात्र आमच्यातील समान दुवा होता.
    आम्ही दोघांनीही श्रीकांत सिनकरांची 'स्मगलर' ही तद्दन फिल्मी कथानक असलेली कादंबरी घरच्यांच्या चोरुन वाचली होती.
    आणि सिनकरांच्या त्यावेळेच्या एकंदर लौकिकास ती साजेशी नव्हती असे आम्हा दोघांचेही प्रामाणिक मत होते.
    कदाचित स्मगलिंग हा चलनी विषय असल्याने तापल्या तव्यावर (भाईलोकांनी पिस्तूलाची पुंगळी भाजावी तशी) पोळी भाजण्यासाठी प्रकाशकांनी सिनकरांच्या मागे तगादा लावून ती लिहून घेतली असावी.
    त्या कादंबरीपेक्षा त्याची अर्पणपत्रिकाच जास्त वाचनीय होती (जसे रामसेबंधुंच्या तथाकथित हॉरर सिनेमांपेक्षा त्यांचे ट्रेलरच जास्त प्रेक्षणीय असत तसे) असेही आमचे विचारांती ठाम एकमत झाले होते.

    "युसूफ, मस्तान, बाखिया
    तुमच्या लीला अगाध आहेत"

    ही युसूफ पटेल, हाजी मस्तान व सुकूर नारायण बाखिया या नामचीन स्मगलरांना वाहिलेली अर्पणपत्रिका मी व मिलिंदने,शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर समोरासमोर बसून एकटप्पी चेंडूफेक करताना, पाढे म्हणावेत त्या चालीवर एकमेकांना ऐकवली होती.
    ( सहज आठवले म्हणून.... सिनकरांनी त्यांचे "सैली, तेरा सप्टेंबर" हे पुस्तक 'शतपावलीच्या हँगओव्हर'ला अर्पण केले होते.
    उदाहरणार्थ हे म्हणजे थोरच !)

    १९८४ साली स्टर्लिंगला खास लोकाग्रहास्तव लावलेला आल्फ्रेड हिचकॉकचा "The Man Who Knew Too Much"(के सरा...सरा... सरा आठवतंय ना ?) पाहिल्यानंतर मी व्हीटी परिसरात निरुद्देश (म्हणजे नेहमीसारखाच) भटकत असताना 'जे.जे.कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' च्या पायऱ्यांवर आमची अचानक भेट झाली.
    त्याच्या एका हातात त्याची शैक्षणिक अर्हता दर्शविणारा मिनी ड्राफ्टर आणि दुसऱ्या हातात ड्रॉईंग्ज् ची सुरनळी होती.
    माझ्या एका हातात ग.वा. बेहेऱ्यांचा 'सोबत' आणि दुसऱ्या हातात दबंग देवयानी चौबळचा 'देवीचा फेरा' वाचण्यासाठी घेतलेला 'चंदेरी' होता.
    (See the range.)

    'भारतीय वास्तुशास्त्र ; काल, आज आणि उद्या ' या विषयावर तो माझे बौद्धिक घेत असताना तो खरोखरच माझ्यापेक्षा चार पायऱ्या वर उभा होता की तो माझा भास होता हे मात्र आज मला नेमके आठवत नाही. इतक्यात एका तपकिरी डोळ्यांच्या मोहक मुलीने,छबिलदासच्या रंगमंचावर पोकळी भेदून यावे तशी आमच्या प्रवेशात एन्ट्री घेतली.

    'अरे,तू गेली नाहीस ?"...मिलिंदने क्षणार्धात बौद्धिकप्रमुखाचे बेअरिंग सोडले. 'बघ ना, माझी कर्जत लोकल पाच सेकंदांकरता चुकली.आता एकदम दीड तासांनी पुढची लोकल....आयला वैताग !'
    शेवटचे दोन शब्द ती तपकीरसुंदरी काही कारण नसताना माझ्याकडे बघत बोलली.
    जणूकाही मीच त्या लोकलला पाच सेकंद आधी हिरवा बावटा दाखविला होता.
    (तेव्हापासून मी कर्जत लोकलचे टाईमटेबल मागच्या खिशात घेऊनच फिरतो.
    बाय द वे,हल्ली दर त्रेसाळीस मिनिटांनी कर्जत लोकल असते.)
    'मग आता ?'... मिलिंदचा स्वर चितळयांच्या गाईच्या दुधापेक्षाही जास्त पातळ झाला होता.
    'आता तासभर लायब्ररीत बसणार, फुकटची कटकट !'(शेवटचे दोन शब्द परंपरेने माझ्यासाठी.)
    .....इतके बोलून ती भवानी लायब्ररीच्या दिशेने निघून गेली.
    आमचे बौद्धिक 'काल आणि आज'पर्यंत आले होते.
    परंतु उद्याचे भारतीय वास्तुशास्त्र खुशाल माझ्या भरवशावर सोडून मिलिंद तिला कंपनी देण्यासाठी मला 'चल मग बाय' इतके बोलून लायब्ररीकडे चालता झाला.

    दहावीच्या मेरीटलिस्टमध्ये चारचार विद्यार्थी झळकविणाऱ्या आमच्या वर्गात मिलिंद काही रुढार्थाने हुशार विद्यार्थी गणला जात नव्हता. पण त्याच्या निग्रही चेहेऱ्यावरचे तेज आणि डोळ्यातील बुद्धीजीवी चमक (त्याच्या चष्म्यातूनही) स्पष्ट दिसत असे. विज्ञानाकडे त्याचा विशेष ओढा होता. शाळेत होणाऱ्या वक्तृत्वस्पर्धेत व वर्गात शनिवारी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने लिहिलेल्या प्रहसनाचा (ज्याला भाऊ कदमच्या मराठीत "स्किट" म्हणतात) सहभाग अत्यावश्यक असे.
    त्याच्या प्रहसनांची जातकुळी ही डॉ.निलेश साबळेच्या उथळ व पांचट विनोदापेक्षा बबन प्रभूंच्या दर्जेदार फार्सीकल लिखाणाशी जास्त जवळचे नाते सांगणारी होती. तो वपु काळ्यांप्रमाणे उत्तम कथाकथनकारही होता. ऑफ पिरियडला त्याच्या गुन्हेगारी वळणाच्या कथांना प्रचंड मागणी असे. त्याने आपली नविन कथा सांगावी किंवा गेल्यावेळच्या कथेचा पुढील भाग सांगावा यासाठी आम्ही मित्रमंडळी लॉबिंग करुन (म्हणजे प्रचंड आरडाओरडा करुन) त्याला कथा सांगायला भाग पाडत असू. वर्गावर एका तासापुरते आलेले नवखे शिक्षक आमच्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभाध्यक्षांसारखेच पुरते भांबावून जात. (उगाच नाही आमच्या शाळेने महाराष्ट्राला इतके हरहुन्नरी राजकारणी दिले.) वर्गशिक्षकांच्या टेबलावर डावा हात टेकवून साऱ्या वर्गाला गुंगवून ठेवणाऱ्या ओघवत्या शैलीत तो सांगत असलेल्या कथांमध्ये विलक्षण योगायोगाच्या घटनांचा जरा ओव्हरडोस असे. एका व्यक्तीच्या आयुष्यात इतके योगायोग कसे काय येऊ शकतील यावरुन मग पुढील आठदहा दिवस आम्ही त्याला छळत असू.

    २८ फेब्रुवारी १९९१ रोजी न्यूयॉर्क राज्याच्या बफेलो शहरात झालेल्या गाडी अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
    त्या दिवशी योगायोगाने त्याचा अठ्ठावीसावा वाढदिवस होता. माणसाच्या आयुष्यातील योगायोगांचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी, त्याच्या कथांमधे वारंवार डोकावणाऱ्या योगायोगांचे समर्थन करण्यासाठी आणि आम्हा चेष्टेखोर मित्रांची तोंडे कायमची बंद करण्यासाठी त्याने हा बिनतोड भीषण एकलमार्ग स्वीकारला.

    आता तो स्वर्गामध्ये, इंद्राच्या दरबारात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यात सादर करण्यासाठी, त्याचा आवडता लेखक श्रीकांत सिनकरांच्या साथीने,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एखादे नाटक बसविण्यात गर्क असेल. त्या नाटकात त्याच्या स्वानुभवाच्या योगायोगांची रेलचेल असेल. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याची धडपड बघून भारावलेल्या उत्साही दाभोळकरसरांनी आपणहून या नाटकाचे व्यवस्थापन सांभाळायची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली असेल. आणि या नाटकात आपल्याला प्रमुख भूमिका मिळावी यासाठी नरकातून यमाचा वशिला लावून, पृथ्वीवरच्या आपल्या जुन्या खोडीनुसार, युसूफ, मस्तान व बाखिया मिलिंदवर दबाव टाकत असतील.
    हादेखील एक विलक्षण योगायोगच.

    शायर अहमद नदीम क़ासमी म्हणतो,

    कौन कहता है कि मौत आई तो मर जाऊंगा
    मैं तो दरिया हूँ, समुंदर मे उतर जाऊंगा !
    (कोण म्हणतं की मी मरणार आहे ?
    अहो मी नदी आहे, समुद्रात उतरेन मी.)

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    ३०/०५/२०२१.

  • आत्मकेंद्रीत वृत्तीला लगाम.. (बेवड्याची डायरी – भाग ३२ वा)

    सरांनी ' फक्त आजचा दिवस ' मधील पुढील सूचना फळ्यावर लिहिल्या होत्या ..

    ७ ) आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरी मी तसे दर्शवणार नाही .

    ८ ) फक्त आजचा दिवस मानसिक व्यायाम म्हणून मी स्वतःला न आवडणाऱ्या दोन तरी गोष्टी करेन .

    ९ ) फक्त आज मी स्वतःसाठी एक दिनक्रम आखेन ..तंतोतंत पाळला गेला नाही तरीही मी दिनक्रम आखेन .

    व्यसनी व्यक्ती त्याच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे सतत स्वतःच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार करत असतो ..त्याला त्याच्या वर्तनाने आसपासच्या इतर लोकांना काय त्रास होतोय याची परवा नसते ..प्रत्येक क्षणी आपण कोठे आहोत ? काय बोलतो आहोत ? काय करतो आहोत ? याचे आपण भान ठेवणे गरजेचे आहे ..अनेकदा आपण आई -वडील , भावंडे , पत्नी -मुले , यांच्याशी इतके दादागिरीचे ..आक्रमक ..त्यांच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करतो ..त्यांचे आपल्यावरील प्रेम ..त्यांचा अधिकार समजून न घेता अनेकदा आपण तोंडाचा पट्टा सोडतो ..त्यांना घायाळ करतो ...वेगवेगळे आरोप करून त्यांना चूप बसवतो ..या वर्तनाने त्याच्या भावना दुखावल्या जातात ..त्यांचे आपल्यावर कितीही प्रेम असले तरी आपण केलेल्या अपमानाने त्यांना त्रास होतोच ..या उलट आपण स्वतच्या भावना मात्र खूप जपतो ..कोणी आपल्याशी काही वावगे बोलल्यास लगेच अविचाराने तिखट प्रतिक्रिया देतो ..समोरच्या व्यक्तीच्या वयाचा ..मानाचा..सामाजिक स्थानाचा ..कसलाही मागचा पुढचा विचार न करता दुरुत्तरे करतो .. ..खरेतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करणे गरजेचे असते कारण प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू असतात जे कदाचित आपणास माहित नसतात तरी लगेच आपण आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे लगेच जाहीर करून ..बहुधा त्याचे कारण पुढे करून व्यसन करतो ..हे कितपत योग्य आहे ? इतरांची मने जपणे व स्वतःची सहनशीलता वाढवण्यासाठी ही ' आज मी कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वर्तन करणार नाही ..माझ्या भावना कोणी दुखावल्या तरीही तसे वर्तन करणार नाही ' ही सूचना केली गेलीय ...

    पुढच्या सुचने बाबत सांगताना सर म्हणाले ..व्यसनी व्यक्ती हा स्वताच्या आवडी -निवडी बाबत खूप दक्ष असतो ..अनेक गोष्टी करायला त्याला आवडत नाही ..त्या गोष्टी कितीही उपयोगाच्या असल्या तरी तो त्या गोष्टी करण्याचा कंटाळा करतो ..किवां त्या करणे पुढे ढकलत जातो ..उदा . सकाळी लवकर उठणे , नियमित नियमित योगाभ्यास करणे , घरातील जवाबदारीची कामे करणे ज्यात ..सामान आणणे ..घरचा गॅस सिलेंडर संपल्यास तो घेवून येणे ...वीजबिले भरणे ..कुटुंबीयांसोबत फिरायला जाणे ..पत्नीसोबत खरेदीला जाणे..घरातील वृद्ध माणसाना मदत करणे ..पत्नीला घरकामात मदत करणे ..स्नेही नातलग यांना अधूनमधून भेटी देणे ...लग्न समारंभ ..तसेच नातलगांच्या कार्यक्रमात सहभागी होणे ..पत्नीच्या नातलगांशी सलोखा ठेवणे ..अशा अनेक गोष्टी करणे आपण व्यसनांच्या काळात करणे टाळले आहे ..आता व्यसनमुक्तीचे जीवन जगत असताना या टाळलेल्या अथवा नावडत्या गोष्टी करणे गरजेचे आहे ..त्यामुळे आपली व्यसनमुक्ती बळकट होते ..तसेच कुटुंबीय व समाजाचा गमावलेला विश्वास परत मिळवता येतो ...

    शिस्तबद्ध व उपयुक्त जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने रोज स्वतःसाठी एक दिनक्रम आखणे गरजेचे असते ..आपल्या जवाबदा-या ..कर्तव्ये ..या खेरीज फावला वेळ कसा उपयुक्ततेने व्यतीत करता येईल असा हा दिनक्रम असावा ज्यात आपले शारीरिक आरोग्य ..मनोरंजन ..आपले छंद जोपासण्यासाठी देखील वेळ दिला गेला पाहिजे ..पूर्वी आपण समोर येईल तसे आयुष्य जगत गेलो ..वाट्टेल तसे वागलो ..नेमका चांगल्या गोष्टी करण्यासाठी शिकण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही ..आता व्यसनमुक्त जीवन जगत असताना आळशीपणा ..कंटाळा ..बोर होणे ..वगैरे गोष्टी टाळून एका विशिष्ट दिनक्रमानुसार जीवन व्यतीत केले तर ..आपले झालेले बहुतेक नुकसान लवकर भरून काढता येवू शकते ...वेळ सत्कारणी लावता येतो ..आपण आखलेला दिनक्रम कधी कधी तंतोतंत पालन करणे आपल्याला काही अपरिहार्य कारणांमुळे शक्य होणार नाही ..मात्र त्यामुळे निराश होऊन प्रयत्न सोडून न देता आपण नियमित दिनक्रम आखून तो पाळण्याचा प्रयत्न सोडता कामा नये ..
    वरील स्पष्टीकरण झाल्यावर सरांनी आम्हाला प्रश्न दिला .. तुम्ही इथे राहत असताना ...येथील थेरेपीज च्या वेळा सोडून इतर वेळी काय काय करायचे ? याचा एक दिनक्रम ठरवून तो डायरीत लिहा .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • सवाई “साईटस्-साऊंडस्”

    सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य ..

    खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात ...

    पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे .. घरगुती जेवणा पासून भेळ , गरम शेंगा दाणे .. सर्व खवय्यांना नेहमीच आकर्षित करतात ... जोडीला वाफाळलेला गरम फक्कड चहा किंवा सुवासिक कॉफी !!

    बहुतेक फक्त ह्याच संगीत महोत्सवाला अनेक परिवार- मित्र-मैत्रिणींचा घोळका एखादी पिकनिक कम मैफिल म्हणुन एकत्र बसलेला दिसतो ! वर्षात फक्त एकदाच शास्त्रीय संगीत ऐकणारे ह्या महोत्सवाला भेटतात .. काही लोकांच्या ओळखी- भेटी तर दर वर्षी फक्त ह्या महोत्सवा च्या दरम्यान होतात !

    जागा पकडण्या साठी दोन-तीन तास आधी येऊन चादर अंथरून त्यावर झोपून राहणारे रसिक .. बरोबर निवडायला आणलेली भाजी , पालेभाजी कधी लोकरी चे स्वेटर विणण्याचे साहित्य .. अजून कुठली घरची कामं , ऑफिसची कामं घेऊन शांत पणे ते करत बसलेले "रसिक" हे फक्त सवाई लाच दिसतात...

    ह्यात भर म्हणजे ...आजकल अनेक लोकं लॅपटॉप / टॅब / आय पॅड घेऊन काहीतरी काम केल्या सारखे दाखवत सवाई चा "आनंद" घेत असताना दिसतात .. काही लोकं गाणं ऐकण्या पेक्षा ते कुठल्या तरी मोबाईल / स्मार्ट फोन नी रेकोर्ड करण्यात जास्त मश्गुल असतात !

    लांब लचक फोटो लेन्स बरोबर गळ्यात कॅमेरा अडकवून (उगाचच) इकडून तिकडे धावणार्या यौवना .. युवक हजेरी लावतात .. तर काही फक्त खाण्या च्या स्टॉल्स वर मुक्कामाला येतात !

    हि असली दृष्य फक्त सवाईतंच बघायला मिळतात !

    मग खाणे असो वा गाणं .. रसिक नित्य नियमाने सवाई च्या वारी साठी आतुरतेने वाट पहात असतात

    तर.... भेटूया नक्की ... १२ ते १५ डिसेंबर !

    -- संगीत संगीत या WhatsApp Group वरुन