(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गदिमांच्या ‘चोर बाजार’ पासून बनला गुरुदत्तचा ‘प्यासा’

    पंचवटीच्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते. फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या. त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले, 'या गुरुदत्तजी!'.

    हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता 'गुरुदत्त' आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते, 'माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखेंगे तो ये हमारा सौभाग्य होगा,हमारे लिये कोई स्टोरी हो तो बताईयेगा' गदिमा 'जरुर गुरुदत्तजी' इतकंच म्हणाले व कथा सांगायला सुरवात केली.

    'एक शायर असतो,त्याला शेरो शायरी चा खुप नाद असतो,पण त्याला फारशी किंमत कोणी देत नसते,तो अनेक प्रकाशकांच्या पायर्या चढतो पण त्याचे पुस्तक छापायलाच कोणी तयार होत नसते,शेवटी वैतागून तो आपल्या काही कविता रद्दित पण विकतो....

    'गदिमांची कथा हळू हळू रंगंत चालली होती व गुरुदत्त च्या चेहर्यावर संतुष्टीचे भाव स्पष्ट दिसत होते...'वा माडगूलकरजी बहोत खूब',असे म्हणून त्यांनी सहाय्यका कडून स्वतःचे चेकबुक घेतले व गदिमांच्या नावाने १०,००० रु चा चेक फाडला, 'माडगूलकरजी बहोत अच्छी स्टोरी हे ये,सुपरडुपर हिट तो होनी ही है,आपसे गुजारीश है के आप ये स्टोरी गुरुदत्त फिल्म के लीए लिखिये'.

    मराठी चित्रपटातून गदिमांची दिगंत किर्ती गुरुदत्त या बड्या निर्मात्या जवळ पोहोचली होती व आज हा हिंदी कलावंत गदिमांना साईन करत होता!.
    गदिमांनी होकार दिला,पुढे काही दिवस गेले गदिमांनी कथेवर काम सुरु केले,हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथेप्रमाणे एक दिवस गुरुदत्तची स्टोरी डिपार्टमेंटची काही माणसे गदिमांजवळ आली,गदिमांबरोबर चर्चा केली व काही "मसालेदार" बदल सुचवले.आपल्या कथेत कोणी बदल केलेला गदिमांना आवडत नसे,एकदा सीता-स्वयंवर चित्रपटाच्या वेळी,अमराठी धंदेवाईक निर्मात्याने चक्क 'माडगूळकरजी सीतेच्या तोंडात एक फक्कड लावणी टाकूया' म्हणताच,गदिमांनी त्याचे थोबाड ज्या पद्धतीने रंगवीले असेल याची कल्पना न केलेलीच बरी!, तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगितले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही!

    आपल्याला पोटापाण्यासाठी-पैशासाठी आपले साहित्य विकावे लागते याची गदिमांना खूप खंत होती पण त्यासाठी वाटेल ती तडजोड त्यांनी कधीच केली नाही.

    एका कवितेत ते म्हणतात

    'गीत हवे का गीत?,
    एका मोले विकतो
    घ्यारे विरह आणखी प्रित!......
    'याच कवितेत शेवटी म्हणतात'
    मी हसण्याने तुमच्या हसलो
    बोलू नये ते गूज बोललो,
    तुमच्या दारी रोजच बसणे
    माल मला खपवित..
    गीत हवे का गीत?'

    पुढे १-२ वर्षे गेली व सगळीकडे गुरुदत्त फिल्म चा नवा चित्रपट 'प्यासा' अशी पोस्टर्स झळकली,'प्यासा' ची कथा गदिमांचीच घेतलेली होती,पण त्याने गदिमांना याचे श्रेय कधीच दिले नाही, गुरुदत्त म्हंटल्यावर पहिले चित्रपटाचे नाव डोळ्यासमोर येते ते 'प्यासा' आणि याचे संपूर्ण श्रेय आपल्या गदिमांना आहे,गंमत म्हणजे गदिमांचा 'जोगीया' हा काव्यसंग्रह काढून पहा,पान १०६ ते ११७ अशी १२ पानांची 'चोर बाजार' नावाची गदिमांची दिर्घ कविता आहे ती 'प्यासा' ची कथा आहे, इतकेच काय कोणाला प्यासा चा दुसरा भाग काढायचा असला तरी पुढची स्टोरी तुम्हाला त्याच संग्रहात दुसर्या एका कवितेत मिळेल!

    मराठी चित्रपटसृष्टीचे भाग्य म्हणा की हिंदी चित्रपटसृष्टीचे दुदैव पण गदिमा त्या वातावरणात फारसे रमले नाहीत,गुरुदत्तने त्यांना श्रेय दिले नाही पण याऊलट स्क्रीन मासिकातून सजंय लिला भंसाळी यांनी एक खूलासा केला होता की अलिकडेच खूप गाजलेल्या 'अमिताभ बच्चन' व 'राणी मुखर्जी' यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटाची मूळ कल्पना ग.दि.माडगूळकरांची होती,त्यांनी गदिमांना त्यांचे श्रेय दिले आहे.गदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकृती दिल्या ,पण 'प्यासा' च्या गुरुदत्तना सुद्धा 'चोर बाजार' करावासा वाटला हे दुदैव!'

  • दैनिक लोकसत्ता

    इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्र समूहाने १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरु केले. त्र्यं. वि. पर्वते हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर ह. रा. महाजनी संपादक झाले. त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत. लोकसत्ता मुंबई, ठाणे, महामुंबई, वसई-विरार, पुणे, नाशिक व नागपूर येथून प्रकाशित होते. याशिवाय मुंबईतून सांज लोकसत्ता हे सायंदैनिकही प्रसिद्ध होते. लोकप्रभा साप्ताहिक लोकसत्ताचे प्रकाशन आहे. यात करिअर, अर्थ, रविवार, नागपूर, नाशिक वृत्तांत, लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे आणि चतुरंग, वास्तुरंग या पुरवण्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • जाहल्या काही चुका… एक रसग्रहण

    या स्वर्गीय गीताचा आनंद घेता घेता खालील रसग्रहण वाचा..एक अनाकलनीय अनुभूती येते..केवळ अप्रतिम..

  • राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

    राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर सांगायचं कोणाला !

  • लिंबलोण उतरु कशी

    १९६८ साली प्रदर्शित झालेल्या एकटी या चित्रपटातील हे गीत. गदिमांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गीत स्वरबद्ध केलं सुमन कल्याणपूरकर यांनी. या गीताचे संगीतकार होते सुधीर फडके..

  • जनरिक औषधांची कास धरू या!

    नवीन औषध शोधण्यासाठी शेकडो डॉलर्स खर्च झाल्याने औषधांच्या किंमती वाढतात असा दावा केला जातो. पण लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्स – सोसायटीज याननियतकालिकातील संशोधन निबंधाने उघडकीला आणले आहे, की एक औषध शोधण्यासाठी १३० कोटी डॉलर्स नव्हे तर फक्त ६ कोटी डॉलर्स लागतात! दुसरे म्हणजे युरोप – अमेरिकेत औषधांसाठी होणार्‍या मूलभूत संशोधनांपैकी बरेचसे सार्वजनिक पैशातून होते. सहसा शेवटचा टप्याचेच संशोधन खासगी कंपन्या करतात.

  • सौ सावित्रीबाई खानोलकर – परमवीर चक्राचे ‘स्वीस कनेक्शन’

    सौ. सावित्रीबाई खानोलकर – परमवीर चक्राचे स्वीस कनेक्शन आता ऑडिओ स्वरुपात ऐका :

  • शो मस्ट गो ऑन!

    प्रश्न अस्तित्वाचा होता. तरीही या दीड वर्षात ठामपणे उभा राहिला तो मालिका क्षेत्राचा व्यवसायच. ज्या तऱहेने या जीवघेण्या आजाराशी झुंज देत हिमतीने मालिका क्षेत्र उभं राहिलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. मालिकांमुळे अनेक घरांचा उदरनिर्वाह चालू राहिला.

  • पराभवाचा वचपा..!!! मयुर टीका

    मुंबई ठाण्यात कॉंग्रेसचा पराभव झाला,

  • ईश्वर निर्मित

    आपण मानव निर्मित गोष्टींच्या इतके आहारी गेलो आहोत की ईश्वर निर्मित गोष्टी आपल्या हातातून निसटून चालल्या आहेत.