(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विंटर स्पेशल अलिबाग

    लहान असताना मांडव्याला मामाच्या घरी लाकडी माळ्यावर सकाळी सकाळी लवकर जाग यायची ती समुद्राच्या लाटांच्या आवाजाने. जानेवारीत माघी गणेशोत्सवाला थंडी पडलेली असताना मांडव्यात आम्ही सगळे एकत्र जमायचो.

      June 17, 2021


  • रिक्त प्रेमाचा घट

    बागेतील तारका-

      July 10, 2013


  • इलेक्शनी – चारोळ्या

    आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात, जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही., सकाळी वोट टाकून आलो. थोडा-फार फेर-फटका ही मारला. अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं.......

    (१)

    प्रसाद घ्या
    तीर्थ प्या
    आटोत बसा
    वोट आपला
    असा विका.

    (२)

    नेता नोट
    मोजतात
    नोट मते
    मोजते.

    (३)

    गांधींच्या डोळ्यांत
    एकच सवाल?
    गुलाबी नोटेवर
    फोटू का?

      February 16, 2015


  • एक विलक्षण अहवाल

    अमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता……

      April 30, 2013


  • सुवर्ण पदक स्वीकारण्याचा सन्मान ! (नशायात्रा – भाग २८)

    सायंकाळी हे नक्की झाले की पकडली गेलेली मुले आज काही सुटणार नाहीत .बक्षीस समारंभ ६ वा सुरु झाला , मी एकांतात जाऊन सिगरेट मध्ये गांजा भरून दम मारून मग अगदी शेवटी बसलो होतो , एकेका स्पर्धचे नाव सांगून सुवर्ण , रौप्य , आणि कास्य पदकाची बक्षीसे जाहीर केली जात होती आणि त्या वेळचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू श्री . राम ताकवले यांचे हस्ते पदके प्रदान केली जात होती .

      May 7, 2020


  • रि-युनियन

    कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही...
    'ती सध्या काय करते ' हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला.
    'ती सध्या काय करते' यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली.
    सध्या आपण पहातोय की, रि-युनियन हा विषय निघाला की पत्नी पती कडे किंवा पती पत्नी कडे संशयाच्या नजरेने पाहतात. पण खरं सांगू ? लग्नाची २०-२५ वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवल्यावरही आपण आपल्या जोडीदारावर विश्वास ठेऊ शकत नसलो तर आपण काय सहजीवन जगलो ? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हेच खरं.. नाहीतर तुमचा जोडीदार शाळा-काँलेज मधे असतानाच सैराट झाला असता, नाही का ? पण तो संयमी आहे, विचारी आहे म्हणून आज तुमच्या जोडीला आहे. आज २५ वर्षांच्या संसारा नंतर ब्रम्हदेवही आले तरी तुमची गाठ सोडू शकणार नाही असा विश्वास हवा..
    एकदा सरलेले बालपण/तारूण्य पुन्हा मिळत नाही, या विचारावर रि-युनियन या संकल्पनेने मात केली आहे. ज्याने कोणी ही संकल्पना शोधून काढली, त्याला सलाम
    शाळा काँलेज मधिल मित्र मैत्रिणींना भेटा, त्यांचाशी गप्पा मारा, सरलेले बालपण- तारूण्य तुम्हाला परत मिळेल, नक्कीच ! आयुष्यात राहून गेलेली सगळी मजा उपभोगण्यासाठी पुन्हा एकदा मिळालेली ही सुवर्णसंधी आहे.
    खुप फिरा, मजा करा ! ४०-४५ हे वय असं आहे की, अजुनही तुम्ही भ्रमंती करू शकता. एकदा का साठी आली, की पुन्हा हळहळ वाटेल, आलेली संधी गमावल्याची. आणि करा की प्रपोज राहून गेलेलं ! काय हरकत आहे ?
    मनावर नियंत्रण असलं की सगगळच सुंदर असतं/अम्रुत असतं. आपली द्रुष्टी स्वच्छ असली की सगळच स्वच्छ दिसतं. म्हणूनच कोणतीही अतिशयोक्ती टाळून मजा घ्या जीवनाची.
    आणि मनावर नियंत्रण होतं म्हणून विधीलिखित जोडीदारा बरोबर तुम्ही संसाराची पंचविशी गाठू शकलात. चुकणारा माणूस कुठेही चुकतो, त्याला रि-युनियनच निमित्त लागत नाही.
    तुमच्यातले काही सुप्त कलागुण संसाराच्या धकाधकीत दबून गेलेले असतात, पण तुमचे मित्र ते बरोबर जाणतात. ते सादर करण्याची, त्याचा आनंद घेण्याची संधी म्हणजे रि-युनियन.
    मन एक पाखरू आहे, त्याला स्वच्छंद उडू द्या , बागडू द्या. संशयाच्या, लोकलज्जेच्या कुपीत त्याला बंदिस्त करू नका. गुदमरून मरेल ते ! आणि शिल्लक राहील ते फक्त शरीर..
    तुमच्या कुटुंबा समवेत गेट टुगेदर करा. न जाणो तुमची मुलं तुमच्या मैत्रीचा वारसा पुढे चालवतील.
    आपल्यातले काही मित्र मैत्रिणी इतर कारणांनी दुःखी असतील, त्यांना तुमच्यात सामाऊन घ्या.., तुमची सोबत त्यांचे विश्व बदलू शकते.
    हे जग सोडताना कोणतीही इच्छा मागे ठेऊ नका कारण मनुष्य जन्म एकदा मिळतो आणि आयुष्य सुंदर आहे.
    मित्रांची कदर करा आणि उरलेल्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी करा व सर्व मधूर आठवणी सोबत घेउनच जगाचा निरोप घ्या.
    अरे! आज मला माझ्यातला लेखक गवसला.., अर्थात क्रेडीट गोज टू रि-युनियन पटलं तर आपापल्या ग्रुप मधे नक्की अँक्टीव व्हा...

      March 6, 2017


  • मराठी माध्यमातून एम.बी.बी.एस.!

    मराठी ही केवळ व्यावहारिक भाषा असून चालणार नाही तर ती ज्ञानभाषाही झाली पाहिजे. त्यासाठी निरनिराळ्या विषयातील ज्ञान मराठीत उपलब्ध झाले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध झाल्यास समाजातील एका मोठ्या वर्गाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. किंबहुना समाजाच्या दृष्टीनेदेखील हे आवश्यक आहे कारण सध्याच वर सांगितल्याप्रमाणे शिक्षण आणि आरोग्यसेवा या चैनीच्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा दुसरा फायदा म्हणजे मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल कारण प्रगतीच्या संधी मराठीतूनही उपलब्ध होतील.

      July 12, 2010


  • भारतमातेच्या वीरांगना – 10 : राणी शिरोमणी

    राणी शिरोमणी आपल्या भूमीच्या शेतकऱ्यांसाठी उभ्या राहिल्या आणि त्यांच्या सोबत लढल्या. म्हणूनच त्यांना मदिनापूरची “राणी लक्ष्मीबाई” असे म्हटले जाते. ह्या लढाईत बरेच इंग्रज सैनिक मारले गेले. आधीच्या छोट्या तुकडीपेक्षा इंग्रजांनी नंतर अधिक सैन्य पाठवले. राणीचे सैन्य अपुरे पडले. ही स्वाभिमानी स्त्री शेवटच्या घटकेपर्यंत लढत राहिली आणि नजर कैद झाली. असे म्हंटले जाते की राणीचा मृत्यू त्या नजरकैदेत असतांनाच झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर राणीला जीवे मारले गेले १८१२ साली.

      July 1, 2022


  • रक्त आणि रोग निदान

    एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. …..

      December 13, 2012


  • दिस उजळला

    दिस उजळला
    रात सरली
    बात उरली
    अंधाराची

    काजवे सावल्या
    गोड चांदण्या
    चंद्र कहाण्या
    ओठांवरी

    सुर किड्याचे
    बोल घुबडाचे
    तोल मनाचे
    ढललेले

    -- शरद अर्जुन शहारे

      November 12, 2019