भाद्रपद महिन्यात येथे घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणार्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे.
March 26, 2013
जे लोक काल-परवापर्यंत सक्त मोदिविरोधी होते त्यांनाही मोदींची नाईलाजाने का होईना स्तुती करावी लागली.
November 12, 2016
एक भक्त देवाला सारखा तक्रार करायचा,
"देवा,या वर्षी फारच थंडी आहे "
"देवा,भयानक उन्हाळा आहे
"देवा,भयंकर पाऊस पडतोय,पूर आला
"अरे काय महागाई वाढली देवा "
"देवा,धंदा पण मंदावला,गिऱ्हाईकच नाही "
देव पण ऐकुन ऐकुन वैतागला आणि म्हणाला,
"तुला खाली येवढा त्रास होत असेल तर वर येतोस का ????
तेव्हापासून भक्त गुपचुप दर्शन घेवुन जायला लागला !
March 7, 2020
बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल.. म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली...
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल.. अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला.. घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते.. आपली ओढणी संभाळत.. "भैया जल्दी दो".. या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती.. घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला...
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली...
तेवढ्यात तो युवक बोलला.. " आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?".
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले.. आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला..
.
न राहुन तिने त्या युवकाला विचारल.. "माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे".
तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर कुणाची तरी बहिणच ना"?.
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन निघुन गेला...
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानाने उंचावली....
कारण त्याच्या टी शर्टावर लिहिले होते..........
Indian army
-- अनुजा
November 6, 2016
काही महिन्यांपूर्वी भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा आणि बरीच वर्ष भारतीय जनतेच्या मनातील खदखदिला वाट मोकळी करून देणारा जनहिताचे रक्षण करणारा तसेच लोकशाहीची आब राखणारा निर्णय २६ सप्टेंबर, २०१३ रोजी देशाच्या सर्वोच्य न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे भारतीय मतदारांना गुप्त मतदानाद्वारे उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळाला.
October 6, 2013
इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६ मध्ये चैत्रपाडव्याला झाली. दादा महाराज जोशी यांना गणपतीचा साक्षात्कार झाला. त्यानुसार त्यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता.
April 9, 2013
कुडाळ जवळील वालावल हे देखील निसर्गाने गर्द हिरव्या झाडीने झाकलेले असेच एक छान गाव ! येथील लक्ष्मीनारायणाचे देऊळ म्हणजे डोंगर, माड , तलाव , कलात्मक दीपमाळा अशा सर्व संपत्तीने सजलेले प्रशस्त देवस्थान आहे ! बहामनी सत्तेने आत्यंतिक धार्मिक छळ सुरु केल्यावर, गोव्यातील हरमळ येथून ही मूर्ती वालावल येथे आणण्यात आली, असेही म्हटले जाते. लक्ष्मीनारायणाची मूर्ती म्हटले तरी कोकणात बहुतेक ठिकाणी विष्णूच्या उजव्या व डाव्या बाजूला लक्ष्मी आणि भूदेवी / श्रीदेवी यांच्या मूर्ती असतात. येथील मूर्तीही तशीच आहे. अगदी देवळात शिरतानाच दोन्ही बाजूंना ३ /३ दिवे लावण्यासाठी बसविलेल्या महिरपयुक्त पट्टया खास आहेत. छताला बसविलेल्या त्रिकोनयुक्त रिपा वेगळ्या आणि भक्कमपणा वाढविणाऱ्या आहेत. रिंगयुक्त घंटा पोर्तुगीज घंटांची आठवण करून देणारी आहे. पूर्वी प्रत्येक गावकरी दिवसातून एकदा तरी देवळात येत असे. त्यामुळे गावातील पत्रे टाकण्याची पोस्टाची पेटी, देवळातच बसविलेली असे. तशीच ती या देवळातही आहे. आता टपालव्यवस्थाच बंद पडत चालली आहे. त्यामुळे टांगायच्या या जुन्या टपालपेटीचे दर्शनही आनंददायी आहे.
-- मकरंद करंदीकर.
May 29, 2017
वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे.
July 25, 2011
आज “मराठी भाषा दिन”. मराठीचा गजर आणि जागर करण्याचा दिवस.
February 27, 2013
रुपयाची एकसष्ठी !!! (वास्तविका-मयुरटिका )
July 9, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti