(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाहेरून नागपूरले येणार्‍या लोकायसाठी जरूरी सूचना

    बाहेरून नागपूरले येणाऱ्या लोकायसाठी जरूरी सूचना

    १. नागपूरात येवून आपला शायनेपना दाखवू नये. इथं पहिलेच अतीशायने लोकं राहतात.

    २. पुणेवाल्या लोकायनं आम्हाले दुपारी एक ते चार झोपाचा फालतू सल्ला देवू नये. दुपारी आम्हाले खूप सारे कामं रायते.

    ३. नागपूरातल्या दुकानदारांशी जास्त वाद घालू नये. नाहीत् सामान भेटन नाहीच, उलट झोडपे भेटतीन.

    ४. आम्ही दुपारी एक ते चार ट्रॅफिकचे नियम पाळत नाई. कारण विचारू नये. तुम्हाले उत्तर दयाले आम्ही दबेल नाही.

    ५. इथल्या लोकायसमोर उगाच तुमच्या श्रीमंतीचा ताव मारू नये. तुमच्या पैशात आम्हाले जरासा बी इंटरेस्ट नाही.

    ६. मुम्बई अन् पुणेवाल्यांनी तर आम्हाले काम कमी करणारे आळशी म्हनू नये. आम्ही कितीही रिकामचोट असलो तरी तुमच्यापेक्षा पोटभर जेवतो.

    ७. नागपूरवाल्यायले अविकसित समजू नये. मनाची श्रीमंती हाच आमचा विकास.

    ८. नागपूरातल्या पोरी तोंडाले फडकं बांधून फिरतात म्हणून उगाच दात दाखवू नये. तो आमचा खाजगी प्रश्न आहे. अन् तुम्हाले तोंड दाखवाची जबाबदारी अजून आम्ही घेतलेली नाही.. समजलं..?? नाहीत् भर मे महिन्यात कामठी रोडावर नंग्या पायानं चालाची शिक्षा करण्यात येईल.

    ९. आमच्या भाषेले अजिबात हासाचं नाही. तुम्ही जर मराठीत विचारलं त् मराठीतच उत्तर भेटन. आमच्या भाषेत 'का बे ' चा अर्थ 'काय दादा' असा होते.

    १०. आमच्या रंगावर बिलकुल जायचं नाही. मूळचे आम्ही गोरेच आहो. हा इथल्या उनाचा परिणाम आहे.

    !! धन्यवाद भाऊ.. दे खर्रा!!

      August 16, 2017


  • लोकांसाठी वने

    जगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ‘लोकांसाठी वने’ ही संकल्पना यासाठी तयार करण्यात आली आहे.

      June 3, 2011


  • जग जाहिरातीचे

    पुस्तक लिहिण्यामागे जसा विद्यार्थ्यांचा विचार आहे तसाच छोट्या जाहिरातदारांचाही विचार आहे. अनेकांना या शास्त्राविषयी माहिती नसल्याने जाहिरातीवर खर्च केलेल्या पैशाचा पुरेसा लाभ घेता येत नाही. कमीत कमी पैशातही उत्तम जाहिरात होऊ शकते. मात्र त्यासाठी या विषयाचे पुरेसे ज्ञान पाहिजे. त्यांनाही उपयुक्त होईल, या विषयाकडे पाहण्याची त्यांची विचारधारा बदलेल ही. तसेच ज्याला कुणाला या क्षेत्रात काम करायचे आहे, जे या क्षेत्रात काम करीत आहेत, पण औपचारीक शिक्षण घेतलेले नाही, ज्यांना आपल्या व्यवसायासाठी जाहिरातीचा वापर करायचा आहे अशा सर्वांसाठी उपयुक्त व्हावे.या हेतूने हे पुस्तक आहे.

      June 16, 2014


  • प्रतिबिंब

    मधे एकदा एका 'so called whatsapp गुरू' कडून एक सुप्रभात संदेश आला होता. त्यात लिहिलं होतं की रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आरशात बघा... आणि त्यात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबाला सांगा... " You are the best. And I love you."
    थोडक्यात काय तर स्वतःवर प्रेम करायला शिका... पण मग त्यासाठी आरशात कशाला बघायला हवं?
    आपण कसे दिसतो हे बघायला? पण आपण कसे दिसतो हे बघून आपण आपल्यावरच प्रेम करतो का? मला तरी नाही वाटत तसं....
    पण झालं असं की आता जेव्हा जेव्हा मी आरशात बघते तेव्हा प्रत्येक वेळी मला तो संदेश आठवतो ; आणि मग मी जरा जास्तच न्याहाळून बघते माझं आरशातलं प्रतिबिंब ... आणि गंमत म्हणजे कितीही वेळा बघितलं तरी कंटाळा नाही येत !
    अशाच एका whatsapp संतांनी अजून एक पोस्ट पाठवली... त्यानुसार आपण जसे असतो त्यापेक्षा पाच पटींनी जास्त सुंदर प्रतिबिंब दिसतं आरशात ! हे वाचल्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिबिंबाबद्दल थोडी शंका ही आली मनात....
    या सगळ्या पार्श्वभूमीवर एका सकाळी आरशासमोर उभी असताना माझी नजर माझ्या चेहेऱ्याचा आजूबाजूला दिसणाऱ्या आरशावर गेली आणि मनात विचार आला.... सकाळी सकाळी माझं आरशात दिसणारं रुपडं बघून मी खुश होते, माझा दिवस चांगला जातो.... पण हा आरसा ? त्याचं काय होत असेल? म्हणजे त्यालाही वाटत असेल का - सकाळी उठून माझा चेहेरा बघावा असं? जर त्याला तेव्हा समोर दिसणारं दृश्य आवडत नसेल तर? मला बघितल्यानंतर जर त्याचा दिवस वाईट जात असेल तर?
    पण त्याला जरी काहीही वाटत असलं तरी त्याच्याकडे काही पर्याय नाहीये.... त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक वस्तूचं प्रतिबिंब दाखवण्या शिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये.…. त्याचं एकच काम आहे... त्याच्या समोर जे काही असेल त्याला पाचपटीनी सुंदर करून त्याचं प्रतिबिंब दाखवायचं... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे - हे करत असताना स्वतः त्यापासून अलिप्त राहायचं ! त्या वाढवून दाखवलेल्या प्रतिबिंबात स्वतःचं काहीच मिसळायचं नाही.... आणि त्याहूनही कमालीची गोष्ट म्हणजे - आपण स्वतः नेहेमी स्वच्छ राहायचं... त्या प्रतिबिंबाचा कोणताही गुण किंवा अवगुण स्वतःला चिकटू न देता !!!
    जेव्हापासून ही जाणीव झालीये ना; तेव्हापासून आरशासमोर उभी राहिले की मला फक्त आरसाच दिसतो.... माझ्या प्रतिबिंबपेक्षा कितीतरी पटींनी सुंदर आणि स्वच्छ !!!
    --प्रिया जोशी
    हैदराबाद
    २८.१२.२०२०

      December 18, 2022


  • Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग १

    २००५ मध्ये, मी रस्टनबर्ग (इथेच जगप्रसिध्द “सन सिटी” आहे!!) इथे नोकरी करताना, ध्यानीमनी नसताना, Standerton इथे नोकरी करायची संधी मिळाली. त्यातून, भारतातील प्रसिद्ध United Breweries या ग्रुपच्या इथल्या कारखान्यात फायनान्स विभागाचा प्रमुख म्हणून वरिष्ठ अधिकारी अशी म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे, अर्थातच आनंद झाला. त्याचबरोबर इतक्या वर्षात संपूर्णपणे एकट्याने राहावे लागणार, हि जाणीव झाली. वास्तविक, या देशात मी १९९४ मध्ये आलो आणि तेंव्हापासून मी कुणाबरोबर तरी रहात होतो. इथे तशी सोय होणे अशक्य!! Standerton या गावाचे नावच मुळी मी प्रथमच ऐकले होते, त्यामुळे चार लोकांकडे थोडी चौकशी केली. चौकशी अजिबात उत्साहवर्धक नव्हती, कारण, एकतर हे गाव अगदी अंतर्भागात, अगदी साधा मॉल देखील नाही, थंडी प्रचंड असते आणि भारतीय तसेच भारतीय वंशाचे फारच कमी लोक तिथे राहतात. म्हणजे वस्ती म्हणायची तर, काळे,गोरे आणि कलर्ड, यांचीच वस्ती प्रामुख्याने.
    तरीही, मनाचा हिय्या करून तिथे गेलो. कंपनीने सुरवातीला तिथल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. हॉटेल स्टेला नावाची युवती (तेंव्हा वय तिचे ३० होते, अर्थात प्रथम घटस्फोटीत!!) चालवत होती. रंगाने गोरी आणि अतिशय हसतमुख!! मी पक्का भारतीय, हे समजल्यावर अर्थात, बीफ किंवा पोर्क खाणार नाही अशा समजुतीत होती. यापूर्वी, मी हे खाल्ले आहेत, हे सांगितल्यावर ती थोडी चकितच झाली पण मी तिला, शक्यतोवर चिकन किंवा मटण, हेच सांगितले. जेंव्हा गेलो, तेंव्हा तिथला उन्हाळा सुरु झाला होता. या हॉटेलमध्ये मी जवळपास दोन आठवडे रहात होतो.
    वास्तविक, Standerton हे जोहान्सबर्ग शहरापासून १८० किलोमीटर आत आहे. शहरापासून म्हणजे, जिथे दक्षिण जोहान्सबर्ग संपते (उपनगरे धरून!!) तिथून पुढे आत, १८० किलोमीटर!! डोंगराच्या उंचावर असे हे गाव आहे, लोकवस्ती साधारणपणे, लाख,दीड लाख, त्यामुळे सगळेच सगळ्यांना व्यवस्थित ओळखतात. आता, इथे पूर्वीसारखा वर्णद्वेष नसल्याने, हिंडाफिरायला चांगले आहे. गावाचा आकार अटकर असल्याने, प्रचंड वेगाने गाडी चालविणे शक्यच नाही.
    साउथ आफ्रिकेत राहती घरे ही बहुश: बैठी असतात, कार्यालयीन इमारती मात्र उंच असतात. आल्यानंतर प्रथम काम म्हणजे कार्यालयीन कारभार समजून, सुरवात करणे, माझ्या आधीचा माणूस, राम नायडू, याची दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याने, इथे मला संधी मिळाली. हा वास्तविक, भारतीय परंतु आता याची इथली चौथी पिढी, त्यामुळे केवळ नावापुरता भारतीय, हिंदीचा गंध देखील नाही. पण सुरवातीची ३ दिवस त्याच्याकडे दुपारच्या जेवणाची सोय झाली. इथला लंच म्हणजे, बहुश: sandwich!! परंतु KFC, SPAR इथून तयार थंड खाणे मागवण्यापेक्षा रामच्या घरून आलेले चांगले होते. नंतर तो गेल्यावर मात्र, प्रश्न उद्भवला. हॉटेलमध्ये दुपारचे खाणे, अशी सोय नसायची!! म्हणजे मिळायचे नाही असे नव्हे, पण मग त्यासाठी स्पेशल ऑर्डर देण्याची गरज असायची!! आता, राम देखील नाही म्हटल्यावर तिथून मागवण्याशिवाय पर्याय नव्हता!!
    तेव्हढ्यात मला, एक छोटेसे घर मिळाले. १ बेडरूम,किचन आणि लाउंज असे ते घर होते. मी एकटाच रहात असल्याने, मला ते चांगले होते. उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी आणि माझा इथला जवळपास १० वर्षांचा अनुभव जमेस धरला तरी थंडी जाणवायची, विशेषत: पाऊस पडला, की वातावरणात चांगलाच गारवा पसरायचा. इथे गारवा निर्माण होण्यासाठी पावसाची तुरळक सर देखील पुरेशी आहे. एव्हाना, दोन आठवडे झाले, माझ्या डिपार्टमेंटमध्ये २ भारतीय वंशीय तर ३ गोऱ्या व्यक्ती काम करीत होत्या. माझा Accountant स्टीवन नामक गोरा, डेला आणि बार्बरा या गोऱ्या मुली, ली नावाची भारतीय वंशीय मुलगी, असे काम करीत होते. सुरवातीला, अर्थात “झळ” बसली, मला त्याचे कारण नंतर समजले, रामच्या जागी स्टीवनला येण्याची इच्छा होती आणि माझ्या येण्याने, त्याची संधी हुकली!!
    त्यामुळे, त्याचा माझ्यावर “दात” होता. माझा Factory General Manager स्टीफन याच्याकडून मला ही माहिती कळली. माझ्या साउथ आफ्रिकन कारकिर्दीत, स्टीफन हा मला भेटलेला सर्वोत्तम गोरा माणूस. आता, गोऱ्यांचे राज्य राहिले नसून, नव्या वातावरणाशी जुळवणे क्रमप्राप्त आहे, याची, याला जितकी खोल जाणीव होती, तितकी त्याआधी आणि नंतर देखील, माझ्या संपर्कात आलेल्या कुठल्याही गोऱ्या माणसाला नव्हती. मी, या गावात नवीन आहे तसेच हे गाव, म्हणजे अगदी गाव म्हणावे असे मागासलेले आहे, असे असेल, परंतु त्याने माझ्यावर अतिशय प्रेम केले, इतके की महिन्याभरात, त्याने, त्याच्या घरात जेवायचे आमंत्रण द्यायला सुरवात केली.
    नवीन घर तसे फर्निचरयुक्त जरी असले तरी स्वयंपाकाची भांडी घेणे आवश्यक होते. सुदैवाने, याच वेळेस, भारतात्न, माझा एल मित्र, प्रदीप मुळावकर, इथे एका सेमिनारसाठी जोहान्सबर्ग इथे येणार होता. त्याला लगेच जेवणाचा कुकर आणायला सांगितले. साउथ आफ्रिकेत, भारतीय लोक इतके आहेत, ( यात माझ्यासारखे किंवा पिढ्या न पिढ्या राहणारे, दोन्ही!!) की अशा गावात देखील भारतीय मसाल्यांची, डाळींची, भाज्यांची अजिबात चणचण भासत नाही. जसा प्रदीप इथे आला, तशी मी त्याला भेटायला गेलो.
    त्याच्याबरोबर राजेंद्र गोगटे नावाची व्यक्ती आली होती. त्यावेळेस माझ्याकडे स्वत:ची गाडी नव्हती (इतकी वर्षे कंपनीची गाडी!!) त्यामुळे कंपनीच्या राखीव गाडीबरोबर,कंपनीचा ड्रायव्हर, त्यातून, तोपर्यंत,मी जोहान्सबर्ग फारसे पहिले नव्हते, त्यामुळे कंपनीच्या ड्रायव्हरशिवाय पर्याय नव्हता. मी, प्रदीप आणि राजेंद्र गोगटे, असे एकत्रित असल्याने आणि सुदैवाने, नव्याने ओळख झालेले राजेंद्र गोगटे आमच्याच सारखे समस्वभावी निघाल्याने चार दिवस भन्नाट धमाल!! प्रदीपने येताना, आठवणीने पुरणपोळी, ठेपले असे खास भारतीय पदार्थ आणले होते. जे परदेशात रहातात आणि अधिक करून, जिथे नोकरीनिमित्ताने फारसे भारतीय रहात नाहीत, अशा लोकांना “पुरणपोळीचे” अप्रूप अधिक जाणवेल.
    असो, लगेच ऑफिसमध्ये कामाला सुरवात झाली. जसे काम सुरु झाले तशी गोऱ्या लोकांचे राजकारण देखील. लगेच काही माहिती द्यायची नाही, रिपोर्ट्स लगेच द्यायचे नाही, फायली दडवून ठेवायच्या इत्यादी कुचाळक्या सुरु झाल्या. अर्थात,हे आणि असे अनुभव मी, पूर्वीच्या नोकरीत घेतलेले असल्याकारणाने, मला त्याचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या कामात, एक गोष्ट नव्याने करायला लागली आणि ती म्हणजे डेपो भेटी, अधिक करून Stock Check.माझ्या अखत्यारीत ४ डेपो होते. जरी कंपनी U.B.ग्रुपमधली असली तरी बियर उत्पादन वेगळे होते (अजूनही आहे) म्हणजे प्रसिध्द किंगफिशर बियर नसून, लोकल बियर – हलक्या प्रतीची बियर. फायनान्स प्रमुख म्हणून अधून,मधून Factory visit अत्यावश्यक!! त्यानिमित्ताने बियर कशी बनविली जाते, हे समजले.
    अर्थात, २ वर्षाच्या कालावधीत, मी, केवळ २ वेळा, दोनच थेंब ती बियर चाखली आणि ती देखील नवीन product launch निमित्ताने!! धाडसच झाले नाही!! आमचा बिझिनेस सगळा Cash Basis वर!! त्यामुळे, व्यवहार सतत डोळ्यात तेल घालून करावा लागत असे. बदलत्या काळानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न उभे राहिले होते (आता तर त्यात अधिक वाढ झाली आहे!!), सुरक्षा व्यवस्था जरी माझ्याकडे नसली तरी अखेर एक जबाबदार अधिकारी म्हणून उत्तरदायित्व मला घ्यावेच लागायचे. नवीन डेपो उभारायचे, नवीन पब्स तयार करायचे, हा माझ्या कामाचा भाग होता. त्यानिमित्ताने, तत्सम agreements वगैरे किचकट गोष्टी पार पडणे गरजेचे होते.
    इथेच मला गोऱ्या समाजाचे फार जवळून निरीक्षण करता आले, म्हणजे तो समाज, त्यांची कुटुंबव्यवस्था, संस्कृती (यात त्यांची लग्ने वगैरे…. माझा Accountant माझ्याच काळात तिसऱ्यांदा लग्नात अडकला होता!! पण ते नंतर….) त्यांचे जेवणखाण इत्यादी अनेक गोष्टी समजल्या. इथेच मी हा भाग संपवितो, पुढील भागात, साउथ आफ्रिकेतील दुर्दैवी दशावतार, याबाबत लिहीन, जे इथेच,नको तितक्या जवळून अनुभवायला मिळाले.
    - अनिल गोविलकर

      September 24, 2018


  • प्रेरणादायी कर्तृत्व – मंगला हंकारे

    ”काही व्यक्तींना चाकोरीबद्ध विचारशैली मोडून अनोखं तसं सर्जनशील काम करण्याची आवड व सवय असते. त्यांचं हे काम अथवा कार्य जर सामाजिक असेल तर गरजूंना आपसूकच मायेचा स्पर्श मिळतो. ‘ एच.आय.व्ही.’ विषाणूंनी ग्रासलेल्या व्यक्तींसाठी ‘नेटवर्क इन ठाणे बाय पिपल लिव्हींग विथ एच.आय.व्ही.’ ही संस्था कार्यरत असून त्या व्यक्तींसाठी निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या मंगला हंकारेंच्या कार्याचा हा लेखाजोखा”..

      November 1, 2013


  • समाजाच प्रबोधन करण्याची गरज…..

    वेश्याव्यवसाय नक्किच वाईट आहे. या वेश्यांकडे जाणारे आपल्या आजुबाजुचीच मुल व पुरुष असतात. मी नेहेमी जाणार्‍यांच्या बाबतीत जास्त लिहित नाही पण ही लहान मुल, नुकती मिसरुढ फ़ुटलेली मुलं जेव्हा वेश्यांकडे जाताना दिसतात. तेव्हा खुप काही तरी चुकतय अस जाणावत. ही मुल बरेच वेळा चांगल्या कुटुंबातली व चांगल्या शाळांमधली असतात.या मुलांना सेक्सबाबत व ऎडस् बाबत अर्धवट माहिती असते. विवाहापूर्वसंबंध किती घातक आहेत याची त्यांना मुळिच कल्पना नसते. खर तर या मुलांना योग्यवेळी काऊंसिलिंगची गरज असते

      December 5, 2010


  • युग – एक व्यापक वैदिक संकल्पना !

    वाचकांना “युग” या संकल्पनेची अचूक माहिती व्हावी यासाठी केलेला एक छोटा प्रयत्न म्हणजे हा लेख!

      May 5, 2011


  • लोका सांगे ब्रह्मज्ञान ….! ( नशायात्रा भाग १२ )

    आमची गांजा ओढणारी टीम आता वाढत चालली होती , दारूचा पटकन तोंडाला वास येतो मात्र गांजाचे तसे होत नाही , फक्त पिताना गांजाच्या धुराचा वास दरवळतो आणि अनुभवी किवा जाणकार लोकांनाच गांजा , चरस वगैरे च्या धुराचा वास कळतो , एकदा गांजा ओढून झाला की तोंडाला दारू सारखा भपकारा येत नाही त्यामुळे आम्ही दारू चे सेवन क्वचित आणि गांजा मात्र नियमित ओढत असू , दारू चढल्यावर बहुतेक वेळा भांडणे , शिवीगाळ , फालतू बडबड असे प्रकार घडतात पण गांजा चे मात्र तसे नाही बहुधा गांजा ओढणारे शांत राहतात भांडणे वगैरे प्रकार त्यांना मानवत नाहीत .

      January 27, 2020


  • संस्थेच्या पदाधिकारी यांची सहकार वर्ष अखेरची वैधानिक कामे

    कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मन:स्थिती बदलायची असते. सहकार वर्ष हे ३१ मार्चला संपते. वित्तीय वर्ष समाप्त झाल्यापासून चार महिन्याच्या कालावधीत संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करून पुढील दोन महिन्यात सदस्यांची अधिमंडळाची वार्षिक बैठक बोलावणे कायद्याने बंधनकारक असते. परंतु पुढील महिन्यापासून करावयाची वैधानिक कामे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था सोडल्यास इतर संस्थेत आनंदी आनंद असतो. पदाधीकार्‍याकडे कारणाची न संपणारी यादी असते. परंतु योग्यप्रकारे वेळीच काम केले तर भविष्यात आपला मौल्यवान वेळ वाचण्यास नक्कीच मदत होईल.

      July 21, 2021